22 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

स्वामी शिवानंद
स्वामी शिवानंद

22 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 मार्च 2022)

स्वामी शिवानंद योगासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित :

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात देशातील सर्व व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले.
  • तर यावेळी वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी असे काम केले की संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला.
  • राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी तीनदा डोके टेकले.
  • वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धतीत आणि योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मार्च 2022)

राज्यसभेसाठी ‘आप’कडून हरभजनसिंग, राघव चड्ढा :

  • पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) नवे पाच सदस्य मार्चच्या अखेरीस राज्यसभेवर निवडून जाऊ शकतील.
  • तर पाचही उमेदवारांच्या नावाची ‘आप’ने सोमवारी घोषणा केली असून त्यामध्ये माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि दिल्लीचे आमदार व पंजाबचे पक्षप्रभारी राघव चड्ढा यांचा समावेश आहे.
  • तसेच चढ्ढा हे राज्यसभेतील सर्वात तरुण खासदार ठरतील.
  • पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेले 5 सदस्य 9 एप्रिल रोजी निवृत्त होत असून त्यासाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

भारतातील 29 पुरातन कलात्मक वस्तू ऑस्ट्रेलियाकडून परत :

  • ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान सोमवारी आभासी शिखर परिषद होण्याच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून भारताला भारतातील 29 पुरातन वस्तू परत करण्यात आल्या.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वस्तूंची पाहणी करून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले.
  • मॉरिसन आणि मोदी यांच्यातील आभासी शिखर बैठक सोमवारी पार पडली.
  • ऑस्ट्रेलियाकडून परत मिळालेल्या या वस्तू प्रामुख्याने सहा कलात्मक संकल्पनांवर आधारित आहेत.
  • यात शिव आणि त्याचे गण, शक्तिउपासना, विष्णुअवतार, जैन परंपरा यांच्यासह काही चित्रे आणि 28 कलात्मक वस्तूंचा समावेश आहे.
  • तसेच या वस्तू नवव्या आणि दहाव्या शतकातील वेगवेगळय़ा काळांतील आहेत.

शेती कायदे रद्द करण्याबाबत समिती प्रतिकूल :

  • सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती तीन वादग्रस्त शेती कायदे पूर्णपणे रद्द करण्यास अनुकूल नव्हती आणि पिकांची खरेदी विशिष्ट किमतीत करण्याचे काम राज्य सरकारांवर सोपवावे.
  • तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा अशी शिफारस तिने केली होती, असे समितीच्या तीनपैकी एका सदस्याने सोमवारी या समितीचा अहवाल जारी करताना सांगितले.
  • समितीचा अहवाल जारी करावा असे पत्र आपण तीन वेळा सर्वोच्च न्यायालयाला लिहिले होते, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आपण स्वत:च तो जारी करत आहोत, असे पुणे येथील शेतकरी नेते अनिल घनवट यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
  • तीन शेती कायद्यांबाबतच्या आपल्या शिफारशी समितीने 19 मार्च 2021 रोजी सादर केल्या होत्या.
  • शेतकऱ्यांना सरकारी बाजार समित्यांबाहेर त्यांचा शेतीमाल विकण्याची परवानगी देण्याचा या शिफारशींमध्ये समावेश होता.

‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर :

  • ‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल.
  • तर याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली.
  • तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व 74 सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. सं

दिनविशेष:

  • 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन‘ आहे.
  • यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म 22 मार्च 1924 मध्ये झाला होता.
  • सन 1945 मध्ये अरब लीगची स्थापना झाली.
  • हमीद दलवाई यांनी 1970 यावर्षी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
  • सन 1999 मध्ये लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.