आम आदमी उडाण योजना (UDAN) (Aam Aadami Udan Yojana)

आम आदमी उडाण योजना (UDAN) (Aam Aadami Udan Yojana)

*आम आदमी उडाण योजनेची घोषणा 21 ऑक्टोबर 2016 रोजी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याव्दारे करण्यात आली.

आम आदमी उडाण योजनेचा उद्देश – देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्त हवाई यात्रेची संधी उपलब्ध करणे.

*आम आदमी उडाण योजना ही प्रत्यक्षात 1 जानेवारी 2017 पासून कार्यरत होईल.

*या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकास प्रतितास 2500 रुपयांमध्ये विमान यात्रा (सेवा) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी विमानामध्ये 50% जागा राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित 50% जागा विमान कंपन्यांना चालू बाजारभावाने विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.

*या योजनेअंतर्गत 2500 रुपये प्रमाणे 50% सीट दिल्याने विमान कंपन्यांना होणार्‍या तोट्याची भरपाई म्हणून केंद्र सरकारव्दारे पुढील तीन वर्षे 2350 ते 5100 रुपये प्रति सीट अनुदान देण्यात येईल.

*या योजनेअंतर्गत केंद्र सरकारव्दारे महत्वपूर्ण उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. ते म्हणजे 2032 पर्यंत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 30 कोटींपर्यंत वाढविणे.

*या योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना केंद्र सरकारव्दारे पुढील एक वर्ष (जानेवारी 2018) विमान तिकिटांवर 90% सेवा करातून सूट देण्यात येईल. त्याचबरोबर विमान इंधनावर सध्या 14% भरावा लागणारा अबकारी कर फक्त 2% इतका भरावा लागेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.