उद्देश व विधेय

उद्देश व विधेय

Must Read (नक्की वाचा):

वाक्य व त्याचे प्रकार

 • जेव्हा आपण एखादे वाक्य बोलतो तेव्हा –

1. आपण एखाधा व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करतो.

2. त्या व्यक्ती किंवा वस्तुविषयी काही सांगतो.

 

 • दुसर्‍या शब्दात म्हणायचे झाले तर, आपल्याला ज्या विषयी बोलायचे असते ते कर्ता किंवा उद्देश्य (Subject) असावे लागते आणि त्या उद्देश्याविषयी आपल्याला काही सांगावे वा विधान करावे लागते.
 • म्हणून प्रत्येक वाक्याचे दोन भाग होतात.

1. आपण ज्या विषयी बोलत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तु यांचा उल्लेख करणार्‍या भागाला वाक्याचे उद्देश्य (Subject) असे म्हणतात.

2. उद्देश्याविषयी काही सांगणार्‍या भागाला वाक्याचे विधेय (Predicate) असे म्हणतात.

 

 • बहुतांशी वाक्याचे उद्देश्य वाक्याच्या सुरूवातीला येते. पण क्वचित ते विधेयानंतरही येते.

उदा.

 1. Here comes the bus.
 2. Sweet are the uses of adversity.
 • आज्ञार्थी वाक्यांमध्ये (Imperative sentences) उद्देश (Subject) वगळले जाते.

उदा.

 1. Sit down (येथे उद्देश्य you हे गृहीत धरले आहे.)
 2. Thank him (येथेसुद्धा उद्देश्य you गृहीत धरले आहे.)
Must Read (नक्की वाचा):

Find Related Word Questions Set 3

You might also like
2 Comments
 1. बालाजी मुदगडे says

  बागेत फुलपाखरे उडत होती. या वाक्यातील उद्देश कोणते

 2. बालाजी मुदगडे says

  बागेत फुलपाखरे उडत होती.या वाक्यातील उद्देश ओळखा

Leave A Reply

Your email address will not be published.