6 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

इलोन मस्क
इलोन मस्क

6 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 एप्रिल 2022)

इलोन मस्क ‘ट्विटर’चे नवे संचालक :

  • टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला.
  • अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत.
  • मस्क हे 2024 पर्यंत ‘ट्विटर’चे वर्ग -2 संचालक असतील.
  • तसेच कंपनीचा मालकीहक्क बदलू नये यासाठी केलेली ही उपाययोजना दिसते.
  • तर नव्या नियुक्तीनुसार मस्क ट्विटरचे 14.9 भागांपेक्षा जास्त भाग भांडवल घेऊ शकणार नाहीत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 एप्रिल 2022)

18 भारतीय आणि 4 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्स केले बॅन :

  • केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 पाकिस्तानी YouTube चॅनेलसह 22 YouTube चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
  • तर हे चॅनल राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
  • यासोबतच मंत्रालयाने 3 ट्विटर अकाउंट, 1 ​​फेसबुक पेज आणि 1 वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धात भारताचा शानदार विजय :

  • मुमताज खानच्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी मलेशियाला 4-0 अशा फरकाने पराभूत करत ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या साखळी फेरीत अपराजित राहण्याची किमया साधली.
  • तर आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा शुक्रवारी दक्षिण कोरियाशी सामना होईल.
  • भारताकडून मुमताजने चमकदार कामगिरी केली.
  • तसेच‘ड’ गटात भारताने आपले तीनही सामने जिंकत अग्रस्थान मिळवले.

दिनविशेष:

  • डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस याकॅह यांचा जन्म 6 एप्रिल 1892 मध्ये झाला होता.
  • भारतीय उद्योजक विष्णू महेश्वर उर्फ व्ही.एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म 6 एप्रिल 1927 रोजी झाला.
  • सन 1930 मध्ये प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
  • भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक ‘दिलीप वेंगसकर’ यांचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी झाला.
  • भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना 1980 मध्ये झाली व अटल बिहारी वाजपेयी यापक्षाचे पहिले अध्यक्ष झाले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 एप्रिल 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.