26 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 December 2018 Current Affairs In Marathi

26 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2018)

RBI लवकरच आणणार 20 रूपयांची नवी नोट:

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच नवीन वैशिष्ट्यांसह 20 रूपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. आरबीआयनेच ही माहिती दिली आहे. RBI
 • 200, 2000 रूपयांच्या नोटा चलनात आणण्याशिवाय 10, 50, 100 आणि 500 रूपयांच्या नेाटा आधीच नव्या रंगरूपात सादर करण्यात आल्या आहेत.
 • नोव्हेंबर 2016 पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिके अंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे.
 • आरबीआयच्या माहितीनुसार, 31 मार्च 2016 पर्यंत 20 रूपयांच्या नोटांची संख्या 4.92 अब्ज होती. जी मार्च 2018 पर्यंत 10 अब्ज झाली. या चलनातील नोटांची संख्या सध्या 9.8 टक्के इतकी आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2018)

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर:

 • दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) माध्यमातून देशात उभारण्यात येत असलेल्या चार औद्योगिक शहरांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे. आतापर्यंत 50 भूखंड वितरणाच्या माध्यमातून 3600 कोटींची गुंतवणूक पटकाविण्यात शेंद्रा येथील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी यशस्वी ठरली आहे.
 • डीएमआयसी’च्या माध्यमातून या दोन शहरांदरम्यान चार औद्योगिक क्षेत्रांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ग्रेटर नोयडा (दिल्ली), उज्जैन (मध्य प्रदेश), ढोलेरा (गुजरात), शेंद्रा-बिडकीन (महाराष्ट्र) या ठिकाणी औद्योगिक शहरे उभारण्याचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.
 • यादरम्यान पहिल्या टप्प्यातील कामे हाती घेऊन उद्योगांना आमंत्रित करण्याचा सिलसिला सुरू झाला. या आवाहनांना प्रतिसाद देत औरंगाबादलगत अस्तित्वात आलेल्या शेंद्रा येथील औद्योगिक शहराला गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे.
 • डीएमआयसी’च्या तिन्ही शहरांना भूखंड वितरणाचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. यामध्ये उज्जैनच्या विक्रम उद्योगपुरीमध्ये दोन (भूखंडांचे क्षेत्रफळ – 160,030 चौ.मी.), गुजरातची ढोलेरा इंडस्ट्रियल सिटी (भूखंडांचे क्षेत्रफळ – 161,874 चौ.मी.) आणि ग्रेटर नोएडा (भूखंडांचे क्षेत्रफळ – 554,406 चौ.मी.) येथे प्रत्येकी तीन, तर औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) मध्ये 507,164 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 50 भूखंडांची वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अंदमान निकोबारमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात येणार:

 • सरकारने शहरांचे नावे बदलण्याचा धडाका लावलेला असताना आता मोदी सरकार अंदमान येथील तीन बेटांचे नाव बदलणार आहे.
 • हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज बेट तर, नेल बेटाचे नाव शहीद बेट आणि रोस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस, असे करण्यात येणार आहे. Subhashchandra Bose
 • बेटांचे नाव बदलण्यासाठी गृहमंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्ट ब्लेअरच्या दौऱ्यादरम्यान 30 डिसेंबर रोजी या बेटांचे नाव बदलण्यात येणार आहे.
 • सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री राजनाथसिंह यांची उपस्थिती राहणार आहे.
 • मार्च 2017 मध्ये भाजपाच्या एका खासदारांनी राज्यसभेत अशी मागणी केली होती की, या पर्यटन स्थळावरील बेटांची नावे बदलण्यात यावीत. येथील हॅवलॉक बेटाचे नाव हे ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरून देण्यात आले होते.

‘शाळा प्रवेशासाठी आधारकार्ड सक्ती नको’ यूआयडीएआय:

 • शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आधारकार्डची पूर्वअट लादू नये, असे करणे हे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालाच्या विरोधातील आहे, असा इशारा यूआयडीएआयने दिला आहे.
 • दिल्लीतील 1500 हून अधिक खासगी शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने हा इशारा दिला आहे. काही शाळा प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज म्हणून आधारकार्डची मागणी करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
 • आधारकार्डची मागणी करणे योग्य नाही, ते बेकायदेशीर आहे, शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि मुलांना अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधारकार्ड ही अट घालता येणार नाही, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

वाजपेयींचे ‘सदैव अटल’ स्मारक राष्ट्राला समर्पित:

 • माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे ‘सदैव अटल‘ हे स्मारक 25 डिसेंबर रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आले. वाजपेयींच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली. Atal Bihari Vajpayee
 • वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजारानंतर 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या कमळाच्या आकाराच्या स्मारकावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, वाजपेयींचे कुटुंबीय व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही आदरांजली वाहिली.
 • तर यावेळी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 1.5 एकर जागेवर हे स्मारक उभारण्यात आले असून, त्यासाठी 10.51 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

दिनविशेष:

 • आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1893 रोजी झाला होता.
 • कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक ‘डॉ. मुरलीधर देवीदास’ उर्फ बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
 • स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्रीडॉ. सुशीला नायर‘ यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 मध्ये झाला होता.
 • सन 1976 मध्ये कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना करण्यात आली.
 • विंदा करंदीकर यांना सन 1997 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.