24 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

गुगल पे हे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर (टीपीएपी) आहे- आरबीआय ने दिल्ली उच्च न्यायला सांगितलं:
गुगल पे हे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर (टीपीएपी) आहे- आरबीआय ने दिल्ली उच्च न्यायला सांगितलं:

24 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 जून 2020)

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘एच 1 बी’ व्हिसा थांबविले:

  • अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच 1बी या व्यावसायिक व्हिसासह तेथे काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिसा वर्ष अखेरीपर्यंत थांबवले आहेत.
  • एच 1बी व इतर प्रकारचे व्हिसा इ.2020च्या अखेरीपर्यंत थांबवण्यात आल्याने भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना धक्का बसला आहे.
  • भारत व चीन या देशांचे सर्वाधिक कर्मचारी एच 1बी व्हिसावर अमेरिकेत जातात.
  • या निर्णयाचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना सर्वाधिक बसणार असून अनेक भारतीय व अमेरिकी कंपन्यांना 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षांसाठी एच 1बी व्हिसा अमेरिकी सरकारने दिले होते.
  • तर त्यांना आता अमेरिकेच्या राजनैतिक दूतावासांकडून मंजुरी मिळण्यासाठी चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
  • तसेच एच 1बी व्हिसाचे नूतनीकरण करूपाहणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसणार आहे.
  • एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी स्थलांतरविरोधी आदेशावर स्वाक्षरी केली होती.
  • कायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांना त्यातून प्रतिबंध करण्यात आला होता, त्या आदेशाला 2020च्या अखेरीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • तर नवीन नियमांचा फटका जे अमेरिकेबाहेर आहेत व ज्यांच्याकडे अस्थलांतरित व्हिसा नाही त्यांना बसणार आहे.
  • तसेच गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्तकेली आहे.
  • गूगल कंपनीतही त्यांचे मोठे योगदान आहे.
  • लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अ‍ॅण्ड ह्य़ूमन राइट्स या संस्थेच्या अध्यक्षा वनिता गुप्ता यांनी या निर्णयावर टीका केली असून अध्यक्ष ट्रम्प व स्टीफन मीलर यांनी स्थलांतर र्निबध लागू करून वंशभेदाचे दर्शन घडवले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जून 2020)

गुगल पे हे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर (टीपीएपी) आहे- आरबीआय ने दिल्ली उच्च न्यायला सांगितलं:

  • गुगल पे हे थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर (टीपीएपी) आहे असं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिल्ली उच्च न्यायला सांगितलं आहे.
  • त्यामुळेच गुगल पेच्या माध्यमातून व्यवहार करताना काही घोटाळा किंवा आर्थिक गैरव्यवहार झाल्यास ती प्रकरणं पेमेंट्स अ‍ॅण्ड सेटलमेंट सिस्टीम अ‍ॅक्ट 2001 च्या अंतर्गत येत नाहीत असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
  • तसेच न्या. डी. एन पटेल आणि न्या. प्रतिक जालान यांच्या खंडपीठासमोर सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान आरबीआयने न्यायालयाला ही माहिती दिल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
  • गुगल पे कोणतीही पेमेंट सिस्टीम (देयक माध्यम) चालवत नसल्याने त्यांचा समावेश नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाअंतर्गत (एनपीसीआय) येणाऱ्या अधिकृत पेमेंट सिस्टीम ऑप्रेटर्सच्या यादीत करण्यात आलेला नाही असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
  • आर्थतज्ज्ञ अभिजीत मिश्रा यांनी दाखल केलेल्या जनहितयाचिकेवर सुनावणी सुरु असतानाच आरबीआयने आपली बाजू मांडली.
  • गुगल मोबाइल पेमेंट अ‍ॅप गुगल पे म्हणजेच जी पेचा आरबीआयच्या अधिकृत पेमेंट सिस्टीम्सच्या यादीमध्ये समावेश  नसतानाही आर्थिक व्यवहार करत असल्याचे अभिजीत यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.
  • देशाच्या केंद्रीय बँकेकडून जी पेला आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भात अधिकृत मान्यता देण्यात आलेली नसतानाही कंपनीने आर्थिक व्यवहार करण्यासंदर्भातील माध्यम सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिल्याचेही मिश्रा यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारतीय संघाला आज 7 वर्षे झाली:

  • भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा जेव्हा आढावा घेतला जातो, तेव्हा त्यात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते.
  • ती गोष्ट म्हणजे ICC च्या तीन मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा कर्णधार… त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला, 2011 चा वन डे विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • त्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारतीय संघाला आज 7 वर्षे झाली.
  • आजच्या दिवशी म्हणजेच 23 जून 2013 ला भारताने इंग्लंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा मान मिळवला. ही स्पर्धा जिंकताच धोनी ICC च्या तीन स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.
  • या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 50 षटकांचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 20 षटकांचा करण्यात आला. अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
  • धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 20 षटकात 7 बाद 129 धावांपर्यंत मजल मारली.
  • तर त्या सामन्यात विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक 34 चेंडूत 43 धावा केल्या.
  • तसेच त्यात 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
  • त्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये रवींद्र जाडेजाने मोठे फटके मारून 33 धावांची भर घातली आणि संघाला 129 धावांचा पल्ला गाठून दिला. इंग्लंडकडून रवि बोपाराने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

दिनविशेष :

  • 24 जून 1441 मध्ये इटन कॉलेजची स्थापना.
  • फ्रान्समधील पहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब 24 जून 1793 मध्ये केला गेला.
  • 24 जून 1939 मध्ये सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
  • कर्नाटकातील सर्व शाळांत 24 जून 1982 मध्ये कन्नड शिकविण्याची सक्ती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.