17 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 October 2019 Current Affairs In Marathi

17 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2019)

जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण :

 • जागतिक भूक निर्देशांकात 2019 मध्ये भारताचा 102 वा क्रमांक लागला असून 2018 मध्ये तो 117 देशांत 95 व्या स्थानावर होता. त्यामुळे आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे. बेलारूस, युक्रेन,
  तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत.
 • तर जागतिक भूक निर्देशांकाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
 • याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसेच वेल्ट हंगर हिल्फी ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.
 • 2000 मध्ये भारताचा 113 देशात 83 वा क्रमांक होता, तर आता 117 देशात तो 102 वा आहे. यातील भारताचे गुण 2005 मध्ये 38.9 होते ते 2010 मध्ये 32 झाले, नंतर 2010 मधील 32 वरून ते 2019 मध्ये 30.3 झाले आहेत.
 • तसेच कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2019)

अयोध्या खटल्याची सुनावणी पूर्ण :

 • अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली.
 • तर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीदिनापर्यंत म्हणजे 17 नोव्हेंबपर्यंत न्यायालय या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे.
 • अयोध्या खटल्यात मस्थस्थीचे प्रयत्न अपयशी ठरल्याने घटनापीठाने 6 ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू केली. दसऱ्यानिमित्त आठवडय़ाभराच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑक्टोबरला पुन्हा कामकाज सुरू
  केल्यानंतर दिर्घकाळ लांबलेल्या या खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली.
 • तसेच या खटल्यात सरन्यायाधीश रंजन गोगेाई यांच्या खंडपीठाने 40 दिवस हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांचे युक्तिवाद ऐकले. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने निकालाबाबत लेखी निवेदन सादर करण्यासाठी सर्व पक्षकारांना तीन
  दिवसांची मुदत दिली. न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर हे घटनापीठाचे इतर चार सदस्य आहेत.
 • अयोध्येतील 2.77 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला विराजमान यांच्यात समान विभागली जावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010 मध्ये दिला होता. त्याविरुदध सर्वोच्च न्यायालयात 14 आव्हान याचिका दाखल करण्यात करण्यात आल्या आहेत.

आशियातील सर्वात लांब ‘चेनानी-नाशरी’ बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार :

 • केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-44 वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे. ज्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता.
 • जम्मू – श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 2017 मध्ये झाले होते.
 • 2017 मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता.
 • तर तब्बल 1 हजार 200 मीटर उंचीवर व साधारण 9.02 किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर 40 किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.
 • तसेच दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जातो.

दिनविशेष :

 • 17 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
 • 17 ऑक्टोबर 1831 मध्ये मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
 • थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी 17 ऑक्टोबर 1888 मध्ये पेटंट दाखल केले.
 • पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये 17 ऑक्टोबर 1956 मध्ये सुरु झाले.
 • 17 ऑक्टोबर 1966 मध्ये बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
 • मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार 17 ऑक्टोबर 1979 मध्ये देण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2019)

You might also like
1 Comment
 1. SATISH VASANT PATANE says

  Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World