18 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

18 October 2019 Current Affairs In Marathi

18 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2019)

ब्रिटन व युरोपीय महासंघाची नव्या ब्रेग्झिट करारावर सहमती :

  • 28 सदस्यांच्या युरोपीय महासंघातून ब्रिटनने 31 ऑक्टोबरच्या मुदतीत बाहेर पडण्यासाठी नव्या ब्रेग्झिट करारावर आपली सहमती झाली असल्याचे ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने जाहीर केले.
  • पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या कराराचे उत्कृष्ट करार म्हणून स्वागत केले; तर युरोपीय महासंघाचे अध्यक्ष जीन- क्लॉड जंकर यांनी हा ‘वाजवी आणि संतुलित करार’ असल्याचे सांगतानाच, संघटनेच्या सध्या ब्रसेल्समध्ये सुरू असलेल्या परिषदेत सदस्य देशांनी त्याला मंजुरी द्यावी अशी शिफारस केली.
  • तथापि, या कराराला मंजुरी मिळण्यासाठी जॉन्सन यांना संसदेत आवश्यक बहुमत मिळते की नाही हे अद्याप कळायचे असल्याने नव्या कराराचे भवितव्य अधांतरी आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाला पाठिंबा
    देणाऱ्या नॉर्दर्न आयरिश डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पार्टीने (डीयूपी) जॉन्सन यांच्याविरुद्ध उघड बंड केले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2019)

2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद :

  • भारतीय चलनातील 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नसल्याची माहिती आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला आरबीआयने दिलेल्या उत्तरातून याबाबतचा खुलासा झाला आहे.
  • आरबीआयने आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 2000 रुपयांच्या 3,542.991 मिलियन नोटांची छपाई केली होती. तर, 2017-18 मध्ये छपाईत कपात झाली आणि 111. 507 मिलियन नोटा छापण्यात आल्या. यानंतर 2018-19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईमध्ये अजून कपात करण्यात आली व केवळ 46.690 मिलियन नोटाच छापण्यात आल्या होत्या.
  • तर सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
  • बिझनेस स्टॅंडर्डने अधिकाऱ्यांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, दोन हजार रुपयांच्या उच्च नोटांची तस्करी करणे सुलभ आहे, त्यामुळे चलनात अधिक प्रमाणात 2 हजार रुपयांच्या नोटा आल्यास ते सरकारच्या उद्दीष्टांसाठी धोकादायक आहे.

2023 हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत शर्यतीत :

  • आगामी 2023 पुरुष हॉकी विश्वचषकासाच्या यजमानपदासाठी भारतही आता शर्यतीत उतरला आहे.
  • जानेवारी 13 ते 19 दरम्यान हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे, यासाठी हॉकी इंडियाने आपली दावेदारी सादर केली आहे. याआधी 3 वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आहे. भारताव्यतिरीक्त बेल्जियम आणि मलेशिया हे दोन देशही यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.
  • महिला हॉकी विश्वचषकासाठी आतापर्यंत 5 देशांनी आपली दावेदारी सादर केल्याचं आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने जाहीर केलंय. जर्मनी, स्पेन, नेदरलँड, मलेशिया आणि न्यूझीलंड हे 5 देश हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदाच्या शर्यतीत आहेत.
  • आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेची एक समिती 6 नोव्हेंबरला आतापर्यंत आलेल्या सर्व अर्जांना विचार करण्यासाठी भेटणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी याविषयी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.

दिनविशेष :

  • 18 ऑक्टोबरजागतिक रजोनिवृत्ती दिन
  • 18 ऑक्टोबर 1867 मध्ये सोविएत रशियाला 72 लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
  • थिऑसॉफिकल सोसायटीची 18 ऑक्टोबर 1879 मध्ये स्थापना झाली.
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली.
  • 18 ऑक्टोबर 1922 मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
  • टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची 18 ऑक्टोबर 1954 मध्ये घोषणा केली.
  • 18 ऑक्टोबर 1967 मध्ये सोविएत रशियाचे व्हेनेरा-4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2019)

You might also like
2 Comments
  1. sarika kamble says

    midc 1961 adhiniyam question paper link made pathwa please

  2. Anita says

    Thanks for joining

Leave A Reply

Your email address will not be published.