30 डिसेंबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

कोनेरू हम्पी
कोनेरू हम्पी

30 December 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2021)

ऑनलाइन सातबारासाठी बँकांशी करार :

  • सातबारा ऑनलाइन पद्धतीने काढण्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दीड कोटी लोकांनी ऑनलाइन दाखले मिळवले.
  • त्यामुळे आता शेतकऱ्यांना सातबारासाठी त्रास होऊ नये यासाठी बँकांशी करार केला जाणार आहे.
  • बँका व्यवहारासाठी सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकतील.
  • तर याच पद्धतीने ई-पीक पाहणीच्या अभिनव उपक्रमातून सरकारकडे मोठी माहिती (डाटा) संकलित झाली आहे.
  • तसेच त्याचा वायदे बाजारात मोठा उपयोग होऊ शकतो. हा मौल्यवान डाटा वायदे बाजारासाठी उपलब्ध करायचा की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धात हम्पी सहाव्या स्थानी :

  • गतविजेत्या कोनेरू हम्पीला ‘फिडे’ जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • तर खुल्या गटात युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने चांगली कामगिरी करताना नववे स्थान मिळवले.
  • तसेच खुल्या गटात उझबेकिस्तानच्या नोदिर्बेक अब्दुसात्तोरोव्हने 9.5 गुणांसह विजेतेपद पटकावले.
  • त्याच्यात आणि नवव्या स्थानावरील गुकेशमध्ये केवळ अध्र्या गुणाचा फरक होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2021)

अफगाणिस्तानच्या अशरफ घनींचा ‘सर्वात भ्रष्ट’ लोकांच्या यादीत समावेश :

  • अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांचा जगातील सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) नावाच्या संस्थेने ही यादी तयार केली आहे.
  • ओसीसीआरपी हे जगभरातील स्वतंत्र मीडिया आउटलेट्ससाठी एक ना-नफा शोधात्मक बातम्यांचे अहवाल देणारे व्यासपीठ आहे.
  • दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मित्राला ‘करप्ट पर्सन ऑफ द इयर’पुरस्कार मिळाला आहे.
  • बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे.
  • तर या यादीत सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद, टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन आणि ऑस्ट्रियाचे चांसलर सेबॅस्टियन कुर्झ यांचा समावेश करण्यात आला आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धाचा पृथ्वी शॉ मुंबईचा कर्णधार :

  • रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचे नेतृत्व धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
  • 41 वेळा रणजी विजेत्या मुंबईचा एलिट क-गटात समावेश आहे.
  • मुंबईची सलामी 13 जानेवारीपासून महाराष्ट्राशी रंगणार आहे, तर दुसरी लढत 20 जानेवारीपासून दिल्लीशी आहे.
  • मुंबईच्या संघात अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरेसह सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान, अरमान जाफर, आकर्शित गोमेल आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी स्थान मिळवले आहे.

दिनविशेष :

  • ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे 30 डिसेंबर 1906 स्थापना.
  • 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
  • गांधीवादी कार्यकर्ता आचार्य शंकरराव देव यांचे 30 डिसेंबर रोजी निधन.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.