6 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ब्रिक्स वार्षिक परिषदेच्या निमित्ताने मोदी- जिनपिंग यांची आभासी भेट:
ब्रिक्स वार्षिक परिषदेच्या निमित्ताने मोदी- जिनपिंग यांची आभासी भेट

6 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2020)

भारत बायोटेकच्या लसीची सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू:

  • देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात लस विकसित करण्यात येत आहे.
  • करोनावरील लस विकसित करत असलेल्या भारत बायोटेकच्या लसीची सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
  • अशातच भारत बायोटेकनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोव्हॅक्सीन या लसीत भारत बायोटेक असं औषध वापरणार आहे ज्यामुळे प्रतिकारक शक्ती अधिक आणि मोठ्या कालावधीसाठी वाढणार आहे.
  • भारत बायोटेक आपल्या कोव्हॅक्सीन या लसीत Alhydroxiquim-II या औषधाचा वापर करणार आहे.
  • Alhydroxiquim-II सहाय्यक म्हणून काम करणार असून त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढणार आहे.
  • ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारनं यापूर्वी जाहीर केलं होतं.अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान दिली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2020)

ब्रिक्स वार्षिक परिषदेच्या निमित्ताने मोदी- जिनपिंग यांची आभासी भेट:

  • पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा 17 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या ब्रिक्स वार्षिक परिषदेच्या निमित्ताने आभासी संवाद होण्याची शक्यता आहे.
  • ब्रिक्सची वार्षिक परिषद 17 नोव्हेंबरला दूरचित्रसंवादाद्वारे होईल, असे पाच राष्ट्रांच्या या संघटनेचा अध्यक्ष असलेल्या रशियाने सोमवारी जाहीर केली.
  • 3.6 दशलक्षाहून अधिक, किंवा जगाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा ब्रिक्स (ब्राझिल- रशिया, भारत- चीन- दक्षिण आफ्रिका) हा एक प्रभावशाली गट म्हणून ओळखला जातो. ब्रिक्स देशांचे एकूण 16.6 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे.
  • ‘जागतिक स्थैर्य, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण विकासाकरता ब्रिक्स भागीदारी’ ही ब्रिक्स देशाच्या नेत्यांच्या बैठकीची संकल्पना आहे’, असे रशियन सरकारने एका निवेदनात सांगितले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिक्सच्या सर्व परिषद बैठकांमध्ये भाग घेतला आहे.
  • हे दोन्ही नेते आभासी परिषदेतही सहभागी होणार आहेत, अशी माहिती या बहुपक्षीय परिषदेच्या तयारीशी संबंधित असलेल्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने दिली.
  • गेल्या वर्षी ब्रिक्स परिषद ब्राझिलची राजधानी ब्राझिलिया येथे झाली होती. तिच्या निमित्ताने मोदी व जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठकही झाली होती.
  • यावर्षी मे महिन्यापासून भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखच्या सीमेवर तिढा निर्माण झाल्याने त्यांचे परस्पर संबंध तणावाचे झाले आहेत.

हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधाबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर:

  • यकृताचा कर्करोग आणि यकृताची सूज या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ हार्वे जे. ऑल्टर, चार्ल्स एम. राइस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.
  • ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या कार्यामुळे रक्तातील ‘हेपॅटायटिस सी’ या रोगाचे मुख्य कारण स्पष्ट होण्यास मदत झाली.
  • त्याचबरोबर चाचण्या आणि औषधे विकसित करून लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले, अशा शब्दांत नोबेल समितीने शास्त्रज्ञांचा गौरव केला.
  • वैद्यकशास्त्रातील या ऐतिहासिक शोधाबद्दल नोबेल समितीने तिन्ही शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
  • त्यांच्या शोधामुळे ‘हेपॅटायटिस सी’ विषाणूविरोधी औषधांची निर्मिती वेगाने करता आली.
  • हा रोग आता बरा करता येतो आणि जगातून या विषाणूचे समूळ उच्चाटन होऊ शकते,’’ अशी आशा नोबेल समितीने व्यक्त केली.

भारताने रेमडेसिविर औषधाच्या तीन हजार कुप्या भेट दिल्या:

  • भारताने म्यानमारला करोनावरील उपचारात गुणकारी असलेल्या रेमडेसिविर या औषधाच्या तीन हजार कुप्या भेट दिल्या आहेत.
  • लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे व परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी म्यानमारचा दौरा सुरू केला असून त्यांनी सोमवारी रेमडेसिविरच्या या कुप्या ‘स्टेट कौन्सिलर’ आँग सान स्यू की यांच्याकडे सुपूर्द केल्या.
  • जनरल नरवणे व हर्षवर्धन शृंगला हे रविवारी दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर आले असून दळणवळण, संरक्षण व सुरक्षा या क्षेत्रात त्यांनी संरक्षण वाढवण्यावर भर दिला आहे.
  • लष्करप्रमुख व परराष्ट्र सचिव यांनी भारताचे राजदूत सौरभ कुमार यांच्यासमवेत आँग सान स्यू की यांची नेपीतॉ येथे भेट घेतली. त्यात त्यांनी द्विपक्षीय संबंध तसेच इतर मुद्दय़ांवर चर्चा केली.
  • भारताने कोविड 19 लढय़ात म्यानमारला मदतीचा भाग म्हणून रेमडेसिविरच्या तीन हजार कुप्या दिल्या आहेत. हे औषध नसेतून दिले जाते.

हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल विमाने सहभागी होणार:

  • येत्या 8 ऑक्टोबरला साजरा होत असलेल्या हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत.
  • 1932 मध्ये 8 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती, त्यामुळे हा दिवस ‘हवाई दल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • यंदा गाझियाबाद येथील हिंडन हवाईतळावर वार्षिक संचलन होणार आहे. इतर विमानांबरोबरच राफेल विमाने त्या दिवशी सहभागी होतील.
  • भारतीय हवाई दलाच्या एएफडे 2020 या हॅशटॅगवर म्हटले आहे,की राफेल ही लढाऊ जेट विमानांची नवी आवृत्ती आहे.
  • 10 सप्टेंबरला पाच राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आली होती.
  • फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हिएशनने ती तयार केली असून अचूक मारा करण्यात ती उपयोगी आहेत. एकूण 59 हजार कोटी रुपयांचा करार 36 राफेल विमानांसाठी करण्यात आला.
  • आणखी पाच विमाने नोव्हेंबपर्यंत भारताला मिळणार आहेत. रशियाकडून सुखोई घेतल्यानंतर भारताने लढाऊ जेट विमानांची खरेदी 23 वर्षांनी केली आहे. त्यावर मिटीऑर क्षेपणास्त्र व स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ग्लोबल हब व्हावा ही इच्छा-नरेंद्र मोदी:

  • भारत हा देश AI साठी अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ग्लोबल हब व्हावा ही आमची इच्छा आहे. त्या दृष्टीने देशाचे प्रयत्नही सुरु आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या बुद्धिजीवीतेला मिळालेलं एक वरदान आहे.
  • टूल आणि टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्हर्च्युअल परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
  • भारतात जगातली सगळ्यात युनिक आयडेंटेटी सिस्टीम आहे जिचं नाव आधार आहे.
  • तर सर्वात नावीन्यपूर्ण अशी डिजिटल पेमेंट सिस्टीम आहे ज्याचं नाव युपीआय आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

टेस्ला भारतात गिगाफॅक्ट्री उभारण्याच्या तयारीत:

  • कर्नाटकमधील बंगळुरु शहरामध्ये राज्य सरकारने टेस्ला या इलेक्ट्रीक कारच्या गिगाफॅक्ट्रीसाठी तयारी सुरु केली आहे.
  • यासंदर्भात अमेरिकेतील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टेस्लासोबत एक बैठकही पार पडली असून भारतामधील संशोधन आणि कंपनीचा देशात विस्तार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या इतर कामांसंदर्भातील केंद्र उभारण्यासाठी जमीन देण्यास कर्नाटक सरकार उत्सुक आहे.
  • टेस्ला कंपनीला रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (आर अ‍ॅण्ड डी) सेंटर उभारण्यासाठी तसेच निर्मितीच्या दृष्टीने कारखाना उभारण्यासाठी हवी असणारी सर्व मदत करण्यास तयार आहोत.
  • इलेक्ट्रीक व्हेइकल्ससाठी बंगळुरु हे उत्तम ठिकाण आहे.
  • टेस्ला या आयत्या तयार इकोसिस्टीमचा फायदा घेऊ शकते,” असं कर्नाटकच्या आर्थिक आणि औद्योगिक विभागाचे मुख्य अर्थ सचिव असणाऱ्या गौरव गुप्ता यांनी द इकनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितलं.
  • कार गिगाफॅक्ट्रीमध्ये टेस्लाच्या गाड्या, बॅटरींचे उत्पादन घेतलं जाईल असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
  • टेस्लाचे भारतातील पहिलं केंद्र बंगळुरुमध्ये उभारण्यासाठी प्रशासन जोमाने तयारीला लागलं आहे. जुलै महिन्यामध्ये टेस्लाने टोयोटाच्या ताब्यातील युनिट ताब्यात घेतलं आहे.
  • याचप्रमाणे इथर एनर्जी, बॉश, डियामेलर, महिंद्रा इलेक्ट्रॉनिक्स, ओला मोबॅलिटी यासारख्या कंपन्याही याच भागामध्ये आहेत.

भारत-अमेरिकेत होणार टू प्लस टू चर्चा:

  • येत्या 26-27 ऑक्टोबर दरम्यान भारत आणि अमेरिकेत तिसरी टू प्लस टू चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • या बैठकीत नरेंद्र मोदी सरकार भू-स्थानिक सहकार्यासाठी BECA करारावर स्वाक्षरी करु शकते.
  • अमेरिकेकडून MQ-9B हे सशस्त्र ड्रोन विकत घेण्यासाठी बीईसीए करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
  • शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करण्यासाठी ही अमेरिकन ड्रोन विमाने भू-स्थानिक डाटाचा वापर करतात.
  • BECA करारामुळे भारताला अमेरिकेचे भू-स्थानिक नकाशे वापरण्याची मुभा मिळणार आहे.
  • याच आठवडयात मंत्री स्तरावरील चर्चेतून भारत-अमेरिकेतील संवादाचा विस्तार होणार आहे.
  • येत्या सहा ऑक्टोबर रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकन समकक्ष माइक पॉम्पियो यांची टोक्योत भेट घेतील.
  • ऑक्टोंबरच्या अखेरीस अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पर आणि राजनाथ सिंह दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत टू प्लस टू चर्चेत सहभागी होतील. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
  • टू प्लस टू बैठकीत BECA करारावर स्वाक्षरी होणे, सर्वात महत्त्वपूर्ण घडामोड असेल.
  • टू प्लस टू बैठकी दरम्यान अमेरिकेचे दोन्ही मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा- क्विटोव्हा, त्सित्सिपासची विजयी घोडदौड:

  • अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, दोन वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी पेट्रा क्विटोव्हा आणि पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांनी चौथ्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्याचा पाडाव करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली.
  • रशियाच्या 13व्या मानांकित आंद्रेय रुबलेव्ह आणि ऑस्ट्रियाच्या तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थिम यांनीही उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
  • सर्बियाच्या जोकोव्हिचने रशियाच्या करेन खाचानोव्ह याचा कडवा प्रतिकार 6-4, 6-3, 6-3 असा सहज मोडीत काढला.
  • काही आठवडय़ांपूर्वी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून गैरवर्तणुकीमुळे हकालपट्टी करण्यात आलेल्या जोकोव्हिचने रागावर काहीसे नियंत्रण राखले आहे.
  • त्याने फ्रे ंच स्पर्धेतील 72वा विजय मिळवत 14व्यांदा उपांत्यपूर्व फे रीत मजल मारण्याची करामत केली.
  • खाचानोव्हविरुद्धच्या पाचव्या लढतीत जोकोव्हिचने चौथ्या विजयाची नोंद केली.

दिनविशेष:

  • रेडिओटेलेफोनी चे संशोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1866 मध्ये झाला.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर सन 1949 रोजी खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
  • सन 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
  • जेसन लुइस याने 2007 या वर्षी वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.