5 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 December 2019 Current Affairs In Marathi
5 December 2019 Current Affairs In Marathi

5 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2019)

‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुंदर पिचाई यांची नियुक्ती :

  • गुगलची मुख्य मातृकंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ‘गुगल’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर यापूर्वी इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगल कंपनीचे संस्थापक लॅरी पेज व सर्जेई ब्रिन हे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष या पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
  • तसेच पिचाई हे सध्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. आता ते अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतील.
  • तसेच पिचाई हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एका शक्तिशाली पदावर पोहोचले आहेत. ड्रोन, इंटरनेट बिमिंग बलून, जाहिराती, स्मार्टफोन सॉफ्टवेअर, नकाशे, ऑनलाइन व्हिडिओ या सर्व सेवांची सूत्रे त्यांच्या हातात असतील.
  • गुगल कंपनीसमोर सध्या मोठा आकार, माहितीची सुरक्षितता व समाजावर परिणाम या मुद्दय़ांवर अनेक आव्हाने असताना पिचाई हे सूत्रे हाती घेत आहेत. अल्फाबेट ही कंपनी आता चांगली प्रस्थापित झालेली असून ‘गुगल’ व ‘अदर बेटस’या दोन कंपन्याही चांगले काम करीत आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 डिसेंबर 2019)

मोहम्मद शमीचा ‘TOP 10’ गोलंदाजांमध्ये समावेश :

  • भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या कसोटी क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे शमी क्रमवारीत दहाव्या स्थानावर पोहचला आहे.
  • तर शमीच्या समावेशामुळे सध्या आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये 3 भारतीय गोलंदाज आहेत.
  • तसेच जसप्रीत बुमराह पाचव्या तर रविचंद्रन आश्विन सध्या नवव्या स्थानावर आहे.
  • आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम 10 गोलंदाज अनुक्रमे : पॅट कमिन्स, कगिसो रबाडा, जेसन होल्डर, निल वेंगर, जसप्रीत बुमराह, वर्नेन फिलँडर, जेम्स अँडरसन, जोश हेजलवुड, रविचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी.

इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे निधन :

  • सहा फूट, सहा इंच उंचीचे वेगवान गोलंदाज आणि इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांचे निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
  • विलिस यांनी वयाच्या 21व्या वर्षी 1971च्या अ‍ॅशेस मालिकेत पदार्पण केले. अ‍ॅलन वॉर्डला दुखापत झाल्यामुळे विलिस यांना ही संधी चालून आली. मग ते मालिकेतील उर्वरित चारही सामने खेळले.
  • तर इंग्लंडने सात सामन्यांची ती मालिका 2-0 अशी जिंकली होती.
  • तसेच 1971 ते 1984 या कालावधीतील 90 कसोटी सामन्यांत 325 बळी मिळवले.

सव्वाशे वर्षातील सर्वाधिक चक्रीवादळे यंदा अरबी समुद्रात :

  • यंदा भारतीय उपखंडातील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात गेल्या सव्वाशे वर्षातील सर्वाधिक 12 चक्रीवादळे निर्माण होण्याचा प्रकार घडला.
  • तर त्यातील 7 चक्रीवादळे ही अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़. एकावेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रकार अरबी समुद्रात यंदा दोनदा झाले आहेत़.
  • तसेच सध्या अरबी समुद्रात लक्ष्यद्वीपजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून दुसरे विषववृत्तजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. या दोन्ही कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे़. त्यामुळे या वर्षात 7 चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली आहेत़.
  • हवामान विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडीवारीनुसार 1891 पासून गेल्या 128 वर्षात प्रथमच अरबी समुद्रात इतकी चक्रीवादळे व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली आहेत़.
  • तर यापूर्वी 1998 मध्ये अरबी समुद्रात 6 चक्रीवादळे निर्माण झाली होती़. अरबी समुद्रात यंदा चक्रीवादळांची संख्या वाढली असतानाच बंगालच्याउपसागरातील चक्रीवादळाच्या संख्येत मात्र घट झाली आहे़.

ठामपाच्या अग्निशमन दलात दिसणार महिला ब्रिगेड :

  • ठाणे महापालिकेच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिल्याने आता त्यानुसार टप्प्याटप्प्याने महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अग्निशमन दलात आता 435 पदांची भरती केली जाणार आहे.
  • तर त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 250 पदे भरण्यात येणार असून त्यात महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, सुमारे 81 महिलांचीही भरती केली जाणार आहे.
  • तसेच यासंदर्भातील जाहिरात येत्या 15 दिवसांच्या आत प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर साधारणपणे चार महिन्यांच्या आत त्या अग्निशमन दलात सामील होणार आहेत.
  • अग्निशमन दलात महिलांना स्थान देणारी ठाणे ही देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.

दिनविशेष:

  • 5 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक माती दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना सन 1906 मध्ये 5 डिसेंबर रोजी झाली.
  • भारताचे 14वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल ‘जयंत नाडकर्णी‘ यांचा जन्म 5 डिसेंबर 1931 मध्ये झाला.
  • सन 2016 मध्ये गौरव गिल यांनी ‘आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप 2016‘ हा किताब जिंकला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 डिसेंबर 2019)

You might also like
1 Comment
  1. Amol Mahadev Phalake says

    A\p-dhavalas ,tal-madha,dist-solapur

Leave A Reply

Your email address will not be published.