8 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एक देश, एक राशन कार्ड
एक देश, एक राशन कार्ड

8 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 फेब्रुवरी 2020)

बोडो कराराने आसाममध्ये शांततेची पहाट :

 • लोकांच्या पाठिंब्यामुळेच बोडो शांतता करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकल्या त्यामुळे आता आसाममध्ये शांततेची नवी पहाट उगवली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
 • तर बोडो शांतता करारानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, या करारामुळे आसाममध्ये चिरकाल शांतता नांदण्याची आशा आहे. आता ईशान्येकडील शांतता व विकासासाठी सर्वानी एकत्र काम करण्याची गरज आहे. आसाम व ईशान्येकडील राज्यात हिंसाचार पुन्हा सुरू होऊ देणार नाही.
 • तसेच ईशान्येकडील अतिरेकी, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी यांनी बोडो बंडखोरांकडून प्रेरणा घेऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
 • नागरिकत्व कायद्याबाबत अफवा पसरवल्या जात असून या कायद्यामुळे परदेशातील लाखो निर्वासित राज्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे पण ते खरे नाही असे सांगून ते म्हणाले, की बोडो करार यापूर्वी 1993 व 2003 मध्येही झाले पण त्यामुळे बोडो बहुल क्षेत्रात शांतता निर्माण झाली नाही.
 • आताच्या करारामुळे सर्व घटकांचा विजय झाला असून त्यात कुणाचाही तोटा नाही.

एक जूनपासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना देशभरात होणार लागू :

 • मोदी सरकारची ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही महत्वाची योजना देशभरात 1 जूनपासून लागू होणार आहे.
 • तर सध्या 12 राज्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत दिली.
 • तसेच दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या आपल्या देशात कोठेही रेशन मिळण्याची सुविधा देण्यासाठी ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजना एक जूनपासून लागू करण्यात येणार आहे.
 • सन 2013 मध्ये 11 राज्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर सर्व राज्ये या योजनेंतर्गत येणार आहेत. यापूर्वी ही योजना आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, राजस्थान, हरयाणा, त्रिपुरा, गोवा, झारखंड आणि मध्य प्रदेशात सुरु करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धात प्रशांत, अपूर्वाला राष्ट्रीय विजेतेपद :

 • विश्वविजेत्या प्रशांत मोरे याने पहिला सेट गमावूनही चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवे याचे आव्हान परतवून लावत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली.
 • तर जळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात विश्वविजेत्या एस. अपूर्वा (एलआयसी) हिने माजी विश्वविजेती रश्मी कुमारी हिला सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपद पटकावले.
 • श्री शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी रात्री रंगलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीपने पहिला सेट 25-16 असा जिंकत प्रशांतसमोर कडवे आव्हान उभे केले. मात्र अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव गाठीशी असलेल्या प्रशांतने हार न मानता पुढील दोन्ही सेट सहजपणे जिंकत राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले.
 • तसेच त्याने ही लढत 16-25, 25-10, 27-7 अशा फरकाने जिंकली.
 • महिलांमध्ये दोन्ही विश्वविजेत्या खेळाडू अंतिम फेरीत आमने-सामने आल्यामुळे या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण अपूर्वाने 25-11, 25-11 अशा फरकाने रश्मीचा प्रतिकार मोडून काढला.

दिनविशेष:

 • भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.
 • सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
 • NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सन 1971 पासून सुरू झाला.
 • सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.
 • छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.