5 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

गौतम अदानी
गौतम अदानी

5 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 एप्रिल 2022)

एलन मस्कची ट्विटरमध्ये 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक :

  • टेस्लाचे प्रमुख एलन मस्कने (Elon Musk)ट्विटरमध्ये 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीय.
  • यासह मस्क ट्विटरमधील 9.2 टक्के हिश्शासह सर्वात मोठा समभागधारक झालाय.
  • विशेष म्हणजे एलन मस्ककडे ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीच्या चारपट समभाग आले आहेत.
  • मस्कच्या या निर्णयानंतर ट्विटरच्या समभागांमध्ये 26 टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली.
  • एलन मस्क रिव्होकेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही समभाग खरेदी होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2022)

देशातील 10 राज्यांमध्ये सुरु होणार ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर :

  • ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे.
  • तर अनेक क्षेत्रात ड्रोनच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे.
  • 2022 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित एक मोठी घोषणा केली.
  • मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच दैनंदिन जीवनात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
  • तर त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटचीही गरज भासणार आहे.
  • भविष्यातील ड्रोन पायलटची गरज लक्षात घेता 10 राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी 18 शाळा उघडण्यात आल्या आहेत.
  • बहुतांश ठिकाणी केवळ खासगी फ्लाइंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता अदानी आहेत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :

  • अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांचा 100 बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत समावेश झालाय.
  • अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
  • ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आलीय.
  • तर सध्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
  • तसेच त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानी बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत.
  • अदानी यांच्या संपत्तीमध्ये 24 बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरलेत.
  • एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 व्या स्थानी आहेत.

‘आयसीसी’चा सर्वोत्तम संघ जाहीर :

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली.
  • तर या संघात भारताच्या एकाही खेळाडूला स्थान लाभलेले नसून विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश होता.
  • मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा न्यूझीलंड येथे झालेली महिला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात
  • मात्र, सातपैकी चार सामने गमावणाऱ्या भारताला बाद फेरी गाठण्यात अपयश आले.
  • तसेच या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मृती आणि हरमनप्रीत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी होत्या.
  • मात्र, या दोघींनाही ‘आयसीसी’च्या सर्वोत्तम संघात स्थान मिळू शकले नाही.

धोनीची रचला ‘हा’नवा विक्रम :

  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवला गेला.
  • तर हा सामना 54 धावांनी गमावल्यानंतर चेन्नई संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
  • दरम्यान, चेन्नईने सामना गमावला असला तरी माजी कर्णधार आणि चेन्नईचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात नवा विक्रम रचलाय.
  • तसेच या सामन्यात पंजाबचा विजय झालेला असला तरी पराभूत झालेल्या संघातील धोनीचीच सगळीकडे चर्चा होत आहे.
  • महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत एकदीवसीय, टी-20 तसेच अनेक कसोटी सामने खेळले आहेत.
  • दरम्यान, तो भारतीय संघाकडून सर्वात जास्त टी-20 सामने खेळणारा क्रमांक दोनचा फलंदाज ठरला आहे.
  • रोहित शर्माने भारताकडून आतापर्यंत सर्वाधक म्हणजेच 372 सामने खेळलेले असून तो या विक्रमामध्ये प्रथमस्थानी आहे.
  • तर या विक्रमामध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेला सुरेश रैना तिसऱ्या क्रमांवर आहे.

दिनविशेष:

  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री तसेच भारताचे उपपंतप्रधान ‘बाबू जगजीवनराम’ यांचा जन्म 5 एप्रिल 1908 मध्ये झाला होता.
  • जेम्स बॉन्ड चित्रपटांचे निर्माते ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली‘ यांचा जन्म 5 एप्रिल 1909 मध्ये झाला.
  • महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य ‘डॉ. रफिक झकारिया’ यांचा जन्म 5 एप्रिल 1920 मध्ये झाला.
  • अभिनेत्री सुलोचला यांच्या हस्ते सन 2000 मध्ये डी.डी.-10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
  • सन 2000 मध्ये जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.