29 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 September 2019 Current Affairs In Marathi

29 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2019)

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढवली :

 • पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याला केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हे क्रमांक जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019 रोजी संपणार होती, ती आता 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक काढून हे जाहीर केले आहे.
 • तसेच जर नागरिकांनी आपले पॅन आणि आधार क्रमांक नव्या मुदतीपर्यंत जोडले नाहीत तर ते चालू स्थितीत राहणार नाहीत. त्यामुळे या क्रमांकांच्या मदतीने होणारे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, असे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.
 • पॅन आणि आधार क्रमांक प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवरुन किंवा एसएमएसच्या सहाय्याने लिंक करता येईल. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव, जन्मतारिख बरोबर आहे की नाही याची पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे. जर यामध्ये चूक असेल तर आधी ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल. आधारमध्ये चूक असेल तर यूआयडीएआय आणि पॅनमध्ये बदल करायचा असेल तर इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधून त्यात दुरुस्ती करता येईल.

समुद्रातील सर्वात मोठ्या ‘ड्राय डॉक’चे उद्घाटन :

 • मुंबईतील नौदल गोदीत नौदलाच्या विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (दुरुस्ती तळ) उभारण्यात आला आहे.
 • हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने हा दुरूस्ती तळ उभारला असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या ड्राय डॉकचं उद्घाटन करण्यात आलं.
 • तसेच समुद्रातील पाण्यावर तब्बल 5.68 कोटी घन मीटरचे हे बांधकाम करण्यात आलं आहे.
 • तर सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये एकमेव युद्धनौका कार्यरत आहे. कारवारमध्ये या युद्धनौकेचा तळ असला तरी दुरूस्तीसाठी मात्र या युद्धनौकेला कोचीनच्या जहाजबांधणी कारखान्यात जावं लागतं. यासाठीच मुंबईत ड्राय डॉकची उभारणी करण्यात आली आहे. पश्चिम कमांडच्या मुख्यालयात हा ड्राय डॉक उभारण्यात आला आहे.

मिग-29चे होणार आधुनिकीकरण :

 • वायुदलाच्या ताफ्यात 1986 मध्ये सामील झालेल्या 28व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपरसोनिक मिग-29 या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील 11 बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे आधुनिकीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.
 • ससाणा पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेतानाही लक्षावर नजर ठेवून अचूक मारा करीत शत्रूला टिपण्याची क्षमता असलेल्या या ऐतिहासिक विमानाची वायुदलात ‘बाज’अशी ओळख असून, या विमानाने ओझरच्या धावपट्टीवर
  उतरण्यापूर्वी आकाशात चित्तथराराक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
 • वायुदलाच्या 28 स्क्वॉड्रनच्या मिग- 29 सुपरसोनिक विमानाने ग्रुप कैप्टन जे. एस. पटेल यांच्या नेतृत्वाखाली अखेरचे उड्डाण केल्यानंतर सादर केलेल्या कवायतीनी लक्ष वेधून घेतले. हे विमान 11 बीआरडी येथे देखभाल दुरुस्तीसह आधुनिकीकरणासाठी आणण्यात आले आहे. याठिकाणी मिग – 29 विमानांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच त्यांना अद्ययावत करून पुन्हा देशसेवेसाठी सज्ज केले जाणार आहे.

93 वर्षे जुन्या बँकेवर RBI चे निर्बंध :

 • खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्याच्या दोन दिवसांनंतर लगेचच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत.
 • तसेच त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत.
 • पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर देशातील सहकार क्षेत्रात गुंतवणूकदार, ग्राहक, खातेदारांमध्ये संतापाची भावना असतानाच लक्ष्मी विलास बँकेच्या घडामोडींची भर पडली आहे. लक्ष्मी विलास
  बँकेवर निर्बंध घालण्यामागे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे, मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि दोन वर्ष सातत्त्याने ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणं असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.
 • बँकेकडे असलेल्या मुदत ठेवीतील रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार रेलिगेअर फिनव्हेस्ट कंपनीने केला आहे.आघाडीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडच्या लक्ष्मी विलास बँकेत 790 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
 • तर त्यातील रकमेचा बँकेच्या संचालकांनी परस्पर संमतीने गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीचा परिणाम बँकेच्या समभागमूल्यावरही दिसून आला असून बँकेचा समभाग देखील आपटला आहे. चेन्नईत मुख्यालय असलेल्या 93 वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात 569 शाखा आहेत.

दिनविशेष :

 • 29 सप्टेंबर हा दिवस ‘जागातिक हृदय दिन‘ आहे.
 • सन 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.
 • ‘बिर्ला तारांगण‘ हे आशियातील पहिले तारांगण सन 1963 मध्ये कोलकाता येथे सुरू झाले.
 • सन 2012 मध्ये ‘अल्तमस कबीर‘ हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.