9 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 September 2019 Current Affairs In Marathi

9 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2019)

इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी :

  • चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत.
  • लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या 2.1 कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला.
  • तर एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील 14 दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता
    पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
  • इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-2 मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमून गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए) एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत.
  • 2024 मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहे. याआधी भारत 2022 ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची
    चर्चा पहिल्यांदा 2017 साली झाली होती.

नदालला 19वे ‘ग्रँडस्लॅम’ :

  • तब्बल पाच तास रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरूष एकेरी मुकुटावर आपले नाव कोरले.
  • तर नदालने मेदवेदेवचा 7-5,6-3,5-7, 4-6, 6-4 असा पराभव केला. नदालचे हे 19 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.
  • नदालने इटलीच्या माटियो बेरेटिनीचा पराभव करत यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.
  • नदालने 27व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
  • तर आतापर्यंत 18 ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. हे नदालचे 19वे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी नदालने 2010, 2013 आणि 2017 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

दिनविशेष :

  • 9 सप्टेंबरहुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन.
  • 9 सप्टेंबर 1850 मध्ये कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
  • ताजिकिस्ता देश सोविएत 9 सप्टेंबर 1991 मध्ये युनियनपासून स्वतंत्र झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.