4 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs
4 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (4 एप्रिल 2022)
कोव्हॅक्सिनच्या पुरवठय़ास ‘डब्ल्यूएचओ’ची स्थगिती :
- लस उत्पादन प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यानंतर भारत बायोटेकनिर्मित कोव्हॅक्सिन लशीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी घेतला. सं
- युक्त राष्ट्रांच्या खरेदीदार संस्थांच्या माध्यमातून अनेक देशांना या लशीचा पुरवठा करण्यात येत होता. तो आता स्थगित करण्यात आला आहे.
- ज्या देशांना कोव्हॅक्सिन लशीच्या मात्रा मिळाल्या आहेत त्यांनी वापराबद्दल योग्य तो निर्णय घेण्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
- कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरासाठी 14 ते 22 मार्चदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीतील निष्कर्षांनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- तर या लशीच्या उत्पादन पद्धतीच्या गुणवत्तेत काही त्रुटी आढळल्याने उत्पादनप्रक्रिया आणि साधनसुविधा अद्ययावत करण्याची गरजही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
Must Read (नक्की वाचा):
सुमित्रा गांधींच्या हस्ते मोदींच्या जीवनावर आधारित ‘मोदी स्टोरी’पोर्टल लाँच :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मोदी स्टोरी’ नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलंय.
- तर यामध्ये मोदींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना भेटलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या जीवनातील गोष्टींचा समावेश असेल.
- तसेच ‘मोदी स्टोरी’ हे पोर्टल आज रविवारी लाँच करण्यात आलंय.
- मोदी स्टोरी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, मोदी स्टोरी पोर्टलची घोषणा हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत नरेंद्र मोदींच्या जीवनाशी संबंधित रंजक कथा सांगितल्या जातील.
- नरेंद्र मोदींना जवळून पाहिलेल्या व्यक्तींकडून मोदींचे किस्से त्यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी एकत्र आणण्याचा त्यांचा उद्देश आहे.
- तर कोणीही व्हिडिओ, ऑडिओ किंवा मजकूराच्या स्वरूपात यामध्ये योगदान देऊ शकते, असे त्यात म्हटले आहे.
- महात्मा गांधींच्या नात सुमित्रा गांधी कुलकर्णी यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
प्रो लीग हॉकीत भारताचा सलग दुसरा विजय :
- उपकर्णधार हरप्रीत सिंगची हॅट्ट्रिक आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष संघाने रविवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडवर 4-3 अशी मात केली.
- तर हा भारताचा इंग्लंडवर दोन दिवसांत सलग दुसरा विजय ठरला.
- भारताने शनिवारी 3-3 अशा नियमित वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर 3-2 अशी सरशी साधली.
- तसेच त्यांनी रविवारीही अप्रतिम खेळ सुरू ठेवताना पुन्हा विजयाची नोंद केली.
ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा विश्वचषकावर कोरलं नाव :
- ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला 71 धावांनी पराभूत करत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं.
- ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत 50 षटकात 356 धावांचा डोंगर उभा केला.
- तर 357 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला आलेला इंग्लंडचा संघ मात्र 44 व्या षटकातच तंबुत परतला.
- एलिसा हिलीला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
- एलिसा हिलीने शतक झळकावत विक्रम केला. यासह एलिसा विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली.
दिनविशेष:
- सन 1882 मध्ये ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.
- ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचा जन्म 4 एप्रिल 1902 मध्ये झाला होता.
- पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी 1949 मध्ये नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.
- सन 1968 मध्ये जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची हत्या केली.
- लता मंगेशकर यांना 1990 यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.