21 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs
21 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 मार्च 2022)
कोविशिल्डच्या दोन डोसमधल्या अंतरात पुन्हा होणार बदल :
- जगभरात पसरलेल्या करोना महामारीवर बऱ्याच अंशी नियंत्रण आणण्यात लसीकरणामुळे यश आलं आहे.
- भारतात बहुतांश लोकांना कोवॅक्सिन, कोविशिल्ड तसंच स्पुटनिक या लसी देण्यात आल्या.
- मात्र आता कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
- NTAGI ने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.
- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे.
- त्यामुळे आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
- सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आ
Must Read (नक्की वाचा):
एन. बिरेन सिंह यांची पुन्हा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी निवड :
- एन. बिरेन सिंह हेच दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री राहतील, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी इंफाळमध्ये जाहीर केले.
- भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाने सिंह यांची आपले नेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे भाजपने केंद्रीय निरीक्षक म्हणून मणिपूरला पाठवलेल्या सीतारामन यांनी सांगितले.
- तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 60 सदस्यांच्या सभागृहात 32 जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे.
मोदी भेटीनंतर जपानची गुजरातसाठी मोठी घोषणा :
- इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता आता भारतानेही कंबर कसली आहे.
- लवकरच भारत इलेक्ट्रिक गाड्यांच्या उत्पादनासाठी महत्वाचं केंद्र बनू शकतं.
- जपानमधील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने गुजरातमध्ये 1.26 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
- तर या गुंतवणुकीच्या आधारे गाड्या तसंच बॅटरींच्या निर्मितीसीठी फॅक्टरी उभारली जाईल.
- जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा शनिवारी भारत भेटीवर होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
शरद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलामध्ये विलीन :
- माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी त्यांच्या लोकतांत्रिक जनता दलाचे राष्ट्रीय जनता दलामध्ये विलीनीकरण केले.
- भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांचे ऐक्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
- संयुक्त जनता दलातून फुटल्यानंतर शरद यादव यांनी पक्ष स्थापन केला होता.
इंडियन सुपर लीग फुटबॉलत हैदराबादला पहिल्यांदा ‘आयएसएल’चे विजेतेपद :
- हैदराबाद एफसी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये केरळ ब्लास्टर्सचा 3-1 पराभव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद मिळवले.
- पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीने तीन पेनल्टीचा बचाव करत हैदराबादच्या जेतेपदामध्ये निर्णायक भूमिका पार पाडली.
- त्यापूर्वी निर्धारित आणि भरपाई वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत होता.
- शूटआऊटमध्ये हैदराबाद संघाकडून जोओ व्हिक्टर, खासा कामरा आणि हालीचरण नरझारे यांनी गोल मारले.
- केरळ ब्लास्टर्सकडून एकमेव गोल आयुष अधिकारीने मारला.
दिनविशेष :
- देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक ‘मानवेंद्रनाथ रॉय’ यांचा जन्म 21 मार्च 1887 मध्ये झाला.
- 21 मार्च 1916 मध्ये भारतरत्न शहनाईवादक ‘बिस्मिल्ला खान’ यांचा जन्म झाला.
- सन 1977 मध्ये भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
- 21 मार्च 2003 मध्ये जळगाव महानगरपालीकेची स्थापना झाली.
- सोशल मीडिया साइट ‘ट्विटर’ची स्थापना 21 मार्च 2006 रोजी झाली.