Current Affairs of 2 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 जून 2016)

चालू घडामोडी (2 जून 2016)

केंद्र सरकारकडून ‘पोस्टल पेमेंट बॅंक’ यंत्रणा :

 • देशभरातील टपाल कार्यालयांना बॅंकांचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.1 जून) घेतला.
 • ‘पोस्टल पेमेंट बॅंक’ असे या नव्या यंत्रणेचे नाव असेल.
 • मार्च 2017 पासून ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
 • जगातील सर्वांत मोठी बॅंकिंग व्यवस्था ठरेल, असा विश्‍वास सरकारने व्यक्त केला आहे.
 • तसेच ग्रामीण भागातील आर्थिक जाळे मजबूत करण्यासाठी पोस्टमन मंडळींना आयपॅड आणि स्मार्टफोनही दिले जाणार आहेत.
 • मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • देशभरात पोस्टल पेमेंट बॅंकेचे जाळे विस्तारण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाने तीन वर्षांचे उद्दिष्ट ठरविले होते.
 • मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आदेशामुळे आता आगामी वर्षभरात टपाल कार्यालयांमध्ये ‘पोस्टल पेमेंट बॅंक’ व्यवस्था कार्यान्वित केली जाईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जून 2016)

नुआन कुलसेखरा घेणार कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :

 • श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज नुआन कुलसेखरा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 • कुलसेखराने श्रीलंका क्रिकेट मंडळाला पत्र लिहून आपला हा निर्णय कळविला आहे.
 • एकदिवसीय आणि ट्ववेंटी-20 क्रिकेटची तयारी योग्यरित्या करून श्रीलंका संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा त्याने ठरविले आहे.
 • कुलसेखराने श्रीलंकेकडून 2014 मध्ये लॉर्ड्स मैदानावर शेवटची कसोटी खेळली आहे.
 • तसेच त्याने आतापर्यंत खेळलेल्या 21 सामन्यांत 48 बळी घेतले आहेत. तो एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खेळणार आहे.

जगातील सर्वांत लांब रेल्वे बोगदा :

 • जगातील सर्वांत लांब असलेला गोथार्ड रेल्वे बोगदा (दि.1 जून) स्वित्झर्लंडमध्ये खुला झाला.
 • तब्बल 54 किलोमीटर लांबीचा (सुमारे 37 मैल) हा बोगदा असून, 1947 मध्ये त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला होता.
 • तसेच त्यानंतर 69 वर्षांनी त्याचे काम पूर्ण झाले आहे.
 • स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतराजीतून काढण्यात आलेला हा बोगदा एर्स्टफ्लेडजवळील गोथार्ड खिंडीमधून सुरू होऊन तिसिनो प्रांतात समाप्त होतो.
 • तसेच या बोगद्याचा प्राथमिक आराखडा स्विस अभियंते कार्ल एडवर्ड ग्रुनर यांनी 1947 मध्ये बनविला होता.
 • मात्र, प्रशासकीय अनास्था आणि खर्चाच्या मुद्द्यावरून हे काम रेंगाळत गेले आणि अखेर 1999 मध्ये त्याला प्रारंभ झाला आणि 17 वर्षांनंतर बारा अब्ज स्विस फ्रॅंक (सुमारे बारा अब्ज डॉलर किंवा 11 अब्ज युरो) खर्च होऊन हे काम पूर्ण करण्यात आले.
 • या बोगद्यातून येत्या डिसेंबरपासून नियमित रेल्वे सेवा सुरू होणार असून, झुरिच-मिलानदरम्यानचे अंतर एक तासाने कमी होणार आहे.
 • गोथार्ड प्रकल्पाची वैशिष्ट्ये –
 • प्राथमिक आराखडा – 1947
 • प्रत्यक्ष कामाला प्रारंभ – 1999
 • कामाचा कालावधी – 17 वर्षे
 • बोगद्याचा खर्च – 11 अब्ज युरो
 • जगातील सर्वात लांब बोगदे –
 • 54 किलोमीटर गोथार्ड (स्वित्झर्लंड)
 • 53.9 किलोमीटर सैकन (जपान)
 • 50.5 किलोमीटर चॅनेल टनेल (ब्रिटन-फ्रान्सदरम्यान)

भारतीय शास्त्रज्ञास वैद्यकीय क्षेत्रात ‘स्प्रिंगर थिसीस ऍवॉर्ड’ :

 • सिंगापूर येथील अर्णब डे या भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञास वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सिंगापूरच्या प्रतिष्ठित ‘स्प्रिंगर थिसीस ऍवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.
 • त्यांनी महत्त्वाच्या ‘ए-20’ नावाच्या ट्यूमर संप्रेसर (ट्यूमरला विकसित होण्यापासून रोखणे)वर अभ्यास करण्यासाठी ट्रान्सजेनिक उंदराची निर्मिती केली.
 • अर्णब यांनी यापूर्वी मधुमेहाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘पेप्टाइड आधारित प्रोड्रग्स’चा विकास केला होता.
 • तसेच यासाठी त्यांना अमेरिकेच्या पेप्टाइड सिम्पोसियममध्ये ‘तरुण संशोधक’ म्हणून सन्मानित केले होते.
 • शास्त्रज्ञ अर्णब यांचा प्रबंध न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाने प्रस्तावित केला होता.
 • पीएचडी कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी नामांकित विज्ञान मासिक आणि पुस्तकांचे जागतिक स्तरावर प्रकाशन करणारी ‘स्प्रिंगर’ ही संस्था थिसिस (प्रबंध) पुरस्कार प्रदान करते.
 • पुरस्कार विजेत्यास 500 यूरो डॉलर रोख रक्कम दिली जाते.

युरोपियन नेशन्स कप स्पर्धेत स्पेनला विजेतेपद :

 • युरोपियन नेशन्स कप स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनमध्ये झाली, या स्पर्धेत यजमान स्पेनने विजेतेपद मिळवले.
 • तसेच सोव्हिएत युनियन उपविजेता ठरला.
 • 29 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा त्या वेळी एकाच देशाच्या यजमानपदाखाली घेण्याची प्रथा नव्हती.
 • होम आणि अवे या प्रकारातून सोव्हिएत युनियन (रशिया), डेनेस, स्पेन आणि हंगेरी हे चार संघ सेमी फायनलमध्ये आले.
 • 1960 च्या उपांत्य फेरीत राजकीय कारणास्तव स्पेनचे सर्वेसर्वा जनरल फ्रँको यांनी स्पेनला रशियात खेळण्यास परवानगी दिली नव्हती.
 • पण नियतीने या दोन्ही संघांना पुढच्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने-सामने आणले.
 • जनरल फ्रँको या वेळी कोणता निर्णय घेणार, याच्याकडे फुटबॉलजगताचे लक्ष लागले होते.
 • पण जनरल फ्रँको यांनी या वेळी जनभावनेचा आदर करीत रशियन संघाला स्पेनमध्ये प्रवेश दिला आणि 21 जून 1964 रोजी रशिया-स्पेन दरम्यान ऐतिहासिक फायनल रंगली.

दिनविशेष :

 • 1862 : अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफ़ोनचा शोध लावला.
 • 1947 : भारताची फ़ाळणी करण्याची लॉर्ड मांऊटबॅटन यांची घोषणा.
 • 1948 : शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.