23 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 September 2019 Current Affairs In Marathi

23 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2019)

RBI चा नवा नियम :

 • ऑनलाईन व्यवहार करताना विविध कारणांमुळे खात्यातून पैसे कमी होतात पण व्यवहार अयशस्वी किंवा ट्रान्झॅक्शन फेल होतं. डेबिट कार्ड स्वाइप करतानाही अशाप्रकारची समस्या येते.
 • तसेच यानंतर ग्राहक सेवा केंद्र किंवा बँकेच्या फेऱ्या मारण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय उपलब्ध नसतो. शिवाय पैसे खात्यात परत जमा होत नाहीत तोपर्यंत मानसिक त्रास होतो तो वेगळा. पण, आता बँकांच्या मनमानी कारभारावर चाप बसणार आहे. तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे.
 • तर ऑनलाइन व्यवहार एखाद्या कारणास्ताव अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँकेकडून ग्राहकाला द्यावे लागणार आहेत. या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक जारी केलं आहे. आरबीआयने ऑनलाईन व्यवहार
  अयशस्वी झाल्यास संबंधित टर्न अराउंड टाइम (टीएटी) नियमांत बदल केला आहे.
 • तर या बदलानंतर बँक ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनच्या पैशांसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.
 • यानुसार तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी संबंधित बँकेकडून तुमच्या खात्यात 100 रुपये जमा केले जातील.
 • तसेच रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँकेने ग्राहकाच्या खात्यात द्यावे, असा हा नियम आहे. UPI, IMPS, NACH द्वारे अर्थात मोबाइल वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू असणार आहे.
 • याशिवाय, ऑनलाइन व्यवहारांव्यतिरिक्त आरबीआयने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांबाबत केलेल्या तक्रारीचं निवारण पाच दिवसांमध्ये न झाल्यास ग्राहकाच्या खात्यात दररोज 100 रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे

डिसेंबर 2021 मध्ये भारत अवकाशात माणूस पाठवणार :

 • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला चांद्रयान-2 च्या लँडर बरोबर संपर्क प्रस्थापित करता आला नाही. चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे आता हा संपर्क कधीच होऊ शकत नाही. लँडर आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरचे आयुष्य 14
  दिवसांचे होते.
 • तर 7 सप्टेंबरला इस्रोने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली आहे.
 • डिसेंबर 2020 मध्ये मानवी अवकाश विमान स्पेसमध्ये पाठवण्याची योजना आहे. ही मानवरहित मोहिम असेल.
  तसेच जुलै 2021 मध्ये मानवी अवकाश विमानाची दुसरी चाचणी असेल असे सिवन यांनी आयआयटी समारंभात सांगितले.
 • डिसेंबर 2021 मध्ये आपल्या स्वत:च्या रॉकेटमधून पहिला भारतीय अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी इस्रोमध्ये काम सुरु आहे असे सिवन म्हणाले.
 • चांद्रयान 2 मधील ऑर्बिटर चांगले काम करत आहे. ऑर्बिटरमध्ये एकूण आठ उपकरणे असून त्यांच्याकडून अपेक्षित असलेले सर्व कार्य व्यवस्थित सुरु आहे.

भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल :

 • भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे.
 • तसेच फ्रान्सने हे विमान दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 • फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे.

PUC काढणाऱ्या वाहनांमध्ये नऊ पट वाढ :

 • एक स्पटेंबरपासून काही राज्यामध्ये नवीन वाहन कायदा (Motor Vehicle Act 2019) लागू करण्यात आला आहे.
 • वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यास नव्या नियमांनुसार मोठया दंडाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे अनेकजण नियमाचे काटेकोरपणे पाळत आहेत.
 • नवीन वाहन कायदा लागू झाल्यापासून मागील 18 दिवसांत प्रदूषण नियंत्रण प्रमाण पत्र (PUC) काढणाऱ्यांच्या संखेत नऊ पट वाढ झाली आहे.
 • वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना 1 सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे.

दिनविशेष :

 • 23 सप्टेंबर 1803 मध्ये दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
 • अर्बेन ली व्हेरिअर यांनी 23 सप्टेंबर 1846 मध्ये नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
 • महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 मध्ये स्थापन केली.
 • कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना 23 सप्टेंबर 1908 मध्ये झाली.
 • 23 सप्टेंबर 1932 मध्ये हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
 • सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा 23 सप्टेंबर 1983 मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.