25 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

25 November 2019 Current Affairs In Marathi

25 November 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2019)

किपचोगे, मुहम्मद जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटू :

  • दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास 59 मिनिटे आणि 40.2 सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडवला.
  • अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत 52.2 सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. मग दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने 52.16 सेकंदांचा नव्या विश्वविक्रम साकारला.

सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी :

  • राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना रविवारी दिला.
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले आमंत्रण आणि त्यांचा शपथविधी बेकायदा असून राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि
    काँग्रेसने रिट याचिकेद्वारे केली आहे.
  • शनिवारी रात्री उशिरा दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजय खन्ना यांच्या तीनसदस्यीय पीठापुढे सुनावणी झाली.
  • भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी बहुमत असल्याचा दावा करणारे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या पािठब्याचे अजित पवार यांनी दिलेले पत्र न्यायालयात सादर करण्याचा आदेश महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिला.
  • तसेच राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलेले पत्रही सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भातील हे तीन दस्तावेज न्यायालयात सादर केल्यानंतर सुनावणी घेतली जाईल आणि या याचिकेसंदर्भात यथायोग्य आदेश दिला जाईल, असे न्यायालयाने रविवारच्या सुनावणीत स्पष्ट केले.

भारताचे जागतिक कसोटीतील अव्वल स्थान अधिक भक्कम :

  • भारताने बांगलादेशविरुद्ध 2-0 ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरील आपली स्थिती अधिक मजबूत केली.
  • ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीमध्ये डावाने विजय मिळवत भारताने आपली गुणसंख्या 360 केली. भारताने नऊ संघाच्या या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आतापर्यंत गुण गमावलेला नाही.
  • भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत 2-0 ने पराभूत केल्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने पराभव केला आणि आता बांगलादेशविरुद्ध 2-0 ने विजय मिळवला.

राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींची मन की बात :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 59वा भाग आज प्रसारित झाला.
  • या कार्यक्रमात मोदींनी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर होईल, तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. या निर्णयावर मोदी यांनी भाष्य केलं.
  • नऊ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला. या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल, असं म्हटलं जात होतं. परंतु 130 कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, देशाच्या हितापेक्षा मोठं
    काहीच नाही. देशात शांती, एकता आणि सद्भावना कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद,” असं मोदी म्हणाले.
  • याचबरोबर मोदी यांनी महिलांसाठी नव्यानं सुरु केलेल्या ‘भारत की लक्ष्मी’ या योजनेबाबत माहिती दिली. “या योजनेमुळं महिलांचा विकास होईल. तसेच देशातील महिला सक्षमीकरणास मदत होईल”, असं मोदी म्हणाले.

दिनविशेष :

  • 25 नोव्हेंबरआंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
  • 25 नोव्हेंबर 1948 मध्ये नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
  • सुरीनामला नेदरलँड्सकडून 25 नोव्हेंबर 1972 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • 25 नोव्हेंबर 1999 मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.