Current Affairs of 1 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 जून 2016)

चालू घडामोडी (1 जून 2016)

नौदल सेनेचे नवेप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा :

 • अॅडमिरल सुनील लांबा यांनी (दि.31 मे) रोजी भारतीय नौदल सेनेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
 • एडमिरल आर. के. धवन हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी या पदाची जबाबदारी आता सुनील लांबा यांना देण्यात आली आहे.
 • पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय समुद्राच्या सीमेची सुरक्षा कडेकोट करण्याला प्राथमिकता देणार असल्याचं यावेळी सुनील लांबा यांनी सांगितलं.
 • अॅडमिरल लांबा नौसेनेचे प्रमुख होण्याआधी नौसेनेच्या पश्चिम भागाची जबाबदारी सांभाळत होते.
 • 1 जानेवारी 1978 ला ते भारतीय नौसेनेत सामील झाले.
 • नौसेनेमध्ये 38 वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यांना अनेक पदकं आणि पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं आहे.
 • नेव्हिगेशन अधिकारी म्हणून त्यांनी आइएनएस सिंधू आणि आयएनएस दुनागिरीवर त्यांनी सेवा बजावली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मे 2016)

राज्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना :

 • विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
 • तसेच यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
 • मराठी विश्वकोशाच्या संकल्पित 23 खंडापैकी 20 खंड प्रकाशित झाले आहेत.
 • मात्र ते पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे यातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत.
 • पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी दिली.

यूपीएससीच्या सदस्यपदी बी.एस. बस्सी :

 • दिल्ली पोलिस आयुक्तपदी वादग्रस्त कार्यकाळ घालविल्यानंतर आता बी.एस. बस्सी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • सरकारने 60 वर्षीय बस्सी यांची या जागेवर निवड केल्याचे जाहीर केले असून, आता ते यूपीएससीमधील दहा सदस्यांपैकी एक असतील.
 • अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरच्या 1977 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत.
 • फेब्रुवारीत ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदावरून निवृत्त झाले आहेत.

फ्लिपकार्ट कडून ग्राहकांसाठी नवे पर्याय :

 • ऑनलाइन विश्वातील ई-कॉमर्स साइट असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या ऑनलाइन ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे.
 • ग्राहकांना कोणत्याही वस्तूची खरेदी करताना स्वस्तात मिळावी यासाठी फ्लिपकार्टने एक आकर्षित आर्थिक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
 • “No Cost EMI” असा पर्याय दिला असून यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करताना आता अतिरिक्त खर्चाचा भार पडणार नसल्याचे समजते.
 • कारण, ग्राहकांसाठी बिनव्याजी आणि झिरो डाऊन पेमेन्टवर वस्तू खरेदी करता येणार आहे.
 • जनतेला स्वतात ऑनलाइन खरेदी करता यावी, यासाठी पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य कामगार विमा योजनेचे महामंडळात रूपांतर :

 • केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रूपांतर करण्यास (दि.31 मे) रोजी झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ 24 लाख कामगारांना देण्यात येतो.
 • महाराष्ट्र राज्यात राज्य कामगार विमा योजना 1954 पासून लागू करण्यात आली आहे.
 • औद्योगिक क्षेत्रातील ज्या कामगारांचे मासिक वेतन 15 हजार रुपयांपर्यंत आहे, अशा कामगारांना ही योजना लागू आहे.
 • तसेच त्यासाठी कामगारांच्या वेतनातून तसेच कारखाना मालकांकडून वर्गणीच्या स्वरूपात महामंडळाकडे रक्कम जमा करण्यात येऊन या योजनेतील विमाधारकांना आर्थिक लाभ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात.
 • राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली असून, 24 लाख नोंदणीकृत विमाधारक आहेत.
 • राज्यात या योजनेची 13 रुग्णालये, 61 सेवा दवाखाने व 506 विमा वैद्यकीय व्यवसायी यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते.

दिनविशेष :

 • 1907 : फ्रँक व्हिटल, जेट इंजिनचा संशोधक याचा जन्म.
 • 1929 : प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
 • 1945 : ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ या संस्थेचा प्रारंभ. भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.