26 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 November 2019 Current Affairs In Marathi

26 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 नोव्हेंबर 2019)

अमेरिकेचे नौदल प्रमुख स्पेन्सर यांची हकालपट्टी :

  • नेव्हीसील (नौसैनिक) प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने लष्करी अधिकारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले असा आरोप करून अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून काढून टाकले.
  • इराकमध्ये एडवर्ड गॅलघर या नेव्ही सीलने 2017 मध्ये इराकमध्ये प्रेताबरोबर स्वत:चे छायाचित्र काढले होते त्या प्रकरणात त्याची पदावनती करण्यात आली, पण नंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या नौदल सीलला ( नौसैनिक) परत पूर्वीच्या पदावर आणले होते.
  • ट्रम्प यांनी या प्रकरणात नौसैनिक असलेल्या गॅलघर याला 15 नोव्हेंबर रोजी माफी दिली होती. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. युद्धकाळात गुन्हे करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना माफ करण्याची ट्रम्प यांची कृती योग्य नव्हती असे त्यांचे लष्करातील काहींचे म्हणणे होते.
  • तर एस्पर यांनी रविवारी असे म्हटले होते की, नौदल प्रमुख स्पेन्सर यांनी हा वाद गोपनीय पद्धतीने मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी विश्वास गमावला आहे. संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असे वर्तन करणे योग्य नव्हते.
    त्यामुळे स्पेन्सर यांना आपण पदावरू न काढून टाकत आहोत.

सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा :

  • झी इंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेडचे (ZEEL) प्रवर्तक सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. कंपनीने देखील त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.
  • तर यानंतर चंद्रा आता गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील. तसेच चंद्रा यांच्याकडे आता केवळ कंपनीचे पाच टक्के शेअर्स राहतील.
  • तसेच एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी उद्योजक सुभाष चंद्रा गोयल यांनी नुकताच झी एंटरटेनमेंटमधील 16.5 टक्के हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतला होता. ही हिस्सेदारी विकल्यानंतर एस्सेल समुहावर 6000 कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक राहिल.
  • झी समूह 90 टीव्ही चॅनेल चालवते. 1992 मध्ये झीने देशात पहिल्यांदा सॅटेलाईट चॅनेलची सुरुवात केली होती. समूहाने सप्टेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटमधील 11 टक्के हिस्सा 4,224 कोटी रुपयांना इन्व्हेस्को-ऑपेनहायमर या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक कंपनीला विकला होता.

BCCI संविधानातला महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत :

  • BCCI च्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागली. गांगुलीच्या आगमनानंतर बीसीसीआय संघटनेत मोठे बदल व्हायला सुरुवात झाली.
  • तर गेली अनेक वर्ष दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देणाऱ्या भारतीय संघाने गांगुलीच्या पुढाकारामुळे बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना मिळाला.
  • मात्र लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार गांगुलीचं हे अध्यक्षपद औट घटकेचं ठरणार आहे.
  • तरीही सौरव गांगुली  बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदी रहावा यासाठी आता बीसीसीआय आपल्या संविधानातील महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.  बीसीसीआय आपल्या संविधानातील Cooling-off period या नियमात बदल करण्याच्या विचारात आहे. आपल्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवीन अधिकारी या विषयावर चर्चा करतील. संघटनेचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिली.
  • तसेच लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार, सर्वोच्च न्यायालयाने BCCI च्या संविधानात महत्वाच्या बदलांना मान्यता दिली आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने राज्य किंवा BCCI मध्ये 3 वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले असतील,
    त्याला पुढील 3 वर्ष कोणतंही पद भूषवता येणार नाही.

26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार :

  • खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने गुरुवार, 26 डिसेंबर रोजी भारतातून दिसणार आहे. यापूर्वी, 15 जानेवारी 2010 रोजी नऊ वर्षांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.
  • 26 डिसेंबरला होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ तामिळनाडू येथील काही, भागांतून दिसेल. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल, असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ.
    सोमण यांनी सांगितले.
  • तसेच सोमण म्हणाले की, खग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते. परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही.
  • अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा आपल्याला दिसते, त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. अक्षरश: ‘फायर रिंग’चे दर्शन आपल्याला होते. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावा, असे ते म्हणाले.

दिनविशेष:

  • 26 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन‘ तसेच ‘भारतीय संविधान दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला.
  • कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 मध्ये झाला.
  • 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताची घटना मंजूर झाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
  • सन 1997 मध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  • सन 2008 मध्ये हा दिवस महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.