25 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
25 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2019)
UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
- तसेच पंतप्रधान मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- तर यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो.
- या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.
Must Read (नक्की वाचा):
अरुण जेटली यांचे निधन :
- माजी अर्थमंत्री, मुख्य राजनीतीकार, त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारचे पहिल्या पर्वातील मुख्य संकटमोचक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे नवी दिल्ली येथील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
- तर पेशाने वकील असलेल्या जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्रिपद सांभाळले होते. मोदी सरकार आणि भाजप यांचे मुख्य संकटमोचक अशी त्यांची ओळख होती.
- तसेच जेटली यांनी 2014ची लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. ते 2000 सालापासून राज्यसभेवर होते. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली.
ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या क्रिकेटपटूने रचला इतिहास :
- ट्वेन्टी-20 क्रिकेट हा सध्याच्या घडीला सर्वात जलद फॉरमॅट आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये गुणवत्ता आणि फिटनेस यांचा संगम असणे गरजेचे आहे. भारताच्या एका क्रिकेटपटूने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला आहे. त्याने जी कामगिरी केली, ती कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत करता आलेली नाही.
- तर या क्रिकेटपटूने एकाच सामन्यात 56 चेंडूंत 136 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने 13 षटकात आणि सात चौकार लगावले, पण फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने चार षटकांमध्ये तब्बल आठ विकेट्स मिळवत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.
- तसेच सध्याच्या घडीला भारताची कसोटी मालिका वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे. त्यामुळे कोणता भारतीय क्रिकेटपटू ट्वेन्टी-20 क्रिकेट खेळत आहे.
- भारताच्या 30 वर्षीय खेळाडूने कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये हा इतिहास रचला आहे. या खेळाडूचे नाव आहे कृष्णप्पा गौतम. बेंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या एका सामन्यात गौतमने हा इतिहास रचला
आहे.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धात सिंधूची फायनलमध्ये धडक :
- भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफेईवर 21-07, 21-14 असा दणदणीत विजय मिळवला.
- तर या विजयासह सिंधूचे या स्पर्धेतील रौप्यपदक पक्के झाले आहे.
- या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने आतापर्यंत तिसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. यापूर्वी झालेल्या दोन अंतिम फेऱ्यांमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत सिंधूच्या खात्यामध्ये आता पाच पदके झाली आहेत.
- सिंधूने यापूर्वी दोन रौप्यपदकसांह दोन कांस्यपदकेही पटकावली होती. आज उपांत्य फेरीत विजय मिळवत सिंधूने रौप्य पदक निश्चित केले आहे.
दिनविशेष :
- जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सन 1919 मध्ये लंडन ते पॅरिस सुरू झाली.
- साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 मध्ये झाला.
- झिम्बाब्वेचा सन 1980 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
- सन 1998 मध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा