Current Affairs of 1 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2017)

पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत निघाला तोडगा :

  • हॅम्बर्गमध्ये जी 20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान डोकलाम विवाद सोडण्यावर चर्चा झाली होती.
  • याचा खुलासा एका नवीन पुस्तकात करण्यात आला होता. धोरणात्मक बाबींचे अभ्यासक नितीन ए. गोखले यांनी  ‘सिक्यॉरिंग इंडिया द मोदी वे’ नावाच्या पुस्तकात केला आहे.
  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

चंद्रावरही थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील :

  • पुढील 25 वर्षांत चंद्रावर 100 पर्यंत लोक कायमस्वरुपी राहू शकतील, असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) तज्ज्ञाने सांगितले.
  • चंद्राचा पृष्ठभाग धुळीने भरलेला असून त्यावर थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील. परंतु वितळलेल्या बर्फाचा वापर पिण्यासाठी तसेच तेथील शेतीसाठीही करणे शक्य होईल.
  • एवढेच काय चंद्रावर मुले जन्माला येणेही शक्य आहे.
  • असे गेल्या आठवड्यात लाटव्हियात युरोपियन प्लॅनेटरी काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत बर्नार्ड फोयिंग यांनी सांगितले. फोयिंग ईएसएचे ‘मून व्हिलेज’ योजनेचे राजदूत आहेत.
  • फोयिंग म्हणाले की, 2030 मध्ये सुरुवात सहा किंवा दहा जणांपासून (त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अभियंते असतील) होईल व ती वाढून 2040 मध्ये 100 पर्यंत जाईल. तिथे 2050 साली तुम्हाला हजारो लोक
  • दिसतील.

शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण :

  • शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
  • यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते.
  • शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे.  

राजकीय पक्षाचे नेतृत्व पुन्हा नवाझ शरीफ यांच्याकडे येणार :

  • अपात्र ठरवण्यात आलेल्या लोकप्रतिनिधीला राजकीय पक्षाचे नेतृत्व करण्याची परवानगी देणारा नवा कायदा पाकिस्तानात प्रस्तावित करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर, देशाचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ हे पुढीलआठवडय़ात त्यांच्या सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.
  • पनामा पेपर्स घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने 28 जुलै रोजी अपात्र ठरवल्यानंतर 67 वर्षांचे शरीफ यांना पीएमएल-एनचे प्रमुख म्हणून पायउतार व्हावे लागले होते.
  • हा नवा कायदा कनिष्ठ सभागृहात, म्हणजे नॅशनल असेंब्लीत सोमवारी मांडला जाणार असून, पीएमएल-एनचे बहुमत असल्यामुळे तेथे तो सहज मंजूर होण्याची अपेक्षा आहे.

‘आयईमल्याळम डॉट कॉम’ अ‍ॅपचे अनावरण :

  • केरळमधील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’ माध्यम समूहाकडून खास मल्याळम भाषिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ieMalayalam.com या वेबसाईटच्या अॅपचे अनावरण झाले.

    केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी अॅपचे लोकार्पण केले.

  • यावेळी विचारवंतांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या Kerala@60 या व्हिडिओ मालिकेचेही अनावरण करण्यात झाले.
  • जानेवारी महिन्यात ही वेबसाईट सुरु करण्यात आली होती. दर्जात्मक पत्रकारिता हा या वेबसाईट सुरु करण्यामागील उद्देश होता.

भारताचे पाच बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये :

  • जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे.
  • भारतीय बॅडमिंटन म्हणजे पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालच नव्हे हेच पुरुष खेळाडू दाखवून देत आहेत.
  • जागतिक क्रमवारीत 58 हजार 583 गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे.
  • प्रणॉय गतवर्षी दुसऱ्या फेरीत पराजित झाला होता. पण प्रतिस्पर्ध्यांनी सरस कामगिरी केल्यामुळे तो 47 हजार 295 गुणांसह एकोणीसावा झाला आहे.
  • बी. साई प्रणीत 48 हजार 360 मानांकन गुणांसह सतरावा आहे, तर अजय जयराम 45 हजार 835 मानांकन गुणांसह विसावा आहे.
  • समीर वर्माची प्रगती कायम आहे. त्यानेच या क्रमवारीत भारतीयात सर्वोत्तम प्रगती केली आहे. त्याने चार क्रमांकाने प्रगती केली आहे. तो आता 21 वा आहे.
  • त्याचे मानांकन गुण 44 हजार 642 आहेत. समीरने जपान स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती.
  • पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत पुन्हा जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. तिचे मानांकन गुण 81 हजार 106 आहेत.
  • तईचे मानांकन गुण 94 हजार 409 आहेत. साईना अजूनही टॉप टेनबाहेर आहे. ती बाराव्या स्थानावर कायम आहे.
  • प्रणव जेरी चोप्रा – एन सिक्की रेड्डी मिश्र दुहेरीत 19 व्या क्रमांकावर आहेत, हीच भारतीयांची सर्वोत्तम कामगिरी आहे.
  • महिला दुहेरीत अश्वीनी पोनप्पा – एन सिक्की रेड्डी या 23 व्या क्रमांकावर आहेत.

‘सर्जिकल स्ट्राइक’ पुस्तक अन्‌ चित्रपटातही :

  • भारतीय लष्कराची सर्वाधिक आक्रमक कारवाई म्हणून ओळखल्या गेलेल्या “सर्जिकल स्ट्राइक” देशपरदेशात चर्चेचा विषय ठरला होता.
  • भारतीय लष्कराने या वेळी दाखविलेल्या शौर्य आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक झाले होते.
  • केंद्र सरकारनेही याचा बराच गाजावाजा केल्याने भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगासमोर आले होते. आता हाच “सर्जिकल स्ट्राइक’चा विषय चित्रपट आणि पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध होणार आहे.
  • मागील वर्षी 28 सप्टेंबर रोजी भारतीय कमांडो पॅराशूटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये उरतले होते, येथे त्यांनी 50 दहशतवाद्यांना ठार करत त्यांची ठाणी उद्‌ध्वस्त केली होती.
  • शौर्य, देशभक्ती, थरार, उत्कंठा आणि धडाकेबाज कृती यांचा अनोखा मिलाफ “सर्जिकल स्ट्राइक’च्या निमित्ताने पाहायला मिळाला होता.
  • काश्‍मीरमधील उरी सेक्‍टरमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने “सर्जिकल स्ट्राइक”चे नियोजन आखले होते.
  • पुढील वर्षी याच विषयावर एक चित्रपटदेखील येऊ घातला असून, पूर्णपणे याच विषयावर आधारित असणारी दोन पुस्तकेही बाजारात आली आहेत.
  • नितीन गोखले लिखित “इन सिक्‍योरिंग इंडिया दि मोदी वे : पठाणकोट, सर्जिकल स्ट्राइक्‍स अँड मोअर” या पुस्तकाचे दिल्लीमध्ये प्रकाशन झाले.
  • शिव अरूर आणि राहुल सिंह यांनी लिहिलेले “इंडियाज मोस्ट फिअरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज” या पुस्तकामध्ये “सर्जिकल स्ट्राइक”चे वर्णन आहे.
  • रोनी स्क्रुवाला निर्मित आगामी “उरी”हा सिनेमा ही “सर्जिकल स्ट्राइक’चा थरार मांडणारा आहे. आदिया धर दिग्दर्शित या चित्रपटातील प्रमुख भूमिका ही कमांडर विकी कौशल याची आहे.

पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती :

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.
  • सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे बराच काळपासून तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
  • तामिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर या राज्यात कायमस्वरूपी राज्यपालांची मागणी होत होती.
  • पुरोहित यांच्या नियुक्तीमुळे तामिळनाडूला पूर्णवेळ राज्यपाल मिळाले आहेत.
  • बनवारीलाल पुरोहित हे विदर्भातील नेते. 1977 मध्ये ते राजकारणात सक्रीय झाले.
  • भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सत्यपाल मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते काही काळ लोकसभा व राज्यसभा सदस्य होते. ते जनता दलाचे नेते होते. नंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
  • सध्या ते भाजपाचे उपाध्यक्ष होते. उत्तर प्रदेशातील जाटांचे नेते अशीही त्यांची ओळख होती.
  • रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर हे बिहारच्या राज्यपालांचे पद रिक्त होते.
  • बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य गंगाप्रसाद यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • आसामच्या राज्यपालपदी जगदीश मुखी यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. जगदीश मुखी दिल्ली भाजपाचे नेते म्हणून ओळखले जातात.
  • दिल्ली सरकारमध्ये त्यांनी अर्थ, नियोजन, अबकारी कर, कररचना व उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे.
  • अ‍ॅडमिरल (सेवानिवृत्त) देवेंद्र कुमार जोशी हे आता अंदमान व निकोबारचे नायब राज्यपाल असतील.
  • ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी. डी. मिश्रा अरुणाचलचे राज्यपाल असतील.
  • नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पहात होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.