6 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 December 2019 Current Affairs In Marathi
6 December 2019 Current Affairs In Marathi

6 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 डिसेंबर 2019)

दशकातील सर्वात मोठी विकासदर अंदाज कपात :

 • प्रमुख व्याजदर स्थिर ठेवताना रिझव्‍‌र्ह बँकेने केवळ चार महिन्यांच्या फरकाने विकासदर अंदाजात 1.90 टक्के कपात ही दशकातील सर्वात मोठी दर अंदाज कपात ठरली आहे.
 • तर चालू वित्त वर्षांसाठीचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अंदाज 5 टक्के व्यक्त करण्यात आला असून, चार महिन्यांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने 6.9 टक्के विकासदराचे भाकीत केले होते.
 • तसेच चालू वित्त वर्षांतील आतापर्यंतच्या पाच द्विमासिक पतधोरणादरम्यान झालेली एकूण 2.40 टक्के विकास दर अंदाज कपात ही 2012-13 मधील 1.80 टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे.
 • रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारच्या पतधोरणाद्वारे व्याजदर बदलेले नाहीत. यापूर्वी सलग पाच पतधोरण आढावा बैठकीत विकास दराला प्राधान्य देताना व्याजदर कपात केली गेली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2019)

‘एटीएम’चे नियम बदलणार :

 • रिझर्व्ह बँकेने आजच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला.
 • तसेच बँकेने भलेही रेपो रेटमध्ये कपात केलेली नसली तरी सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत काही मोठे निर्णय घेतलेत. आरबीआयने एटीएमबाबत काही मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचे व एक विशेष कार्ड लाँच करण्याचे संकेत दिले आहेत.
 • तर सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे ATM बद्दलचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे.
 • त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.
 • शॉपिंगसाठी नव्या कार्डसोबतच आरबीआयने प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (PPI) लाँच करण्याची घोषणाही केली आहे. याचा वापर 10 हजार रुपयांपर्यंतचं सामान किवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येईल.
 • आरबीआयनुसार हे कार्ड बँक अकाउंटद्वारे रिचार्ज करता येईल. याचा वापर बिल पेमेंट करण्यासह अन्य प्रकारच्या खरेदीसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय पीपीआय कार्डला बँकेत रोख रक्कम भरुन देखील रिचार्ज करता येईल. तसंच, डेबिट कार्डद्वारे रिचार्जचा पर्यायही उपलब्ध असेल. एका महिन्यात कमाल 50 हजार रुपयांपर्यंत
 • रिचार्ज करता येईल. याबाबत अधिक माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत दिली जाणार आहे.

राफेलमध्ये ‘मेटेओर’ क्षेपणास्त्र हवंच :

 • पाकिस्तान बरोबर पुन्हा हवाई युद्धाचा प्रसंग उदभवल्यास F-16 फायटर विमानांना रोखण्यासाठी भारताने फ्रान्सला पहिली चारही राफेल फायटर विमाने मेटेओर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करुन देण्याची विनंती केली आहे.
 • भारताने फ्रान्स बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे.
 • तर यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात फ्रान्सच्या हवाई दलाच्या तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या औपचारीक कार्यक्रमामध्ये पहिली चार विमाने भारताला सुपूर्द करण्यात आली.
 • त्याचवेळी भारताकडून फ्रान्सला आठ ते दहा मेटेओर क्षेपणास्त्रे देण्याची विनंती करण्यात आली. सध्या फ्रान्समध्ये इंडियन एअर फोर्सच्या इंजिनिअर्स आणि वैमानिकांना राफेल विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
 • तसेच पुढच्यावर्षी मे महिन्यात पहिल्या चार राफेल विमानांचे भारतामध्ये लँडिंग होईल. अंबाला बेसवर ही विमाने तैनात असतील.
 • मेटेओर हे एअर टू एअर लढाईमधील सर्वोत्तम मिसाइल आहे. बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे हे मिसाइल आहे.
 • मेटेओर मिसाइलद्वारे 120 ते 150 किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान पाडणे शक्य आहे. सध्याच्या घडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे असे मिसाइल नाही.

‘नो-बॉल’ तपासण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांकडे :

 • गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नो-बॉल’ प्रकरणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अखेरीस तोडगा काढला असून आता मैदानावरील पंचांऐवजी तिसरे पंच गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवून चेंडू ‘नो-बॉल’ आहे की नाही, याचा निर्णय घेणार आहेत.
 • तर सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज ट्वेन्टी-20 मालिकेत या नव्या प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे.
 • हैदराबाद येथे भारत-विंडीजमध्ये पहिला ट्वेन्टी-20 सामना रंगणार असून त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा हा नियम लागू करण्यात येणार आहे.
 • तसेच काही महिन्यांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामात ‘नो-बॉल’ तपासण्यासाठी मैदानावर अतिरिक्त पंच ठेवण्याबाबत चर्चा झाली; परंतु आता मात्र ‘आयसीसी’ने तिसऱ्या पंचांनाही जबाबदारी सोपवली आहे.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा ‘सुवर्णचौकार’:

 • दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी चौथ्या दिवशी भारताने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई केली.
 • तर वर्षांच्या पूर्वार्धात आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या झिल्ली दालाबेहेराने महिलांच्या 45 किलो वजनी गटात 151 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.
 • तसेच 49 किलो वजनी गटात स्नेहा सोरेनने 157 किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. 55 किलो वजनी गटात राष्ट्रकुल अिजक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सोरोखायबाम बिंदियाराणी देवीने 181 किलो वजन उचलून अव्वल स्थान मिळवले.
 • मग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात सिद्धांत गोगोईने 264 किलो वजन उचलत भारताच्या खात्यात चौथ्या सुवर्णपदकाची नोंद केली.

अझीम प्रेमजी ठरले आशियातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती :

 • विप्रो कंपनीचे एके काळचे प्रमुख अझीम प्रेमजी हे आशियातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले. फोर्ब्ज मासिकाने आशियातील 30 दानशूर व्यक्तींची यादी प्रकाशित केली असून, त्यात प्रथमच स्थानावर अझीझ प्रेमजी आहेत.
 • तर या 30 दानशूरांच्या यादीत भारतातील किरण मजुमदार-शॉ, त्यांचे पती जॉन शॉ व हेक्सावेअर टेक्नॉलॉजीचे संस्थापक व चेअरमन अतुल निशार यांचीही नावे आहेत.
 • तसेच अझीम प्रेमजी सुमारे 50 वर्षे विप्रोचे कार्यकारी संचालक होते. ते जुलैमध्ये निवृत्त झाले. नंतर त्यांनी आपण दानधर्म व समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी अझीम प्रेमजी फाऊडेशनला 760 कोटींचे समभाग देणगीपोटी दिले आहेत. ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांनी 21 अब्ज डॉलर्सची संपत्ती देणगीच्या स्वरूपात देण्याचे जाहीर केले आहे.
 • बायकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉ व त्यांचे पती जॉन शॉ यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोला 53 कोटी 45 हजार लाखांची देणगी दिली. त्यांनी अन्य संस्थांना दिलेल्या देणग्यांची रक्कम ४0 कोटी रुपयांहून अधिक आहे.

दिनविशेष:

 • 6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.
 • संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.
 • पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.
 • सन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
 • सन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2019)

You might also like
1 Comment
 1. Devlal Akode says

  Nice

Leave A Reply

Your email address will not be published.