23 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

न्यू यॉर्कमधला रुझवेल्ट यांचा पुतळा हटवणार
न्यू यॉर्कमधला रुझवेल्ट यांचा पुतळा हटवणार

23 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जून 2020)

आणखी एक औषध भारतात होणार उपलब्ध:

  • भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी सिप्लाने ‘सिप्रेमी’ हे औषध लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. ‘सिप्रेमी’ हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे जेनेरिक व्हर्जन आहे.
  • भारतात रेमडेसिवीर हे औषध सिप्रेमी या ब्रँण्डनेमखाली उपलब्ध होणार आहे.
  • ग्लेनमार्कच्य फॅबीफ्ल्यू आणि हिटेरोज कोविफॉर पाठोपाठ आता सिप्रेमी हे अ‍ॅंटिव्हायरल औषध सुद्धा करोनावरील उपचारासाठी उपब्ध होणार आहे.
  • मागच्या आठवडयात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इर्मजन्सीमध्ये रेमडेसिवीर हे औषध वापरायला परवानगी दिली.
  • भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे.
  • अमेरिकेत करोना रुग्णांवर उपचारामध्ये रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरल्याचे दिसले आहे.
  • सिप्रेमीची भारतात किती किंमत असेल ते अजून सिप्लाने जाहीर केलेले नाही.
  • हे औषध कसे द्यायचे त्यासंबंधी सिप्ला प्रशिक्षणही देणार आहे. रेमडेसिवीरचे जेनेरिक व्हर्जन आणत असल्याचे जाहीर केल्यानंतर सिप्लाच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी वाढ झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जून 2020)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला:

  • मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
  • रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्याने मार्केट कॅपमध्येही वाढ होत आहे.
  • बीएसईमध्ये रिलायन्स इंडस्‍ट्रीजचे बाजार मूल्य 28,248.97 कोटी रुपयांनी वाढून 11,43,667 कोटी (150 अब्ज डॉलर्स) रुपये झाले.
  • सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर बीएसईमध्ये रिलायन्सच्या शेअर्सनी 2.53 टक्क्यांची उसळी घेत 1804.10 रुपयांचा विक्रमी स्तर गाठला.
  • तर, एनएसईमध्येही कंपनीच्या शेअर्सनी 2.54 टक्क्यांनी उसळी घेत 1804.20 रुपयांचा स्तर गाठला.
  • यापूर्वी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केल्याचे जाहीर केले.
  • अंबानी यांनी रिलायन्सच्या ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समुहावरील कर्ज मार्च 2021 पर्यंत फेडण्याचे आश्वासन भागधारकांना दिले होते.
  • मात्र 10 महिन्यांतच ते फेडण्यात आले असून त्यासाठी प्रत्यक्ष निधी उभारणी अवघ्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण झाली आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली.
  • ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत 24.70 टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं 1.6 लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.

न्यू यॉर्कमधला रुझवेल्ट यांचा पुतळा हटवणार:

  • अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या बाहेर असलेला अमेरिकेचे माजी अध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांचा पुतळा हटवण्यात येणार आहे.
  • पोलिसांच्या कारवाईत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूच्या निषेधार्थ अमेरिकेत सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संग्रहालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.
  • ‘गेल्या काही आठड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे वंशवादाचे शक्तिशाली आणि हानिकारक प्रतीक म्हणून पुतळे आणि स्मारके असल्याचं समोर आलं आहे.
  • संग्रहालयाच्या अधिकार्‍यांनी या स्मारकाच्या विवादास्पद स्वरूपाचा उल्लेख करताना यामध्ये ‘एक व्यक्ती घोडाच्या पाठीवर बसलीये तर अन्य त्यामागे पायपीट करत आहेत’, असं नमूद केलं आहे.
  • पुतळा केव्हा हटवला जाईल याबाबतची नेमकी माहिती संग्रहालयाकडून देण्यात आलेली नाही. पण, पुतळा वर्णद्वेषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुतळा हटवण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
  • रविवारी न्यू यॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी “समस्याग्रस्त” स्मारक काढून टाकण्याच्या संग्रहालयाच्या विनंतीचे समर्थन करतो असे निवेदनात म्हटले आहे.
  • थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होण्यापूर्वी न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते.
  • तर, रूझवेल्ट यांचे वडील न्यू यॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या संस्थापकांपैकी एक होते.
  • थिओडोर रुझवेल्ट (1858-1919) हे एक निसर्गसंपन्न आणि नैसर्गिक इतिहासाचे लेखक होते, त्यामुळे हा पुतळा त्यांच्या आठवणीत उभारण्यात आला होता.

भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे कर्करोगाने निधन:

  • भारतीय नेमबाज पूर्णिमा झणाणे (लग्नापूर्वीची पूर्णिमा गव्हाणे) हिचे वयाच्या ४२व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे.
  • आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाची मान्यताप्राप्त प्रशिक्षक असलेली पूर्णिमा गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती.
  • पूर्णिमाने आयएसएसएफ विश्वचषक, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • नांदेड येथे जन्मलेल्या पूर्णिमाने मुंबईतून आपल्या नेमबाजी कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिला शिवछत्रपती पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
  • १० मीटर एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय विक्रमाचीही तिने नोंद केली होती. निवृत्तीनंतर पूर्णिमाने श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.

करोनाबाबतच्या ‘या’ मेलवर करु नका क्लिक:

  • एसबीआयचा लाखो ग्राहकांसाठी Alert, करोनाबाबतच्या ‘या’ मेलवर चुकूनही करु नका क्लिक.
  • एसबीआयने त्यांच्या खातेधारकांना संभाव्य सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे.
  • फ्री कोविड19 टेस्टिंग’च्या नावाखाली फेक ईमेल, सोशल मीडिया पोस्ट्स किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे ग्राहकांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशारा बँकेने दिला आहे.
  • तर दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथील ग्राहकांना याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आल्या आहेत.
  • 21 जूनपासून देशातील काही मुख्य शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला CERT-In कडून मिळाली आहे.
  • यासाठी ncov2019@gov.in या ईमेल आयडीद्वारे ‘फ्री कोविड19 टेस्टिंग’बाबतचा मेल पाठवला जाऊ शकतो.
  • त्यामुळे ग्राहकांनी ncov2019@gov.in मेल आयडीवरुन आलेल्या मेलवर क्लिक करु नये”, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ट्विटरद्वारे करण्यात आले आहे.
  • सायबर गुन्हेगारांकडे जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल आयडी आहेत.
  • त्या सर्व इमेल आयडीवर सायबर हल्लेखोर ‘Free Covid-19 Testing’ या विषयाचा मेल पाठवू शकतात.
  • कोव्हिड-19 च्या नावाखाली बनावट इमेल पाठवून त्याद्वारे हे सायबर हल्लेखोर लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरी करत आहेत. त्यामुळे सावध राहा”, अशा इशारा एसबीआयने दिला आहे.

दिनविशेष :

  • 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन आहे.
  • क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी 23 जून 1868 मध्ये पेटंट मिळाले.
  • 23 जून 1894 रोजी पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
  • भारतीय क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला.
  • भारतीय नभोवाणी मुंबई येथे 23 जून 1927 रोजी सुरु.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जून 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.