6 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

कृष्णा नागर
कृष्णा नागर

6 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2021)

देशभरातील 44 उत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सन्मान :

  • शिक्षक दिनानिमित्त देशभरातील 44 उत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
  • तर या शिक्षकांना शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी, शिक्षणाचे नवीन मार्ग विकसित करण्यासह विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी केलेल्या अनुकरणीय योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात आले.
  • तसेच हा सोहळा ऑनलाइन पार पडला. यामध्ये पुरस्कारप्राप्त 44 शिक्षकांच्या कार्यावर आधारीत माहितीपट दाखवण्यात आले.
  • आजपासून शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शिक्षक पर्व 2021ची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम 17 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन सुरू राहील.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजला रौप्यपदक :

  • टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी सुहास यशिराज यांनी रौप्यपदक जिंकत पदकांमध्ये भर टाकली आहे.
  • पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यशिराज यांनी अंतिम फेरी गाठली होती.
  • सुहास यांनी सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.
  • सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे.
  • सुहास यथिराज पदक जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी ठरले आहेत.

कृष्णा नागरने जिंकलं सुवर्णपदक :

  • टोक्यो पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं असून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
  • तर यासोबत भारताच्या पदकसंख्येने 19 हा विक्रमी आकडा गाठला आहे.
  • कृष्णा नागरच्या विजयासोबतच भारताच्या खात्यात 5 सुवर्णपदकं, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश झाला आहे.
  • कृष्णा नागरने हाँगकाँगच्या शू मान कायशीचा परभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
  • तसेच यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे.

विराटनं केली मोठ्या विक्रमाची नोंद :

  • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या खात्यात नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
  • इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहलीने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
  • तर विराटने 210व्या डावात हा पराक्रम केला. मात्र, त्याला सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडता आला नाही.
  • भारताकडून सर्वात जलद 10 हजार प्रथम श्रेणी धावा करण्याचा विक्रम अजय शर्माच्या नावावर आहे. त्याने केवळ 160 डावांमध्ये हा पराक्रम केला.

दिनविशेष :

  • सन 1522 मध्ये फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.
  • भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 मध्ये झाला.
  • सन 1965 मध्ये 6 सप्टेंबर रोजी पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.
  • सन 1993 मध्ये ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.