9 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 February 2019 Current Affairs In Marathi

9 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2019)

रणजी करंडक विजेत्या विदर्भला 5 कोटीचे पारितोषिक जाहीर:

 • सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचे इनाम घोषित करण्यात आले आहे.
 • विदर्भ क्रिकेट असोसिएशनने 3 तर बीसीसीआयने विदर्भासाठी 2 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
 • अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 • पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात करुन आपले पहिले विजेतेपद मिळवले होते. तर रणजी करंडकानंतर विदर्भाच्या संघासमोर आता इराणी करंडकाचे आव्हान असणार आहे.

अत्याधुनिक ‘हेलिना’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:

 • हेलिकॉप्टरवरून मारा करता येईल, अशा अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची भारताने ओदिशा किनारपट्टीवरून चाचणी घेतली.
 • हेलिना‘ असे या क्षेपणास्त्राचे नाव असून ती रणगाडाविरोधी ‘नाग‘ या मार्गदर्शित क्षेपणास्त्रीची आधुनिक आवृत्ती आहे. vdh
 • हेलिनाचा माऱ्याचा पल्ला हा सात ते आठ किलोमीटर इतका आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरवरून त्याची चाचणी करण्यात आली.
 • बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरमधील एकात्मिक चाचणी केंद्रातून दुपारी 12.55 वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली.
 • अत्यंत सुरळीतपणे सुटलेल्या या क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला. यामुळे देशाची संरक्षणसिद्धता आणखी वाढली आहे.
 • तसेच यापूर्वी हेलिनाची चाचणी जैसलमेर, पोखरण येथूनही करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या सामरिक सामर्थ्यांत मोलाची भर घालणारे ठरणार आहे.

शिक्षक भरतीत खासगी संस्थांना फक्त मुलाखतीचे अधिकार:

 • खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक भरती करताना मुलाखतीसह नियुक्तीपत्र देण्याचे अधिकार शासनाने संस्थांना दिले आहेत, परंतु बुद्धिमत्ता चाचणीत उत्तीर्ण पात्रताधारकांतूनच गुणवत्तेच्या आधारे निवड करण्याचे र्निबधही घातले आहेत.
 • स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीबाबत शासनाने तपशील जाहीर केला. रिक्त जागांवर भरती करताना सर्वाना समान संधी मिळावी म्हणून शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ या पात्रता परीक्षेद्वारेच करण्यात येणार आहे.
 • खासगी शैक्षणिक संस्था याच चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांमधूनच निवड करेल. त्यांची निवड करताना मुलाखत घेण्याचा अधिकार व्यवस्थापनास मिळाला आहे.
 • शिक्षक भरतीत गैरप्रकार होत असल्याच्या जनहित याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्तेवर निवड होण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य शासनास दिले होते, पण त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या एका संस्थेच्या याचिकेवर निर्णय देताना खासगी शाळांतील निवड प्रक्रियेत राज्य शासनास हस्तक्षेप करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.
 • तर या दोन्ही न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन शिक्षण विभागाने नवा आदेश जाहीर केला. प्रत्येक पात्र उमेदवारास चाचणी परीक्षा देणे बंधनकारक ठरले आहे. ही चाचणी देण्याच्या पाच संधी मिळतील.

‘ग्रीन कार्ड’साठीची मर्यादा रद्द करण्याविषयी विधेयक:

 • ग्रीन कार्डबाबत प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा संपुष्टात आणण्याबाबतची विधेयके अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी आणि सिनेटमध्ये मांडण्यात आली आहेत. या विधेयकांचे कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी कायदेशीर वास्तव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे. Green Card
 • सिनेटमध्ये रिपब्लिकन नेते माइक ली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्या कमला हॅरिस यांनी फेअरनेस फॉर हाय-स्किल्ड इमिग्रण्ट्स अ‍ॅक्ट (एचआर 1044) विधेयक मांडले. त्यामुळे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा दूर होणार आहे.
 • लोकप्रतिनिधी सभागृहात काँग्रेस नेते झो लॉफग्रेन आणि केन बक यांनी मांडले. हे विधेयक काँग्रेसने मंजूर केल्यास आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास एच1बी व्हिसा असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना लाभ होणार आहे.

अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. सुदाम मुंडेला 10 वर्षे सक्तमजुरी:

 • 2012 मध्ये परळी येथील अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
 • तसेच याप्रकरणी पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही न्यायालयाने दोषी ठरवले. तर याप्रकरणात इतर 10 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 • गर्भपाताचे हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात एकच चर्चा होती. आता न्यायालयाने या प्रकरणावर निकाल दिला. स्त्री भ्रूणहत्या रोखणारा ‘पीसीपीएनडीटी’ आणि ‘एमटीबी’ कायद्यानुसार मुंडे दांपत्यासह पटेकर हे तिघेही दोषी ठरले आहेत.
 • तर त्यांना भारतीय दंड विधान कलम 312, 313,314, 315 आणि 318 एमटीपी ऍक्ट 3, 5 नुसार दोषी ठरविण्यात आले. याप्रकरणात त्यांना दहा वर्षे शिक्षा व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 • दरम्यान, या प्रकरणात सुदाम मुंडे मागील साडेसहा वर्षांपासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे आता त्याला ही शिक्षा वजा करून उर्वरित शिक्षा भोगावी लागणार आहे.

दिनविशेष:

 • स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.
 • सन 1900 मध्ये लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
 • महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी झाला होता.
 • स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सन 1951 पासून सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
 1. vilas nikum says

  so nice job

Leave A Reply

Your email address will not be published.