19 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

19 October 2019 Current Affairs In Marathi

19 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2019)

न्या. शरद बोबडे होणार सरन्यायाधीश :

  • सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश होणार आहेत.
  • तर ते मूळचे नागपूरचे आहेत. प्रथेनुसार न्या. रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे.
  • तसेच त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर न्या. बोबडे 47 वे सरन्यायाधीश होतील.
  • न्या. गोगोई 17 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे न्या. बोबडे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 ऑक्टोबर 2019)

काही सेंकद आधी भूकंपाची सूचना देणारे अ‍ॅप :

  • अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भूकंपाचा इशारा देणारी सूचना यंत्रणा अ‍ॅपच्या स्वरूपात विकसित करण्यात आली असून त्यामुळे भूकंपाच्या आधी सूचना मिळू शकेल, त्यातून थोडय़ा प्रमाणात प्राणहानी टाळणे शक्य होणार आहे.
  • लोमा प्रिटा येथील भूकंपाला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले असून माणसाला भूकंपाची जी जाणीव होते त्याच्या काहीकाळ आधी त्याचा इशारा यातून मिळणार आहे.
  • गव्हर्नर गॅव्हीन न्यूसम यांनी सांगितले,की भूकंपाच्या वेळी थोडा काळ आधी माहिती मिळणेही फायद्याचे ठरू शकते, या भागात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियातील प्रत्येक व्यक्तीने हे उपयोजन डाऊनलोड करावे. त्यातून त्यांच्या कुटुंबाला जीव वाचवण्याची संधी मिळू शकेल.
  • तर सेलफोनवरील या अ‍ॅपचे नाव ‘मायशेक’ असे आहे. त्यातून काही सेकंद आधी भूकंपाचा इशारा मिळतो. जमिनीत जेव्हा भूकंपलहरी उमटू लागतात तेव्हा लगेच हा संदेश हा मिळतो. त्यामुळे प्राण वाचू शकतात. यातील इशारा सूचना ही ‘शेकअलर्ट’ या सॉफ्टवेअरच्या मदतीने जारी केली जाते.
  • तसेच हे सॉफ्टवेअर अमेरिकी भूगर्भशास्त्र संस्थेचे आहे, त्यात कॅलिफोर्नियातील भूकंपांशी निगडित भूगर्भ हालचालींचे विश्लेषण केले जाते. लहरी सुरू होताच त्यांची तीव्रता मापली जाते व त्याचा इशारा दिला जातो.

केवळ महिलांचा सहभाग असलेला ऐतिहासिक स्पेसवॉक :

  • अवकाश इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या दोन महिलांनी एकाचवेळी स्पेसवॉक केले. आतापर्यंत महिलांनी स्पेसवॉक केले नाही अशातला भाग नाही, पण आताच्या स्पेसवॉकमध्ये केवळ महिलाच होत्या.
  • तर या दोन महिलांमध्ये ख्रिस्तिना कॉच, जेसिका मेयर यांचा समावेश आहे. शुक्रवारी या दोन महिलांच्या जोडीने स्पेस वॉक केले. गेल्यावेळी स्पेससूटमध्ये समस्या निर्माण झाल्याने हा ऐतिहासिक स्पेस वॉक रद्द करावा लागला होता.
  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या पॉवर कंट्रोलरची दुरूस्ती करण्यासाठी या दोघी अवकाशस्थानकाबाहेर पडल्या. प्रमाणित सुरक्षा तपासणी करून त्यांनी अवकाशस्थानकाबाहेर पाऊल ठेवले. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी
    सांगितले, की केवळ महिलांचा सहभाग असलेला स्पेसवॉक ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कॉच या विद्युत अभियंता असून, मेयर या सागरी जीवशास्त्रात पीएचडी आहेत.
  • सोविएत रशियाची व्हॅलेंतिना तेरेश्कोवा ही 1963 मध्ये पहिली महिला अवकाशयात्री ठरली होती. 1982 मध्ये स्वेतलाना सावित्स्काया ही पहिली महिला स्पेसवॉकर ठरली होती.

योगी सरकारचा मोठा निर्णय कॉलेजमध्ये होणार मोबाईलवर बंदी :

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
  • योगी सरकारच्या या निर्णयामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकांनाही कॉलेज-विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये मोबाईल फोन वापरता येणार नाही. उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाकडून याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.
  • सरकारकडून करण्यात आलेल्या एका निरीक्षणात विद्यार्थी आणि शिक्षक कॉलेजमधील बहुतांश वेळ मोबाईल फोनवर वाया घालवत असल्याचे समोर आले होते. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापकांवर देखील ही बंदी असेल असं परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

दिनविशेष:

  • तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1910 रोजी झाला.
  • जर्मनी सन 1933 मध्ये लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
  • भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान सन 1970 मध्ये हवाईदलाकडे सुपुर्द.
  • पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सन 1993 मध्ये सर सी.व्ही. रामन पदक जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.