21 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

21 November 2018 Current Affairs In Marathi

21 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2018)

केरळ काँग्रेसचे अध्यक्ष एम. आय. शनवास यांचे निधन

  • केरळ काँग्रेसचे विद्यमान कार्यवाहक अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील खासदार एम. आय. शनवास यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते.
  • तसेच 1983 पासून शनवास हे केरळ काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
  • तर 2009 पासून अद्यापपर्यंत ते वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आले होते.
  • केरळमधील विद्यार्थी संघटनेतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांनी यापूर्वी युथ काँग्रेस आणि सेवा दलात काम केले आहे.

भारत, रशियामध्ये 500 दशलक्ष डॉलरचा युद्धनौकाबांधणी करार :

  • भारत आणि रशिया यांच्यात दोन युद्धनौकाबांधणीसाठी 500 दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. तर या नौकांची बांधणी गोवा येथील नौदल गोदीत करण्यात येणार आहे.
  • तसेच रशिया त्यांच्या बांधणीचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित करणार आहे.
  • गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) आणि रशियाची रोझोबोरॉनएक्स्पोर्ट यांच्यात हा 500 दशलक्ष डॉलरचा करार झाला. त्यानुसार रशिया भारताला दोन युद्धनौकाबांधणीसाठी तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवणार आहे.
  • तर या नौकांच्या बांधणीला 2020 मध्ये सुरुवात होईल. त्यातील पहिली युद्धनौका 2026 साली आणि दुसरी नौका 2027 साली तयार होईल.
  • तसेच या तलवारवर्गातील स्टेल्थ तंत्रज्ञानावर आधारित फ्रिगेट प्रकारच्या युद्धनौका आहेत. त्यांच्यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रे बसवण्यात येतील.

मेरी कोमचे पदक निश्चित :

  • World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
  • तसेच मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये आणखी एक पदक निश्चित झाले आहे.
  • या स्पर्धेत एमसी मेरी कोमने रविवारी 48 किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कझाकस्तानच्या एयगेरिम केसेनायेव्हाचा 5-0 असा पराभव केला होता.
  • तर त्या विजयाने तिने सहाव्या जागतिक सुवर्णपदकाकडे वाटचाल करण्यास आणखी एक पाऊल टाकले होते.

महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार :

  • केंद्र सरकारच्या 2018 सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा जलतरणपटू स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • राज्यातील 6 व्यक्ती आणि 3 संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते 3 डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
  • मूळच्या अमरावतीच्या व जन्मांध असलेल्या कांचनमाला पांडे हिने मेक्सिकोच्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-2017 स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते.

दिनविशेष :

  • 21 नोव्हेंबर – जागतिक टेलीव्हिजन दिन
  • 21 नोव्हेंबर 1877 मध्ये थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.
  • 21 नोव्हेंबर 1955 मध्ये संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.
  • दक्षिण कोरियाने 21 नोव्हेंबर 1972 मध्ये नवीन संविधान अंगीकारले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.