28 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे

28 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 मार्च 2020)

भारतीय लष्कराने सुरु केलं ‘ऑपरेशन नमस्ते’:

  • करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19 विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ नाव दिले आहे.
  • तर देश करोना व्हायरस विरोधात लढत असताना सर्व सीमा सुरक्षित राखण्याची लष्कराची जबाबदारी आहे. आमच्या तयारीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. खबरदारी म्हणून काही उपायोजना करण्यात आल्या आहेत. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिषदा, सेमिनार, पोस्टिंग रद्द करण्यात आल्या आहेत.
  • तसेच आमच्याकडे आपातकालीन योजना तयार आहे. करोना व्हायरसच्या फैलावामुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही असे नरवणे म्हणाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 मार्च 2020)

ट्रेनमध्येच उभारणार ‘ICU’ सह इतर सेवा :

  • भारतात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालाला आहे. देशात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर सातशे पेक्षा आधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
  • तसेच केंद्र सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 दिवसांसाठी भारत लॉकडाउन केला आहे. त्याशिवाय सरकारकडून प्रदुर्भाव रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.
  • देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि जर भविष्यात करोनाचा प्रदुर्भाव ग्रामिण भागात झाल्यास मोठी हाणी होण्याची शक्यता आहे. ते पाहाता मोदी सरकारनं रेल्वेतच विविध मेडिकल सुविधांची तयारी सुरू केली आहे.
  • तर रेल्वेच्या बोगींना आयसीयू, क्वारंटिन वार्ड आणि आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत. जेणेकरून या हलाकीच्या परिस्थितीत ग्रामीण भांगामध्ये स्वास्थ्य स्वेवा वेळेवर
    पोहचेल.

कोरोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक :

  • जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे
  • जे. जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात 300 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 60 खाटांचा आयसीयू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात 250 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 50 खाटांच्या आयसीयू विभागाची
    व्यवस्था करण्यात येत आहे.
  • तसेच ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिनविशेष:

  • सन 1910 मध्ये हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
  • रासबिहारी बोस यांनी सन 1942 मध्ये टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली.
  • सन 1992 मध्ये उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
  • सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हन्स कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-10000 हा महासंगणक देशाला 1998 मध्ये अर्पण करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 मार्च 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.