22 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 ऑक्टोबर 2019)
शिवसेनेतर्फे 10 रुपयांत थाळी, ‘साहेब खाना’ योजना सुरू :
- महाराष्ट्रात सर्वत्र दहा रुपयांत चांगल्या जेवणाची थाळी देणार, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसऱ्या मेळाव्यातून केली होती.
- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यातही शिवसेनेकडून याबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्यातून जम्मू-काश्मीर शिवसेनेने आदर्श घेतला असून जम्मूमध्ये गरजू लोकांसाठी दहा रुपयांत ‘साहेब खाना’ योजनेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.
- शिवसेनेकडून ‘साहेब खाना’ योजनेला सुरूवात झाली असून सध्या जम्मू येथील शिवसेना भवनात केवळ या सेवेचा लाभ घेता येईल.
- तर लवकरच 10 रुपयांमध्ये भरपेट जेवणाची ही योजना जम्मूच्या राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल व जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर देखील सुरूवात होईल. याशिवाय जम्मूतील बक्षी नगर आणि शालिमार रुग्णालयातही ही सेवा लवकरच सुरू केली जाईल. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):
दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही :
- दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास यापुढे सरकारी नोकरीला मुकावं लागणार आहे. आसाममधील भाजपा सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
- आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना 1 जानेवारी 2021 नंतर सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही.
- सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागानं या निर्णयासंबंधी माहिती दिली.
- तसेच छोटं कुटुंब पद्धतीनुसार 1 जानेवारी 2021 नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावं लागणार असल्याचं निर्णयात म्हटलं आहे.
- तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही निर्णय घेण्यात आले. या अंतर्गत जमीन धोरणही मंजुर करण्यात आलं. भूमिहीन लोकांना शेतजमीन आणि घरं बांधण्यासाठीदेखील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा बंद :
- पाकिस्तानने भारताबरोबरची टपाल सेवा बंद केली असून या निर्णयाने आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाने दोन्ही देशातील संबंध आणखी खालच्या पातळीवर आले आहेत.
- पाकिस्तानने भारतातून आलेले टपाल 27 ऑगस्टपासून स्वीकारलेले नाही व तेथूनही टपाल पाठवलेले नाही.
- तसेच जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपालसेवा बंद केली आहे.
- केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले, की पाकिस्तानने टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय एकतर्फी घेतला असून त्याची पूर्वसूचना भारताला दिली नाही. साठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेला मोठा हादरा
बसला आहे.
DRDO बनवणार ‘हायपरसॉनिक’ मिसाइल :
- भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने नव्या हायपरसॉनिक मिसाइलच्या निर्मितीवर काम सुरु केले आहे.
- या मिसाइलचा वेग ध्वनिच्या वेगापेक्षा पाचपट अधिक असेल. या मिसाइलच्या चाचणीसाठी विंड टनेल आणि टेक्नोलॉजीवर लवकरच काम सुरु होईल. तसेच अत्याधुनिक बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टिम विरोधात तग धरुन राहण्यासाठी हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे.
- तर आपण कल्पनाही करु शकणार नाही इतक्या वेगवान गतीने पारंपारिक आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास हायपरसॉनिक मिसाइल सक्षम असेल. भारतात संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी डीआरडीओ आपले 1500 पेटंटसही देण्यास तयार आहे. यामध्ये कठीण अशा मिसाइल, नौदल टेक्नोलॉजीचा समावेश आहे.
भक्ती, हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार :
- राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील रायफल नेमबाजी प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई शहरच्या भक्ती खामकरची भीष्मराज बाम स्मृती सर्वाधिक लक्षवेधी खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
- 50 मीटर रायफल प्रकारात तिने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. पिस्तूल नेमबाजीत हाच पुरस्कार पुण्याच्या हर्षवर्धन यादवला मिळाला.
- तसेच त्याने 25मीटर पिस्तूल प्रकारात दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी 50 मीटर पिस्तूल प्रकारात नाशिकच्या सागर विधातेने 540 गुणांसह सुवर्ण जिंकले.
अँड्रू मॅक्डोनाल्ड राजस्थान रॉयल्सचे नवीन प्रशिक्षक :
- ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्रू मॅक्डोनाल्ड यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
- पॅडी अपटन यांच्याजागी मॅक्डोनाल्ड आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला प्रशिक्षण देणार आहेत. अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या हंगामात राजस्थानचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
- तसेच 38 वर्षीय मॅक्डोनाल्ड यांनी ऑस्ट्रेलियाकडून 4 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून मॅक्डोनाल्ड यांनी चांगली कामगिरी केली आहे.
दिनविशेष :
- 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन
- 22 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
- 22 ऑक्टोबर 4004 मध्ये ई. पू. उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
- निकोला टेस्ला यांनी 22 ऑक्टोबर 1927 मध्ये सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
- पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर 1963 मध्ये भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
- 22 ऑक्टोबर 2008 मध्ये भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा