29 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

29 May 2019 Current Affairs In Marathi

29 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 मे 2019)

टेक्नॉलॉजीसह घातक मिग-35 भारताला द्यायला तयार :

 • अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन प्रमाणे रशियाच्या मिग कॉर्पोरेशननेही भारताला अत्याधुनिक मिग-35 विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे.
 • भारताकडून फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या चार ते पाच परदेशी कंपन्यांमध्ये मिग कॉर्पोरेशनही आहे.
 • रोसोबोरोनेक्सपोर्टच्या माध्यमातून मिग कॉर्पोरेशन फायटर विमान पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.
 • भारताच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत मिग-35 फायटर विमानांची निर्मिती करण्याची तयारी मिग कॉर्पोरेशनने दाखवली आहे.
 • मिग-35 मध्ये हे नवीन अत्याधुनिक विमान असून त्यामध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे. पाचव्या पिढीच्या फायटर विमानाचे तंत्रज्ञान यामध्ये आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मे 2019)

शिक्षकांना मराठी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक :

 • पालिका शाळेतील अमराठी शिक्षकांनाही आता मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा त्यांचे वेतन कापण्यात येणार आहे.
 • शासनाच्या निर्णयानुसार पालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना एमएस-सीआयटी परीक्षा पास होणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 • खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना एमएस-सीआयटी आणि अमराठी शिक्षकांना मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत सूचित करणारे परिपत्रक काढणे अपेक्षित होते.
 • मात्र लेखा विभागाकडून कर्मचार्याच्या वेतनात त्रुटी काढून वेतनातून वसुली करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक के. पी. नाईक यांनी केला आहे.

कोपा अमेरिका फुटबॉल ब्राझीलच्या कर्णधारपदी एल्वेस :

 • ब्राझीलने कोपा अमेरिका कप स्पर्धेसाठी स्टार फुटबॉलपटू नेमारच्या स्थानी दानी एल्वेसची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
 • ब्राझील फुटबॉल महासंघाने (सीबीएफ) सोमवारी ही घोषणा केली.
 • सीबीएफने म्हटले की,’प्रशिक्षक टीटे यांनी या निर्णयाबाबत नेमारला सूचना दिलेली आहे.’ आठवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या ब्राझील संघाला 14 जूनपासून प्रारंभ होत असलेल्या स्पर्धेत बोलविया, वेनेझुला व पेरु यांच्यासह एका गटात स्थान मिळाले आहे.
 • ब्राझील संघ त्याआधी, कतार व होंडुरास या संघाविरुद्ध सराव सामने खेळेल.

दिनविशेष :

 • 29 मे : जागतिक पचन स्वास्थ्य दिन
 • पीटर (दुसरा) रशियाचा झार 29 मे 1727 मध्ये बनला.
 • 29 मे 1848 मध्ये विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य झाले.
 • 29 मे 1906 रोजी भारतीय-इंग्लिश लेखक टी.एच. व्हाईट यांचा जन्म झाला.
 • एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला.
 • अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी 29 मे 1919 रोजी घेण्यात आली.
 • 29 मे 1987 हा दिवस भारताचे 5वे पंतप्रधान ‘चौधरी चरणसिंग‘ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मे 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.