9 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

कर्णधार हरमनप्रीत कौर
कर्णधार हरमनप्रीत कौर

9 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 फेब्रुवरी 2020)

हरमनप्रीत कौरची अनोख्या विक्रमाशी बरोबरी :

  • ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.
  • मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेलं अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली सर्वोत्तम साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेलं 174 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं.
  • तर 7 विकेट राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.
  • दरम्यान या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
  • तर तिने महिला टी-20 क्रिकेटमध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिकवेळा नाबाद राहण्याच्या विंडीजच्या डेंड्रा डॉटीनच्या विक्रमाशी हरमनप्रीतने बरोबरी केली.

पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले ‘आझाद काश्मीर’ नाव :

  • ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाकिस्तानच्या एका घोडेस्वाराला काश्मीरप्रश्नाची उबळ आली असून, त्याने आपल्या घोड्याचे नाव आझाद काश्मीर ठेवले आहे.
  • 2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा घोडेस्वार उस्मान खान हा पात्र ठरला आहे. आता ऑलिम्पिकच्या तयारीसाठी त्याने सरावास सुरुवात केली आहे.
  • तसेच त्याने ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीसाठी आणलेल्या घोड्याला आझाद काश्मीर असे नाव दिले आहे. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने उस्मानच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
  • तर उस्मान खान याने 2019 च्या एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियामधून एक घोडा खरेदी केला होता. या घोड्याचे नाव त्याने आझाद काश्मीर असे ठेवले असून. ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारी करण्यासाठी या घोड्यासह तो उतरणार आहे. दरम्यान, याच क्रीडाप्रकारात भारताचा फवाद मिर्झा हासुद्धा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
  • त्यामुळे पाकिस्तानी पाकिस्तानी घोडेस्वाराने केलेल्या आगळीकीविरोधात कायदेशीर तक्रार करण्याचा विचार भारतीय ऑलिम्पिक संघटना करत आहे.

आरबीआयचा नोटा छापण्यास स्पष्ट नकार :

  • केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होऊन आठवडाही उलटण्याआधी मोदी सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा धक्का दिला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महसुली तूट वाढेल, असा अंदाज अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला होता.
  • तर यासाठी मोदी सरकारला रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षा होती. आरबीआय नोटा छापून महसुली तूट कमी करण्यास मदत करेल, अशी आशा सरकारला होती. मात्र नोटा छापण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
  • तर गेल्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महसुली तूट वाढणार असल्याचं म्हटलं होतं. यंदा महसुली तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.8 टक्के राहील, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महसुली तूट 3.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

उद्योगपती अनिल अंबानी आता धनाढ्य नाहीत :

  • रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे एकेकाळी धनाढय़ उद्योगपती होते, मात्र भारतातील दूरसंचार बाजारपेठेत अनर्थपूर्ण घडामोडी घडल्याने अंबानी आता धनाढय़ नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.
  • चीनमधील अग्रगण्य बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडून 680 दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्याबाबतच्या सुनावणीच्या वेळी वकिलांनी वरील बाब न्यायालयात स्पष्ट केली.
  • अनिल अंबानी यांनी 212 मध्ये 925 दशलक्ष डॉलरच्या कर्जाला वैयक्तिक हमी दिली होती. त्याबाबतचा तपशील देण्याची मागणी दी इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि., मुंबई शाखा, चायना डेव्हलपमेण्ट बँक आणि एग्झिम बँक ऑफ चायना यांनी केली आहे.
  • मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही हमीसाठी अधिकार दिल्याचा अनिल अंबानी यांनी इन्कार केला आहे.

‘एचडीआयएल’ची मालमत्ता विकण्यास स्थगिती :

  • पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेची (पीएमसी) थकबाकी फेडण्यासाठी दिवाळखोरीतील हाऊसिंग डेव्हलपमेण्ट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.ची (एचडीआयएल) विक्री करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या याचिकेची सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्य कान्त यांच्या पीठाने दखल घेतली.
  • रिझव्‍‌र्ह बँकेच्या याचिकेवर पीठाने सरोश दमाणिया यांच्यासह अन्य पक्षकारांवर नोटिसा बजावल्या आहेत.
    पीएमसी बँक खातेदारांना त्यांची थकीत रक्कम मिळावी यासाठी दमाणिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दिनविशेष:

  • स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.
  • सन 1900 मध्ये लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
  • महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी झाला होता.
  • स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सन 1951 पासून सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.