27 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक रंगमंच दिवस
जागतिक रंगमंच दिवस

27 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 मार्च 2020)

स्टेट बँक खातेदारांना मिळणार ‘ही’ सुविधा :

 • देशात करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्वच बँका ट्रान्झॅक्शनसाठी आणि अन्य सेवांच्या वापरासाठी डिजिटल सेवांचा वापर करण्यास सांगत आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेपर्यंत जावं लागणार नाही.
 • तसेच या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांना घरबसल्या आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि अखेरच्या पाच ट्रान्झॅक्शनची माहिती घेता येणार आहे. बँकेनं यासाठी आयव्हीआर
  (IVR) सेवा सुरू केली आहे.
 • तर सर्वप्रथम ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रांच्या 1800-425-3800 किंवा 1800-11-2211 या क्रमांकावर फोन करावा लागेल.
 • तब्बल 40 कोटीं ग्राहक असणारी स्टेट बँक डोरस्टेप डिलव्हरी या सुविधेअंतर्गत घरपोच पैसे आणि घरीच पैसे जमा करण्याची सुविधा देत आहे. एसबीआयची ही सुविधा फक्त ज्येष्ट नागरिक आणि दिव्यांग ग्राहकांसाठी आहे.
 • तर या सुविधेचं शुल्क 100 रुपये आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक एचडीएफसीही ग्राहकांना घरपोच पैशांची सेवा देत असून पाच हजार रूपयांपासून 25 हजारांपर्यतची रोकड ग्राहक घरपोच मागवू शकतात.
 • त्यासाठी 100 रूपयांपासून 200 रुपयांपर्यतच शुल्क संबंधित बँकेकडून आकारलं जातं. कोटक, एक्सिस आणि इतर बँकमार्फतही अशाच नियमांनुसार घरपोच पैशांची सेवा दिली जाते. संबधित बँकेचं संकेतस्थळ किंवा अॅपवर या सुविधेची सर्व माहिती उपलब्ध आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 मार्च 2020)

देशातील गरिबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचं पॅकेज :

 • कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.
 • निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामान यांनी सांगितले.
 • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आता औषधांचीही होणार ‘होम डिलिव्हरी’:

 • करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
 • तसेच यामुळे नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळवण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही.
 • तर ही समस्या लक्षात जर कोणाला औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना आता घरपोच औषधं पुरवली जाणार आहेत. केंद्र सरकारनं औषध कंपन्यांना तशी परवागनी दिली आहे.
 • अशा प्रकारे औषधांची होम डिलिव्हरीसाठीची अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी महिलांना मोफत सिलिंडर :

 • उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी महिलांना मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
 • अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
 • उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी महिला लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
 • तसंच महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत.
 • तर महिला स्वयंसहायता समुहांना दीनदयाल योजने अंतर्गत 20 लाख रूपयांचं कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यापूर्वी त्यांना या योजनेअंतर्गत 10 लाख रूपयांचे कर्ज देण्यात येत होते.
 • याव्यतिरिक्त वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी 1 हजार रूपये देण्यात येणार आहेत. दोन टप्प्यांमध्ये ही रक्कम वितरीत करण्यात येणार असून 3 कोटी लोकांना याचा लाभ मिळणार असल्याचं अर्थमंत्री
  म्हणाल्या.

मोदी सरकारची मोठी घोषणा ईपीएफ खात्यात भरणार पैसे :

 • देशभरात लॉकडाऊनमुळे सर्व सेवा-उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे संघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) सरकारकडून योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • त्यानुसार, केंद्र सरकार पुढील तीन महिन्यांसाठी विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये पैसे भरणार आहे.
 • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत जाहीर झालेल्या 1.70 लाख कोटींच्या विशेष पॅकेजमध्ये याचा समावेश आहे.

आशा वर्कर, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण :

 • आशा वर्कर, डॉक्टक कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
 • यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत निधीची तरतूद केल्याचं त्या म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
 • स्वास्थ्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी हे आज एखाद्या योध्याप्रमाणे देशाची सेवा करत आहेत. त्यांच्यासाठी प्रती व्यक्ती 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
 • याअंतर्गत 20 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश होईल. देशातील कामगार, गरीबांना आज मोठी मदतीची मोठी आवश्यकता आहे.

दिनविशेष:

 • 27 मार्च हा दिवस ‘जागतिक रंगमंच दिवस‘ आहे.
 • डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार ‘कार्ल बार्क्स‘ यांचा जन्म 27 मार्च 1901 रोजी झाला होता.
 • 1992 यावर्षी पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान झाला.
 • चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांना सन 2000 मध्ये फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World