7 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs
7 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2021)
करोनावर ‘हेटेरो’च्या औषधास मान्यता :
- हेटेरो या औषध उत्पादक कंपनीने कोविड प्रतिबंधासाठी तयार केलेल्या टोसिलीझुमॅबसारखेच गुणधर्म असलेल्या औषधास भारताच्या औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
- तसेच कंपनीने हे औषध ‘टोसिरा’ नावाने बाजारात आणण्याचे ठरवले आहे.
- तर या औषधाला मान्यता मिळाल्याने आता वैद्यकीय व्यावसायिकांना या औषधाचा वापर रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रौढांवर करता येणार आहे.
- ज्या रुग्णांना प्राणवायू द्यावा लागत असतो किंवा वेगळ्या पद्धतीने प्राणवायूचा पुरवठा केला जात असतो त्यांच्यात हे औषध प्रभावी ठरत आहे.
- कंपनीने टोसिलीझुमॅबच्या 400 मि.ग्रॅ. व 20 मि.ली औषधाच्या समान असलेली जैविक आवृत्ती तयार केली असून रोशच्या अॅक्टेम्रा व रॉअॅक्टेम्रा या औषधांनाही हे औषध पर्याय ठरणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
आनंद कुमार यांचा गौरव :
- ‘सुपर 30’चे संस्थापक आणि गणितज्ञ आनंद कुमार यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषद (एनसीटीएस)कडून ‘साराभाई टिचर्स सायंटिस्ट नॅशनल ऑनररी अवॉर्ड 2021’ देऊन गौरविण्यात आले.
- गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणे आणि गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ‘आयआयटी’ची प्रवेश परीक्षा ‘जेईई’मध्ये यश प्राप्त करून देणे यासाठी आनंद कुमार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- आनंद कुमार गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
- शिक्षक दिनी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गौरवण्याबरोबरच त्यांना राष्ट्रीय शिक्षक वैज्ञानिक परिषदेचे आजीवन सभासदत्वही बहाल करण्यात आले.
- गुजरातमधील रमन विज्ञान आणि तंत्रज्ञान फाऊंडेशनने शिक्षकांमध्ये वैज्ञानिक विचारप्रणाली विकसित करण्यासाठी ‘एनसीटीएस’ची स्थापना केली.
‘स्पेस एक्स’ ची पहिली नागरी समानवी अवकाश मोहिम येत्या 15 सप्टेंबरला :
- अवकाशात समानवी मोहिम आखणारी पहिली खाजगी कंपनी अशी ओळख असलेल्या ‘स्पेस एक्स’ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
- आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत अंतराळवीर तसंच आवश्यक ‘कार्गो’ ची ने – आण करण्याचे काम अमेरिकेची स्पेस एक्स कंपनी करत होती.
- तसेच आता स्पेस एक्स कंपनी अवकाश पर्यटनाला सुरुवात करत आहे.
- तर येत्या 15 सप्टेंबरला चार नागरीक स्पेस एक्सच्या ‘अवकाश कुपी’तून 3 दिवसांच्या अवकाश सफरीकरता रवाना होणार आहेत.
- Inspiration4 असं या मोहिमेचे नाव असणार आहे. अमेरिकेतील अब्जाधीश जरेड इसाकमॅन हे या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.
- Inspiration4 मोहिमेची तयारी जोरात सुरू असून सुमारे 12 टन वजनाची अवकाश कुपी ही Falcon 9 या रॉकेटद्वारे अवकाशात झेपावणार आहे.
‘3 AC इकॉनॉमी कोच’ प्रवाशांच्या सेवेत दाखल :
- भारतीय रेल्वेच्या या विकासात्मक प्रवासात नवीन एसी थ्री टायर इकॉनॉमी क्लास कोचचा देखील प्रवेश झाला आहे.
- तर या नवीन कोचने आजपासून आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
- प्रथमच, ट्रेन क्रमांक 02403 प्रयागराज-जयपूर एक्सप्रेसला हा कोच जोडण्यात आला आहे.
- तसेच 3-एसी कोचमधील 72 बर्थच्या तुलनेत नवीन एसी इकॉनॉमी कोचमध्ये 83 बर्थ आहेत.
- तसेच, या कोचची भाडे रचना 3AC कोचपेक्षा 8 टक्के कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी पैशात प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे.
- उत्तर-मध्य रेल्वे झोनला भारतीय रेल्वेने अशात हे चार कोच दिले आहे. यामधील प्रवासासाठी तिकीट बुकींग 28 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे.
- तसेच या ट्रेनमध्ये प्रवाशांना बऱ्याच सुविधा मिळणार आहेत. यामध्ये सात कोच असून, प्रत्येक कोचमध्ये सहा सीसीटीव्ही बसवलेले आहेत.
- तर सुरुवातीला, 50 नवीन 3AC इकॉनॉमी कोच वेगवेगळ्या झोनमध्ये सेवा देण्यासाठी तयार आहेत.
पात्र लोकांना लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य:
- हिमाचल प्रदेश हे सर्व पात्र लोकांना करोना लसीचा पहिला डोस देणारे पहिले राज्य बनले आहे.
- तर सिक्कीम, दादरा आणि नगर हवेलीने देखील हे लक्ष्य पूर्ण केलंय, असेही त्यांनी सांगितले.
- दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 25 लाख 23 हजार 89 जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
- लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 68.75 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे.
भारतचा इंग्लंड वर विजय :
- अखेर 50 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारताच्या विजयाची क्रांती घडली.
- मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला.
- यापूर्वी, 1971मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती.
- तर यंदा विराट कोहलीच्या शिलेदारांनी हा पराक्रम करताना पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
- तसेच पाचवी कसोटी 10 सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल.
दिनविशेष:
- आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.
- हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 मध्ये झाला.
- 7 सप्टेंबर 1906 मध्ये बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
- सन 1923 मध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
- सन 1931 मध्ये दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात सन 1978 मध्ये यश.