11 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 February 2019 Current Affairs In Marathi

11 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 फेब्रुवारी 2019)

केंद्राकडून तीन लाख नवीन रोजगारनिर्मिती:

  • देशात बेरोजगारी वाढली असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या खात्यात 3.79 लाख नवीन रोजगार 2017-2019 दरम्यान निर्माण झाल्याचा दावा सरकारने केला आहे. job
  • सरकारने 2019-20 च्या अर्थसंकल्पात हा दावा केला असून केंद्र सरकारच्या आस्थापनात 2017 ते 2018 या काळात 251279 रोजगार निर्माण झाल्याचे म्हटले असून ही रोजगार संख्या 1 मार्च 2019 पर्यंत 379544 ने वाढून 3615770 होण्याची शक्यता आहे. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल 1 फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात ही माहिती देण्यात आली आहे.
  • काँग्रेस व विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांना बेरोजगारीच्या प्रश्नावर घेरले असताना ही आकडेवारी महत्त्वाची असून सरकारने बेरोजगारी वाढल्याचे किंवा अपेक्षित रोजगार निर्मिती न केल्याचे आरोप फेटाळले आहेत.
  • राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्राप्तिकर विवरणपत्रे, वाहनांची विक्री यातील माहितीनुसार संघटित व असंघटित क्षेत्रात तसेच वाहतूक, हॉटेल व पायाभूत सुविधा क्षेत्रात रोजगार वाढल्याचा दावा केला आहे.

आयआयटी बॉम्बे 10 टक्के आरक्षण लागू करणार:

  • आयआयटीच्या पहिल्या वर्षांत पहिल्या टप्प्यातील प्रवेश क्षमतेत एक तृतीयांशाने वाढ करून त्यानंतर उर्वरित जागा 2020-21 या वर्षांत भरण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बेने घेतला आहे.
  • संस्थेच्या अतिरिक्त आवश्यकतेविषयी केंद्राला कळविले असल्याची माहिती संस्थेकडून मिळाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित 10 टक्के जागा एकाच वर्षांत उपलब्ध करून देणे कठीण असल्याने सामान्य प्रवगार्तून त्या दोन टप्प्यांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बेने घेतला आहे.
  • तर याच पार्श्वभूमीवर वरील प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना येत्या 2 वर्षांत 10 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • खुला वर्ग, तसेच एससी, एसटी प्रवर्गातील जागा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव जागा हे सारे मिळून आरक्षणाच्या एकूण जागांची संख्या 25 टक्केपर्यंत होत आहे. यामुळे केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावामध्ये जागांमध्ये एकूण 557 जागांची वाढ संस्थेकडून प्रास्तवित करण्यात आली आहे.

अमेरिकेचे ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेत:

  • भारतीय वायुसेनेच्या ताकदीत वाढ झाली आहे, कारण अमेरिकेच्या ‘चिनुक‘ हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. Chinook-helicopters
  • गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर ‘चिनुक‘ हेलिकॉप्टरची पहिली-वहिली बॅच पोहोचली. लवकरच ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
  • सियाचीन आणि लडाख अशा ठिकाणी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून 22 अॅपॅचे हेलिकॉप्टर्स व 15 ‘चिनुक’ हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला आहे.
  • तर याच वर्षी सर्व 15 हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील अशी शक्यता वायुसेनेकडून वर्तवण्यात आली आहे.

जन धन ठेवी 90 हजार कोटींच्या टप्प्यात:

  • जन धन या महत्त्वाच्या आर्थिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुपट्ट म्हणजे दोन लाख रुपये केल्यामुळे जन धन खात्यांतील एकूण ठेव 90 हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याच्या पायरीवर आहे.
  • अर्थमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जन धन खात्यांतील जमा रक्कम मार्च, 2017 पासून स्थिरपणे वाढत असून, आता ती रक्कम 30 जानेवारी रोजी 89,257.57 कोटी झाली आहे. 23 जानेवारी रोजी ही जमा रक्कम 88,566.92 कोटी रुपये झाली आहे.
  • प्रत्येक घराचे बँकेत खाते असावे, या हेतूने प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) 28 आॅगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारने 28 आॅगस्ट 2018 नंतर जी नवी खाती सुरू केली त्यांच्यासाठी अपघात विम्याचे संरक्षण एक लाखांऐवजी दोन लाख रुपये केले आहे. या खात्यातील ओव्हरड्रॉफ्टची मर्यादाही दुप्पट करून 10 हजार रुपये केली गेली आहे.

पंकज अडवाणीचे 32वे राष्ट्रीय विजेतेपद:

  • भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवत आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावतानाच अडवाणीने 32व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर कब्जा केला. Pankaj-Advani
  • अडवाणीच्या खात्यात आता 11 कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपदे, नऊ वेळा बिलियर्ड्सचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा ‘सिक्स-रेड’ स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद आणि नऊ वेळा स्नूकरचा विजेता अशी 32 राष्ट्रीय विजेतेपदे जमा आहेत. त्याचबरोबर अडवाणीने 21 वेळा जागतिक स्पर्धाची विजेतेपदे पटकावली आहेत. 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम फेरीवर पूर्णपणे अडवाणीचे वर्चस्व पाहायला मिळाले. अडवाणीने रावतवर 6-0 अशी मात केली.
  • महिलांच्या अंतिम फेरीत, बेंगळुरूचा वर्षां संजीव हिने महाराष्ट्राचा अरांसा सांचीझ हिला 4-2 अशी धूळ चारत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षांने उपांत्यपूर्व फेरीत अमी कमानी हिला तर उपांत्य फेरीत विद्या पिल्ले हिचा पराभव करत या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.

दिनविशेष:

  • लंडन विद्यापीठाची स्थापना 11 फेब्रुवारी 1826 मध्ये झाली.
  • सन 1830 मध्ये मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
  • पोप पायस (11वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झालेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर सन 1929 मध्ये राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
  • पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सन 1979 मध्ये अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.