3 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

भारतीय महिला संघ
भारतीय महिला संघ

3 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2021)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रुपी’चा शुभारंभ :

  • ‘ई रुपी’ सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
  • तर ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे.
  • तसेच‘ई-रुपी’ हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे.
  • तर ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2021)

थाळीफेकपटू कमलप्रीतची सहाव्या क्रमांकाची कामगिरी :

  • थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने कारकीर्दीतील पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहाव्या क्रमांकाची कामगिरी केली.
  • सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत कमलप्रीतने 63.70 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली.
  • तर 25 वर्षीय कमलप्रीतने शनिवारी झालेल्या पात्रता स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली.
  • अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमनने पहिल्याच प्रयत्नात 68.97 मीटर अंतरावर थाळी फेकून सुवर्णपदक जिंकले.

भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झाने चमकदार कामगिरी :

  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीत भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झाने चमकदार कामगिरी केली आहे.
  • मिर्झा 47.20 च्या मजबूत स्कोअरसह वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
  • तसेच ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठून त्याने विशेष यश मिळवले त्यामुळे त्याची आता पदकासाठी स्पर्धा असणार आहे.
  • फवाद मिर्झा हा 20 वर्षांतील पहिला घोडेस्वार आहे जो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.
  • तर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा फवाद हा तिसरा भारतीय घोडेस्वार आहे.
  • तसेच त्याच्या आधी इंद्रजीत लांबा (1996 अटलांटा) आणि इम्तियाज अनीस (2000 सिडनी) यांनीही ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्यफेरीत मारली धडक :

  • भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 1-0 च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.
  • भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती.
  • तर 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय.
  • तसेच तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.

दुती चंदने केली नव्या विक्रमाची नोंद :

  • टोक्यो ऑलिम्पिकमधील महिलांच्या 200 मीटर शर्यतीत भारताची धावपटू दुती चंद सातव्या स्थानी राहिली.
  • तर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीयाचं धावपटू दुती चंद हिच्या कामगिरीकडे लक्ष होते. मात्र, दुतीच्या सामन्यावर नजर खिळवून बसलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली.
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 200 मीटर शर्यती दुती चंदचे आव्हान संपुष्टात आलं.
  • तसेच दुतीला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नसला, तरी तिने या स्पर्धेत नवीन विक्रमाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे तिने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.
  • दुतीने महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सातवे स्थान पटकावले. हे अंतर पूर्ण करण्यासाठी तिला 23.85 सेकंदांचा वेळ लागला. दुतीने या मोसमातील स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

दिनविशेष :

  • हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.
  • ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी‘ची स्थापना सन 1900 मध्ये झाली.
  • 3 ऑगस्ट 1948 मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
  • सन 1960 मध्ये नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑगस्ट 2021)

You might also like
1 Comment
  1. गोकुळ ना. खंडागळे says

    खुप छान सदर आहे , यामुळे ज्ञानात भर पडते,
    पुढील वाटचालीसाठी
    खूप खूप शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.