30 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

30 May 2019 Current Affairs In Marathi

30 May 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 मे 2019)

नौदल प्रमुखपदाची सूत्रे घेण्यासाठी करमबीर सिंह यांना लवादाची परवानगी :

  • नौदलाचे व्हाइस अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांना नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेण्यास लष्करी लवादाने परवानगी दिली आहे.
  • नौदल प्रमुखपदी करमबीर सिंह यांच्या नेमणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल झालेली असून त्यावरची सुनावणी सात आठवडय़ांनी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
  • दरम्यानच्या काळात त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घ्यायची की नाही असा मुद्दा उपस्थित झाला होता, लवादाच्या निकालाने त्यावर पडदा पडला असून करमबीर सिंह यांना शुक्रवारी नौदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • अंदमान व निकोबार कमांडचे ‘कमांडर इन चिफ’ असलेले व्हाइस अडमिरल बिमल वर्मा यांनी करमबीर सिंह यांच्या नियुक्तीला सेवाज्येष्ठतेच्या मुद्दयावर आव्हान दिले असून त्यावर लष्करी दले लवादाकडे याचिका दाखल केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मे 2019)

अमेरिकेच्या करंसी मॉनिटरिंग लिस्टमधून भारत बाहेर :

  • केंद्र सरकारने उचललेल्या काही महत्त्वाच्या पावलांमुळे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारताला आपल्या करंसी मॉनिटरिंग यादीमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या यादीत मोठ्या व्यावसायिक भागीदार सहभागी असतात.
  • तर भारताव्यतिरिक्त या यादीतून स्वित्झर्लंडलादेखील हटवण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले.
  • तसेच सध्या या यादीत चीन, जपान, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, आयर्लंड, सिंगापुर, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. भारतीय सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे चलनाचा आर्थिक धोका दूर झाल्याचे
    अमेरिकेला वाटत असल्याचे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालकडून सांगण्यात आले आहे.
  • अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. तीन मुख्य निकषांपैकी केवळ एकाच निकषामध्ये भारत प्रतिकूल आढळल्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • 2017 मध्ये भारताने परकीय चलन साठा खरेदी केल्यानंतर 2018 मध्ये टप्प्याटप्प्याने त्याची विक्री करण्यात आली होती. या परकीय चलनाची विक्री जीडीपीच्या 1.7 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती, असे या अहवालात नमूग करण्यात आले आहे.

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे :

  • पाकिस्तानला 2020 च्या आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचे अधिकार मिळाले आहेत, पण त्याचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) केले जाऊ शकते. कारण त्यांनी जर या स्पर्धेचे आयोजन आपल्या देशात केले, तर राजकीय
    तणाव बघता भारताच्या सहभागाबाबत साशंकता राहील.
  • आशिया क्रिकेट परिषदेने (एसीसी) सिंगापूरमध्ये आपल्या बैठकीमध्ये या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला बहाल केले आणि स्पर्धेचे आयोजन तटस्थ स्थळ असलेल्या संयुक्त अरब अमिरातमध्ये होण्याची पूर्ण शक्यता आहे. श्रीलंका संघाच्या बसवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमीरात पाकिस्तानसाठी घरचे मैदान झाले आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये विश्व टी20 पूर्वी सप्टेंबरमध्ये होईल.
  • तर राजकीय तणावामुळेच भारताने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्येच केले होते.

रायफल नेमबाज दिव्यांशसिंग ‘टॉप्स’मध्ये :

  • रायफल नेमबाज दिव्यांश सिंग पनवारचा बुधवारी ऑलिम्पिक पोडियम प्रणालीच्या (टॉप्स) कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला.
  • रायफल नेमबाज दिव्यांश सिंग पनवारचा ऑलिम्पिक पोडियम प्रणालीच्या (टॉप्स) कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • दिव्यांशचा मुख्य इव्हेंट 10 मीटर एअर रायफल आहे. तो सुरुवातीला टॉप्सच्या डेव्हलपमेंट ग्रुपचा भाग होता.
  • भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) मते अलीकडच्या कालावधीतील कामगिरी पाहून त्याचा कोअर ग्रुपमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला.
  • त्याने बीजिंगमध्ये विश्वचषकमध्ये रौप्य पटकावित भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला.
  • दरम्यान, दिव्यांश म्युनिचमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकमध्ये पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. साई महासंचालक नीलम कपूर यांच्या अध्यक्षतेखालील मिशन आॅलिम्पिक समितीच्या (एमओसी) बैठकीत सात खेळाडूंसाठी आर्थिक

मनू भाकरने मिळवले ऑलिम्पिक तिकिट :

  • युवा नेमबाज मनू भाकरने आयएसएसएफ विश्वचषकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहताना भारतासाठी नेमबाजीमध्ये सातवा ऑलिम्पिक कोटा मिळवला.
  • 17 वर्षीय मनूने फायनलमध्ये 201.0 अंकांसह ऑलिम्पिक कोटा पटकावला.
  • अव्वल विश्व स्पर्धामध्ये अनेक पदके जिंकणारी मनू पात्रता फेरीत 582 अंकासह तिसऱ्या स्थानी होती. तिने अंतिम दोन फेऱ्यांमध्ये 98 गुणांची कमाई केली.

दिनविशेष :

  • इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म 30 मे 1894 मध्ये झाला.
  • अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म 30 मे 1916 रोजी झाला.
  • मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात 30 मे 1934 मध्ये झाली.
  • 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • पु.ल. देशपांडे यांना 30 मे 1993 रोजी ‘त्रिदल‘ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जून 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.