29 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

MPSC

29 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2021)

सामाजिक समांतर आरक्षणासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना :

 • राज्याच्या शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच आरक्षण ठरविण्यासाठी भरती संदर्भातील अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.
 • सामाजिक आणि समांतर आरक्षण संबंधित निर्णयाचे एकत्रीकरण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली 11 ऑगस्ट 2021 रोजी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे.
 • तर या अभ्यासगटामध्ये सुमंत भांगे, मनिषा कदम, गीता कुलकर्णी, सु. मो. महाजन आणि टि. वा. करपते यांचा समावेश आहे.
 • तसेच, सामाजिक आणि समांतर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णयात सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा कसे हे अभ्यासगट तपासणार आहे.
 • या अभ्यासगटामार्फत सर्व माहिती एकत्रित करुन याबाबत पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2021)

MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय :

 • येत्या 2 जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.
 • विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
 • आयोगाने जारी केलेल्या निवेदनामध्ये परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
 • राज्य लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी 28 डिसेंबर रोजी यासंदर्भातलं परिपत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे.

दोन लशींसह औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी :

 • केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने कोव्होव्हॅक्स आणि कोर्बिव्हॅक्स या दोन करोना प्रतिबंधक लशींच्या आपत्कालीन वापरास मंगळवारी परवानगी दिली़.
 • तसेच विषाणूविरोधी औषध मॉल्नुपिरावीरच्या आपत्कालीन वापरासही परवानगी देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितल़े
 • सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि नोवाव्हॅक्स यांच्या संयुक्त भागीदारीतून कोव्होव्हॅक्स आणि हैद्राबादस्थित बायोलॉजिकल-ई या कंपनीने कोर्बिव्हॅक्स लशीची निर्मिती केली आह़े.
 • नोवाव्हॅक्सतर्फे विकसित करण्यात आलेल्या कोव्होव्हॅक्स या लशीचे उत्पादन आणि विपणन भारतात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे करण्यात येणार आहे.
 • कोर्बिव्हॅक्स ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली करोना प्रतिबंधात्मक तिसरी लस ठरली आहे.
 • मॉल्नुपिरावीर या औषधाचे उत्पादन देशातील 13 औषध उत्पादक कंपन्या करणार असून, ज्येष्ठ आणि सहव्याधीग्रस्त रुग्णांमध्ये आपत्कालीन नियंत्रित वापरासाठी केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे.

देशातल्या सर्वात वेगवान मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हस्ते उद्घाटन :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं.
 • कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोतून फेरफटका मारला.
 • यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते.
 • जानेवारी 2022 मध्ये या मेट्रोचा आणखी एक भाग खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे.
 • कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे.
 • शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

दिनविशेष:

 • काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
 • मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
 • प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ‘रामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
 • सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
 • सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.