8 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

8 May 2019 Current Affairs In Marathi

8 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 मे 2019)

एच-1बी व्हिसाठी मोजावे लागणार जादा पैसे :

 • अमेरिकी ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसाठीच्या अर्ज शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे.
 • तसेच शिकाऊ उमेदवारांसाठीच्या विशेष कार्यक्रमास अधिक व्यापक बनवण्याच्या उद्देशाने निधी उभारण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती, कामगार मंत्रालयाचे सचिव अलेक्झांडर अकोस्टा यांनी अमेरिकी संसद सदस्यानां दिली. या कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकी तरूणांना तंत्रज्ञानाशी निगडीत प्रशिक्षण दिले जाते.
 • तर अकोस्टा यांनी संसदीय समिती समोर 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2020 साठी कामगार मंत्रालयाचे वार्षिक अंदाजपत्रक सादर केले. मात्र एच-1 बी च्या अर्जाच्या शुल्कात किती वाढ होईल याची त्यांनी माहिती
  दिली नाही. शिवाय हेदेखील सांगितले नाही की, नेमक्या कोणत्या प्रवर्गातील अर्जदारांसाठी हे लागू असेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मे 2019)

‘आयएनएस रणजित’ नौदलातून निवृत्त :

 • 36 वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर ‘आयएनएस रणजित’ या क्षेपणास्त्र विनाशिकेने (मिसाईल डिस्ट्रॉयर) नौदलातून निवृत्ती घेतली.
 • विशाखापट्टणम येथील नाविक तळावर या विनाशिकेला अखेरची मानवंदना देण्यात आली.
 • तसेच 1983 साली ‘आयएनएस रणजित’ ही विनाशिका भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली होती.
 • तर सोव्हिएत महासंघाने तयार केलेल्या काशीन श्रेणीतील पाच विनाशिकांमधील ही तिसरी विनाशिका आहे.
 • युक्रेनमधील कोमुनारा शिपबिल्डींग प्रकल्पात ‘आयएनएस रणजित’ची उभारणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रोजेक्ट ’61 एमझेड’ अंतर्गत या विनाशिकेला ‘पोराझायुश्ची’ हे नाव देण्यात आले.
 • तर ‘नाटो’च्या यादीमध्ये या विनाशिकेला काशिन क्लास असे संबोधले गेले आहे.
 • 16 जून 1979 रोजी ही विनाशिका लॉन्च करण्यात आली आणि त्यानंतर 30 ऑक्टोबर 1981 साली सोव्हिएत महासंघाच्या नौदलात या विनाशिकेला सामील करून घेण्यात आले होते. त्यानंतर ही विनाशिका भारतीय नौदलाला देण्यात आली. भारतीय नौदलात सामील झाल्यानंतर या विनाशिकेचे नामांतरण ‘आयएनएस रणजित’ असे करण्यात आले.

आयसीएसई दहावीच्या परीक्षेत जुही कजारिया देशात पहिली :

 • कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (आयसीएसई) व बारावीचा (आयएससी) निकाल जाहीर काल झाला.
 • मुंबईच्या जमनाबाई नरसी शाळेची जुही कजारिया व पंजाबच्या मुक्तसरमधील विद्यार्थी मनहर बन्सल या दोघांनी 99.60 टक्के गुण मिळवीत आयसीएसई 10 वी परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. तर बारावीच्या परीक्षेत मुंबईतील सेंट जॉर्ज हायस्कूलची मिहिका सामंत हिने 99.75 टक्के गुण मिळवत देशात दुसरी येण्याचा मान पटकावला आहे.

‘फाइव्ह जी’ वायरलेसचा फटका हवामान अंदाजाला :

 • येत्या काही वर्षांतच एक पूर्ण लांबीचा हाय डेफिनेशन (एचडी) चित्रपट काही सेकंदातच आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) येत्या दहा वर्षांत बेफाट वाढणार आहे.
 • इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे भौतिक वस्तू जागतिक स्तरावर इंटरनेटमुळे जोडल्या जाऊन निर्माण होणारं महाजालच. परिणामी डिजिटल आणि वास्तवातील भौतिक वस्तू एकमेकांशी जोडल्या जातील. हे सर्व शक्य होणार आहे सेल्युलर
  तंत्रज्ञानाच्या पाचव्या पिढीमुळे म्हणजे ‘फाइव्ह जी’मुळे.
 • फाइव्ह जी तंत्रज्ञानाची आपण आतुरतेने वाट पाहत असतानाच अमेरिकन सरकारनं या वायरलेस रेडिओ फ्रिक्वेन्सीजच्या विविध ब्लॉक्सचा लिलाव आरंभला आहे. मात्र यापैकी काही फ्रिक्वेन्सीज पृथ्वीच्या निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या खूप जवळ असून त्यामुळे हवामान शास्त्रज्ञांना मोबाइल्स आणि इतर फाइव्ह जी प्रसारणामुळे आकडेवारी गोळा करण्यात अडचणी येतील असं वाटू लागलंय.
 • नियामक वा दूरसंचार कंपन्यांनी हा अडथळा दूर करण्यासाठी पावले न उचलल्यास फाइव्ह जी वायरलेस कव्हरेज क्षमता असलेल्या उपग्रहांना पृथ्वी निरीक्षणासाठी अमेरिकेवरून कक्षेत प्रवास सुरू असताना वातावरणातील पाण्याच्या वाफेचं प्रमाण अचूकपणे ओळखता येणार नाही. अमेरिका आणि इतर देशांतील हवामान शास्त्रज्ञ त्यांच्या प्रारूपांसाठी (मॉडेल्स) लागणाया आकडेवारीकरिता यावर अवलंबून असतात.

दिनविशेष :

 • 8 मे : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन
 • जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच 8 मे 1886 मध्ये तयार करुन विकले.
 • क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना 8 मे 1899 मध्ये फाशी.
 • 8 मे 1933 मध्ये महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.
 • 8 मे 1945 मध्ये दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.