7 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या तैनातीला मंजुरी:
‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या तैनातीला मंजुरी

7 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2020)

जवानांसाठी दिली 72,500 असॉल्ट रायफल्सची ऑर्डर:

  • अमेरिकन कंपनीला 72,500 सिज-16 असॉल्ट रायफल्सचा पुरवठा करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
  • पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्याहाती या असॉल्ट रायफल्स देण्यात येतील.
  • फास्ट ट्रॅक प्रोसिजर अंतर्गत लष्करासाठी ७२,५०० असॉल्ट रायफल्स अमेरिकेकडून खरेदी करायला भारत सरकारने परवानगी दिली आहे.
  • पहिल्या बॅचमधील असॉल्ट रायफल्स जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांना दुसऱ्या बॅचमधील रायफल्सचा पुरवठा करण्यात येईल.
  • ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामध्ये या इन्सास रायफलची निर्मिती करण्यात येते. उर्वरित फोर्सेसना AK-203 रायफल देण्यात येईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2020)

‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या तैनातीला मंजुरी:

  • पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती असताना केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने सुपरसॉनिक ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या सैन्यदलातील समावेश आणि तैनातीला मंजुरी दिली आहे.
  • जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या 700 किलोमीटर रेंज असलेल्या ‘शौर्य’ क्षेपणास्त्राची शनिवारी केलेली चाचणी यशस्वी ठरली होती.
  • पाणबुडीतून डागले जाणारे 5हजार किलोमीटर रेंज असलेल्या K-5 क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा प्रगती झाली आहे.
  • शौर्य मिसाइल पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या BA-05 क्षेपणास्त्राची जमिनीवरील आवृत्ती आहे.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओने या दोन्ही क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे.
  • ओदिशाच्या बालासोरमध्ये तीन ऑक्टोबर रोजी शौर्यची चाचणी करण्यात आली. ताफ्यात समाविष्ट करण्याआधीची ही अंतिम चाचणी होती.
  • शौर्यच्या निर्मितीत अनेक अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला आहे. त्याचा आकार खूप आटोपशीर आहे.
  • त्याचा व्यास कमी असल्याने त्याला हवेचा अवरोध कमी होतो. ते एकाच ट्रकवर बसून डागता येते. त्यामुळे वाहतुकीस सुलभ आहे आणि शत्रूला सहजपणे दिसत नाही.

भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवेल:

  • राणी रामपालचा बहारदार खेळ आणि सविता पुनियाचे भक्कम गोलरक्षण या बळावर भारतीय महिला हॉकी संघ पुढील वर्षी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवेल, असा विश्वास माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला.
  • राणी ही एक सर्वोत्तम कर्णधार आहे. राणी आणि सविता भारताला ऑलिम्पिक पदकापर्यंत नेऊ शकतील.
  • भारतीय हॉकी संघ अतिशय मेहनतीने खेळ उंचावत असून, टोक्यामध्ये त्यांची कामगिरी लक्षवेधी असेल,’’ असे धनराज यांनी सांगितले.
  • राणीने 2018 मध्ये भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक जिंकून दिले. याचप्रमाणे सलग दुसऱ्यांदा संघाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून दिले.
  • गेली 10-15 वर्षे भारतीय खेळाडू ज्या पद्धतीने हॉकी खेळत आहेत, त्याची तुलनाच होऊ शकत नाही.
  • तंदुरुस्तीच्या क्षमतेमुळे सध्याच्या हॉकीपटूंचा खेळ उंचावत आहे. सध्याचे हॉकीपटू त्याकड गांभीर्याने पाहात आहेत,’’ असे धनराज यांनी सांगितले.

दिनविशेष:

  • 7 ऑक्टोबर ख्रिस्त पूर्व 3761 हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.
  • महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र 7 ऑक्टोबर 1919 मध्ये सुरू केले.
  • 7 ऑक्टोबर 1919 मध्ये के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.
  • मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा 7 ऑक्टोबर 1866 जन्म.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.