26 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

26 August 2019 Current Affairs In Marathi

26 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2019)

नरेंद्र मोदी यांना बहारिनचा पुरस्कार :

 • भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा
  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 • तर बहारिनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले मोदी यांनी बहारिनच्या राजांची भेट घेतली असता त्यांना हा गौरवास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहारिन भेटीनिमित्त तेथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयाबाबत बहारिनच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.
 • अधिकृत माहितीनुसार परदेशांतील तुरुंगात सध्या एकूण 8189 भारतीय व्यक्ती शिक्षा भोगत असून त्यात सौदी अरेबियातील भारतीय कैद्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 1811, तर संयुक्त अरब अमिरातीत 1392 आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2019)

सिंधू ठरली जागतिक स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय :

 • भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले.
 • तर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
 • तसेच या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.
 • सिंधूचे पदक वगळता जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आतापर्यंत 3 रौप्य व 6 कांस्यपदकांसह एकूण 9 पदकांची कमाई केली आहे. यापैकी प्रत्येकी दोन रौप्य व दोन कांस्य ही सिंधूने जिंकलेली आहेत. सिंधूनं 2013 व
  2014 मध्ये कांस्यपदक जिकंले, तर 2017 व 2018मध्ये तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 2017च्या अंतिम सामन्यात ओकुहाराकडूच भारतीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला होता.

कोमालिकाचा ठरली तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय :

 • भारताच्या 17 वर्षीय कोमालिका बारीनं जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला नमवून कॅडेट महिला गटाचे सुवर्णपदक नावावर केले.
 • तर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती तिसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे.
 • झारखंडची कोमालिका ही जागतिक स्पर्धेत 18 वर्षांखालील महिला गटाचे जेतेपद पटकावणारी दुसरी भारतीय आहे.
 • तसेच याआधी 2009मध्ये दिपिका कुमारीने याच गटात बाजी मारली होती आणि त्यानंतर तिने 2011मध्ये कनिष्ठ ( 21 वर्षांखालील) गटाचे जेतेपद नावावर केले होते.
 • तर 2006 मध्ये पल्टन हँस्डाने 2006च्या जागतिक स्पर्धेत कनिष्ठ पुरुष गटातील कम्पाऊंड प्रकारात बाजी मारली होती.

विराट-अजिंक्य जोडीनं मोडला तेंडुलकर-गांगुलीचा विक्रम :

 • अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या जोडीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताला मजबूत स्थितित आणले आहे.
 • तसेच या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना चौथ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करताना संघाला तिसऱ्या दिवस अखेर 3 बाद 185 धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांनी या कामगिरीसह महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर कसोटीतील दुर्मिळ विक्रम मोडला.
 • तर या मालिकेपूर्वी रहाणेला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. पण, कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 81 धावा करताना संघाला 297 धावांचा डोंगर उभा करून दिला. दुसऱ्या डावातही रहाणेच्या खेळीत सातत्य पाहायला मिळाले.
 • तसेच त्याने कर्णधार कोहलीसह संघाचा डाव सावरला. उपकर्णधार आणि कर्णधार जोडीनं चौथ्या विकेटसाठी आठवी शतकी भागीदारी केली. या कामगिरीसह त्यांनी तेंडुलकर व गांगुली यांचा चौथ्या विकेटसाठीचा सात शतकी भागीदारीचा विक्रम मोडला.

दिनविशेष :

 • 26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
 • भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.
 • 26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.