9 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
9 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जून 2019)
पंतप्रधान मोदींचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
- तसेच एका द्विपक्षीय कार्यक्रमात मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ने राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
- तर तत्पूर्वी मारदीवच्या भेटीवर आलेल्या मोदींनी सोलिह यांना टीम इंडियाची एक बॅट भेट दिली. यावर भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):
रेल्वेकडून प्रवाशांना ‘मसाज’ सेवा :
- प्रवासादरम्यान कंटाळलेल्या प्रवाशांमधील शीण निघून जावा आणि त्यांच्यामध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी यासाठी भारतीय रेल्वेकडून मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा दिली जाणार आहे.
- पश्चिम रेल्वेच्या रतलाम मंडळाने हा प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला इंदूरवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्येच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
- तसेच रेल्वेच्या माहितीनुसार, रतलाम मंडळाच्या इंदूर स्टेशनवरुन सुटणाऱ्या 39 रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रत्येक गाडीत तीन ते पाच प्रशिक्षित मसाज करणाऱ्या व्यक्तींना नियुक्त केले जाईल. मसाज करणाऱ्या या व्यक्ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांना सेवा देतील.
- तर या सुविधेसाठी प्रवाशांना 100 रुपयांपासून 300 रुपयांचपर्यंत खर्च येऊ शकतो. कारण, मसाजसाठी रेल्वेने गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम ही तीन पॅकेजेस दिली आहेत.
- गोल्ड सेवेत 15 ते 20 मिनिटांसाठी जैतून तेलाने (कमी तेलकट) मसाज केला जाईल. तर डायमंड आणि प्लॅटिनम सेवेत तेलासोबत क्रीम लावून मसाज केला जाणार आहे. मालवा एक्स्प्रेस, नवी दिल्ली इंटरसिटी एक्स्प्रेस, अहिल्यानगरी एक्स्प्रेस, अवांतिका एक्स्प्रेस, क्षिप्रा एक्स्प्रेस, नर्मदा एक्स्प्रेस, पेंचवली एक्स्प्रेस आणि उज्जयनी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे.
इंग्लंडने टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम :
- जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले.
- इंग्लंडने खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153
धावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. - तर यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला.
- तसेच इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
सर्वोत्तम कामगिरीत पारस औष्णिक विद्युत केंद्र देशात चवथे :
- केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 15 औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून, त्यामध्ये महानिर्मितीच्या 500 मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे 2019 मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते.
- सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र मध्यप्रदेश, एन.टी.पी.सी, तालचर ओरिसा, रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश तर महानिर्मिती पारस वीज केंद्र असा क्रम आहे.
- सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्र कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो.
SBIचं ग्राहकांना मोठं गिफ्ट :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)नं रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्वात पहिल्यांदा SBI ग्राहकांना मिळवून देणार आहे.
- SBIने मार्च 2019मध्ये स्वतःची सेव्हिंग्स डिपॉजिट आणि कर्जाच्या दरांना RBIच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली आहे.
- RBIनं व्याजदरां (रेपो रेट)मध्ये केलेल्या पाव टक्क्याच्या कपाताचा SBIच्या ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून SBI बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.
- तत्पूर्वी गेल्या महिन्यात एसबीआयनं व्याजदरात मोठे बदल केले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम झाला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू झाला आहे.
दिनविशेष :
- अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली.
- एडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
- भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुन 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Very good