20 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

20 October 2019 Current Affairs In Marathi

20 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 ऑक्टोबर 2019)

कंपन्यांचा प्राप्तिकर कमी केल्याने भारतात गुंतवणूक वाढणार :

 • भारताने अलीकडेच कंपन्यांचा प्राप्तिकर कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे तेथील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे.
 • भारताच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवताना नाणेनिधीने सांगितले,की हा निर्णय योग्यच असला तरी भारताने आर्थिक मजबुती वाढवली पाहिजे. आर्थिक घटकांबाबत दीर्घकालीन स्थिरता प्राप्त केली पाहिजे.
 • भारतात गेल्या दोन तिमाहीत आर्थिक वाढीचा दर कमी झाला असून तो 6.1 होता, पण 2020 मध्ये तो पुन्हा 7 टक्के होईल, असे सांगून ते म्हणाले,की पत धोरणातून मिळालेले प्रोत्साहन व कंपनी प्राप्तिकरातील कपात यामुळे गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 ऑक्टोबर 2019)

जवानांना मिळाले मजबूत स्वदेशी सुरक्षाकवच :

 • काश्मीर खोऱ्यात दहशतावद्यांशी अहोरात्र लढणाऱ्या जवानांना आता एक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे.
 • तर विशेष म्हणजे दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल देखील हे कवच निष्प्रभ ठरवणार आहे. कारण, स्वदेशी बनावटीचे मजबूत असे तब्बल 40 हजार बुलेटप्रुफ जॅकेट नुकतेच भारतीय सेनेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
 • तसेच हे स्वदेशी बनावटीचे बुलेटप्रुफ जॅकेट अत्यंत कठीण स्टीलपासून तयार झालेल्या एके- 47 राइफलच्या गोळ्या देखील झेलू शकते. शिवाय, अन्य शस्त्र देखील याच्यासमोर निष्प्रभ ठरतील.
 • बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेलमेटची देखील निर्मिती करण्यात आली आहे. हे हेलमेट देखील एके – 47 राइफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहित सेहवागनंतर अनोखी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज :

 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय निवड समितीने लोकेश राहुलला संघातून डच्चू देत रोहित शर्माला संधी दिली. रोहितनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं करत, कसोटी मालिकेतलं तिसरं शतक झळकावलं.
 • विशाखापट्टणम कसोटीत रोहितने पहिल्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावलं होतं. रांची कसोटीत अजिंक्य रहाणेसोबत रोहितने द्विशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.
 • कसोटी मालिकेत सलामीवीर रोहितने 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
 • तसेच 2005 साली पाकिस्तानविरुद्ध मालिकेत सेहवागने सलामीला येत 500 पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. यानंतर तब्बल कोणत्याही भारतीय सलामीवीराला ही कामगिरी करता आलेली नव्हती.
 • तर अखेरीस तब्बल 14 वर्षांनी रोहित शर्माने ही कामगिरी करुन दाखवली आहे.
 • याचसोबत रोहित शर्माने विनू मंकड, बुधी कुंदरन, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. या सर्व खेळाडूंनी कसोटी मालिकेत सलामीवीर या नात्याने 500 धावा पटकावल्या होत्या.

दिनविशेष:

 • 20 ऑक्टोबर हा जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन तसेच जागतिक सांख्यिकी दिन म्हणून पाळला जातो.
 • कृ.भा. बाबर यांनी सन 1950 मध्ये समाजशिक्षणमाला स्थापन केली.
 • चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे सन 1962 मध्ये चीन-भारत युद्धास सुरवात.
 • सन 1969 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना झाली.
 • हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना सन 1970 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑक्टोबर 2019)

You might also like
1 Comment
 1. Kuldeep Sanjay pawar says

  Please updest me mpsc exam.

Leave A Reply

Your email address will not be published.