8 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
8 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 जून 2019)
जगनमोहन मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री :
- आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगु देशम पक्षाचा दारुण पराभव करून सत्तेवर आलेल्या वायएसआर जनगमोहन रेड्डी सरकारने मंत्रिमंडळातही नवा पॅटर्न आणला आहे.
- जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या 25 सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रीपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
- एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.
- तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्य आणि कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क:
- पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.
- पती- पत्नीमध्ये उत्पन्नाच्या वाटणीचा फॉर्म्यूला ठरलेला आहे. याअंतर्गत पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडेच राहायला हवे तर एक हिस्सा पत्नीला दिला पाहिजे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
- तसेच हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत पतीने पत्नीला पगारातील 30 टक्के रक्कम द्यावी, असे आदेश दिले. न्या. संजीव सचदेवा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. पतीच्या कार्यालयाने (सीआयएसएफ) त्याच्या पगारातील तीस टक्के रक्कम कापून थेट पत्नीच्या बँक खात्यात जमा करावी, असे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे.
इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्बची खरेदी :
- भारत 300 कोटी रुपये खर्चून इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्ब तातडीने खरेदी करणार आहे. तसा करार दोन्ही देशात नुकताच झाला.
- तर याच स्पाइस बॉम्बचा मारा करून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
- तसेच हे बॉम्ब स्पाइस-2000 जातीच्या बॉम्बची अत्याधुनिक आवृत्ती असणार आहेत. या बॉम्बच्या माऱ्यामुळे शत्रूच्या इमारती तसेच बंकरचे एका क्षणात प्रचंड नुकसान होते.
- इस्रायलकडून 100 स्पाइस बॉम्ब तीन महिन्यांच्या आत भारताला पुरविले जातील.
थेरेसा मे यांचा अखेर राजीनामा :
- ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर यशस्वी तोडगा काढण्यात अयशस्वी ठरलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील.
- पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याबरोबरच त्यानी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.
- तर युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट कराराच्या मुद्द्यावर ब्रिटनच्या पार्लमेंटमधील खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात थेरेसा मे अयशस्वी ठरल्या होत्या. ब्रेक्झिट कराराला पार्लमेंटची मंजूरी मिळविण्याचे मे यांनी तीनदा केलेले प्रयत्न फोल ठरले होते.
दिनविशेष :
- 8 जून हा दिवस जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन तसेच जागतिक महासागर दिन आहे.
- लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य‘ या ग्रंथाचे 8 जून 1915 मध्ये गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.
- 8 जून 1918 रोजी नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लागला.
- एअर इंडिया ची 8 जून 1948 मध्ये मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली.
- पहिल्यांदा जागतिक महासागर दिन 8 जून 1992 रोजी साजरा केला गेला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा