27 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 December 2018 Current Affairs In Marathi

27 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2018)

आता विमानतळांवर स्थानिक भाषेत उद्घोषणा:

  • देशातील प्रत्येक विमानतळावर हिंदी आणि इंग्रजीनंतर स्थानिक भाषेतूनही उद्घोषणा कराव्यात, असे निर्देश सर्व विमानतळांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला. Airport
  • तर याबाबत विमानतळ प्राधिकरणाने आपल्या नियंत्रणातील सर्व विमानतळांना निर्देश जारी केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
  • यासंदर्भात नागरी विमान वाहतूक विभागाने खासगी विमानतळ चालकांशीही संपर्क साधून स्थानिक भाषेत उद्घोषणा करण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांसाठी उद्घोषणा होत नाहीत, त्या  विमानतळांनी हे निर्देश लागू नसतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • तसेच विमानतळांनी हिंदी, इंग्रजीसोबत स्थानिक भाषेतही उद्घोषणा कराव्यात, याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रलयाने 2016 मध्ये परिपत्रक काढले होते. काही संघटनांनी तशी मागणी केली होती. सध्या देशात 100 विमानतळे सुरू आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2018)

नव्या नियमावलीमुळे केबल सेवेत अडथळा नाही:

  • टीव्हीवरील चॅनेल संदर्भात लागू होत असलेल्या नव्या नियमावलीमुळे केबल सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही किंवा ती बंद ठेवण्यात येणार नाही, असा खुलासा ट्रायने केला आहे. त्यामुळे आता चॅनेल बंद होणार असल्याच्या अफवेला चाप बसला आहे.
  • ट्रायने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, आम्हाला गेल्या काही दिवसांपासून केबलच्या नव्या नियमावलीसंदर्भात चुकीची माहिती प्रसारित होताना आढळून आली आहे. 29 डिसेंबरपासून चॅनेल्सचे नवे पॅकेज लागू होत असल्याने या दिवशी संध्याकाळी 7 ते रात्री 10 या काळात सध्या सुरु असलेले चॅनल्स बंद राहणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र, या केवळ अफवा असून नव्या नियमावलीमुळे अशा प्रकारे केबल सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही.
  • ट्रायने ग्राहकांना आपल्या पसंतीचे चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे जे चॅनेल्स त्यांना पहायचे असतील त्याचेच पैसे त्यांना द्यावे लागतील. यामुळे ग्राहकांचे केबलचे दर कमी होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.

आयटीआयची परीक्षा आता ऑनलाईन होणार:

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परीक्षा 2019 पासून ऑनलाईन होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
  • भ्रष्टाचारमुक्त परीक्षेसह शिक्षकांचा ताण कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारने ही पाऊले उचलली आहेत. ऑनलाईन परीक्षेचा निकालही तातडीने लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. कोणत्याही नोकरीसाठी त्यांना आता प्रमाणपत्रांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. Education
  • 2019 मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेत केवळ इंजिनिअरींग ड्राईंगची लेखी व प्रात्यक्षिक (प्रॅक्‍टीकल) परीक्षा द्यावी लागणार आहे. एक पेपर लेखी असून ड्रॉईंगचाच सराव करावा लागणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर अवलंबून आहे.
  • तसेच या परीक्षेमध्ये गुण वाढीसाठी वशिला लावावा लागायचा. हुशार विद्यार्थ्यांएवढेच इतर विद्यार्थ्यांना गुण मिळू लागल्याने परीक्षा निकालात पारदर्शकता राहिलेली नव्हती. त्याचा फटका हुशार विद्यार्थ्यांना बसत होता. शासनाने 2017 मध्ये सेमीस्टर परीक्षा, 2018 मध्ये थेट वार्षिक परीक्षा आता त्यामध्ये पुन्हा पारदर्शकता येण्यासाठी 2019 पासून ऑनलाईन परीक्षा सुरु केली आहे.

लठ्ठपणावर जागरूकतेचा शालेय आभ्यासक्रमात समावेश:

  • लठ्ठपणामुळे देशातील भावी पिढी बरबाद होण्याचा धोका लक्षात घेऊन पश्चिम बंगाल शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात आरोग्यकारक जीवनशैली व लठ्ठपणा टाळण्यासाठी घेण्याची काळजी याचा समावेश केला आहे.
  • प्राथमिक शिक्षण पातळीपासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असून त्यासाठी निधीही देण्यात येणार आहे. यात केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी माहिती न देता त्यांच्यात लठ्ठपणा येऊ नये यासाठी शारीरिक व्यायाम व इतर गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीचे सर्व घटक, त्यांच्या आहारातील घटक तपासण्यात येणार आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाची व योगासनांची गोडी निर्माण करण्यास सांगण्यात आले आहे.
  • रक्तदाब, रक्तशर्करा व शरीराचे वजन यावर लक्ष ठेवण्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले जाणार असून पहिल्या दोन घटकांचा लठ्ठपणाशी निकटचा संबंध आहे.
  • अभ्यासक्रमात या सगळ्याची शास्त्रीय माहिती दिली जाणार असून विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही काही वेळा मुलांच्या प्रकृतीबाबत जाणीव करून दिली जाणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा रक्तदाब, रक्तशर्करा व वजन यांची नेहमी तपासणी केली जाणार आहे. शिक्षण खात्याने त्यासाठीची उपकरणे खरेदी करण्यासाठी शाळांना निधी दिला आहे.

दिनविशेष:

  • उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 मध्ये आग्रा येथे जन्म झाला होता.
  • रेबीज किंवा हाइड्रोंफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञलुई पाश्चार‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1822 मध्ये झाला होता.
  • विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्रीपंजाबराव देशमुख‘ यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 मध्ये झाला होता.
  • सन 1945 मध्ये 28 देशांनी एकत्रिक जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.