22 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
22 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2018)
पॅनकार्ड आता वडिलांच्या नावाशिवायही मिळणार:
- सरकारी कागदपत्रांसाठी आपली सर्व माहिती देणे आवश्यक असते. आपली ओळख पटविण्यासाठी आपल्या नावाबरोबरच अडनाव, आई आणि वडिलांचे नाव आवश्यक असते.
- पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असून ते काढण्यासाठीही आपली सर्व माहिती द्यावी लागते. मात्र आता त्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आपली ओळख पटवण्यासाठी आता वडिलांच्या नावाचा संदर्भ देण्याची आवश्यकता नाही.
- आयकर विभागाने या नव्या नियमाबाबत माहिती दिली असून या नव्या नियमामुळे येत्या काळात ही सर्व प्रक्रिया काही प्रमाणात सोपी होण्याची शक्यता आहे.
- ज्यांचे आई-वडिल विभक्त झाले असतील त्यांना पॅनकार्ड काढण्यासाठी काही अडचणी येत असत. पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव बंधनकारक असल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने अशा लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव देण्याचा नियम शिथिल केला आहे.
- तर याअंतर्गत आयकर विभागाने आयकर काद्यातील 114व्या नियमात बदल करत पॅन कार्डसाठी वडिलांऐवजी आईचे नाव देण्यास मान्यता दिली आहे किंवा वडिलांच्या नावाचा संदर्भ देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनाथ मुले किंवा इतरही अनेकांचे प्रश्न यामुळे सुटणार आहेत. हा नवीन नियम येत्या 5 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे सिंगल पॅरेंट असणाऱ्यांनाही अडचणी येणार नाहीत.
Must Read (नक्की वाचा):
देशातील 50 टक्के एटीएम बंद पडणार:
- देशातील 50 टक्के एटीएम मशीन्स पुढील चार महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च 2019 पर्यंत बंद पडणार आहेत. देशभरातील एटीएम मशीन्स ऑपेर्सची संस्था असणाऱ्या कॉन्फरडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) ही शक्यता व्यक्त केली आहे. असे झाल्यास शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
- देशात सध्या अंदाजे 2 लाख 38 हजार एटीएम मशिन्स आहेत. त्यापैकी 1 लाख 13 हजार एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. यातील एक लाख एटीएम हे बँकांच्या शाखांशी थेट संलग्न नसणारे म्हणजे ऑफ साईट एटीएम्स तसेच 15 हजार व्हाईट लेबल प्रकारातील एटीएम असल्याचे सीएटीएमआयच्या प्रवकत्यांनी सांगितले आहे.
- तर याचा सर्वाधिक फटका प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचे पैसे एटीएममधून काढणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला बसेल. तर शहरीभागांमध्येही नोटबंदीनंतरचे एटीएमबाहेरील रांगा लागल्याचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता सीएटीएमआय प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.
- देशभरातील एटीएम ऑपरेटर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्डवेअर तसेच सॉफ्टवेअर अपडेट्सबरोबरच सर्व एटीएममधील रोख रक्कम कॅस्टेल स्वॅप प्रकाराने भरण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
- यासंदर्भातील काम सीएटीएमआयने सुरु केले आहे. या नवीन एटीएममुळे मोठ्याप्रमाणात एटीएम क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
इंटरपोलच्या अध्यक्षपदी दक्षिण कोरियाचे किम यांग:
- दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असून त्यांच्याविरोधातील रशियन अधिकाऱ्याचा या पदासाठीच्या लढतीत किम यांनी पराभव केल्याने पाश्चिमात्य देशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यांग हे आता मेंग होंगवेई यांची जागा घेणार असून 2020 पर्यंत अधिकारपदावर राहतील.
- किम यांना अमेरिकेचा पाठिंबा असून ते सध्या इंटरपोलचे हंगामी अध्यक्ष आहेत. दुबई येथे इंटरपोलच्या सदस्य देशांची बैठक झाली त्यात आधीचे मूळ चीनचे असलेले अध्यक्ष मेंग होंगवेई सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदी यांग यांची निवड करण्यात आली.
- चीनने म्हटले आहे की, मेंग हे बेपत्ता झाले होते हे खरे असले तरी त्यांनी लाचखोरीच्या प्रकरणात राजीनामा दिला आहे. पाश्चिमात्य देशांना इंटरपोलच्या अध्यक्षपदी रशियाचे उमेदवार अलेक्झांगर प्रॉकोपचुक यांची निवड होणे धोक्याचे वाटत होते.
- प्रॉकोपचुक हे इंटरपोलचे उपाध्यक्ष असून त्याआधी रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी होते. तर अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी किम यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांचे पारडे जड होते, आता किम हे 2020 पर्यंत अधिकारपदावर राहतील.
मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्यासाठी जेझिरो विवराची निवड:
- नासाने 2020 मध्ये मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्याचे ठरवले असून त्यासाठी 3.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जुन्या विवराची जागा निश्चित करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर रोजी याबाबतची घोषण करण्यात आली असून जेथे ही रोव्हर गाडी उतरवली जाणार आहे, त्या विवराचे नाव जेझिरो असे आहे.
- पाच वर्षे शोध घेतल्यानंतर मंगळावरील साठ ठिकाणांतून या विवराची निवड रोव्हर गाडी उतरवण्यासाठी करण्यात आली. जुलै 2020 मध्ये ही रोव्हर गाडी मंगळावर पाठवली जाणार असून त्यासाठी ठिकाण निवडण्यासाठी मंगळ मोहिमेतील चमूने चर्चा केली.
- मंगळावर पूर्वी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
- नासा व युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी मंगळावरील मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचे निश्चित केले असून त्यासाठी ठिकाण निश्चित केले आहे.
- नासाचे मोहीम संचालक थॉमस झुरबुशेन यांनी सांगितले, की जेझिरो विवर हे भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून ते 3.6 अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याने त्याच्या संशोधनातून ग्रहांची निर्मिती व खगोलजीवशास्त्रातील काही बाबींवर प्रकाश पडणार आहे.
- एका विशिष्ट ठिकाणचे नमुने गोळा करण्याने मंगळाबाबत विचारात क्रांतिकारक बदल होणार आहे. जेझिरो विवर हे मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे इसिडीस प्लॅनिशिया या पठाराच्या पश्चिम कडेला आहे. इसिडिस भाग हा जुना व मंगळाबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकणारा आहे.
दिनविशेष:
- सन 1858 मध्ये कोलोराडो मधील ‘डेनव्हर शहराची स्थापना’ करण्यात आली.
- धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1880 मध्ये झाला होता.
- स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द.शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1909 मध्ये झाला.
- सन 1963 मध्ये ‘थुंबा‘ या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले.
- पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1968 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा