21 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

21 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 फेब्रुवारी 2023)

भविष्य निर्वाह निधीमध्ये अतिरिक्त पेन्शनचा पर्याय:

 • भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत (ईपीएस) अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळविण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना आता उपलब्ध झाला आहे.
 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबतची प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे.
 • भविष्य निर्वाह निधीमध्ये एकूण योगदानाच्या 8.33 टक्के अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना असेल.
 • सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 4 महिन्यांची मुदत संपण्यास 15 दिवस शिल्लक असताना ईपीएफओने परिपत्रक काढून सूचना जारी केल्या आहेत.
 • नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (सुधारित) योजना 2014 ग्राह्य ठरवली होती.

Chrome ब्राऊजरसाठी Googleने आणले ‘हे’ दोन फिचर्स:

 • Google Chrome चा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
 • गुगलने क्रोममध्ये दोन नवीन फीचर्स आणले आहेत.
 • ज्यामुळे तुमची बॅटरी आणि मेमरी सेव्ह होऊ शकणार आहे.
 • क्रोममध्ये गुगलने एनर्जी आणि मेमरी सेव्हर मोड हे फिचर आणले आहे.
 • हे अपडेट तुम्हाला विंडो, मॅक, क्रोम OS आणि linux साठी देण्यात आले आहेत.
 • तसेच तुम्हाला क्रोमच्या परफॉर्मन्स टॅबमध्ये Energy saver हे फिचर देखील मिळणार आहे.

‘स्लम सॉकर’ प्रकल्पाला लॉरेओ पुरस्कारासाठी नामांकन:

 • नवी दिल्ली स्थित ‘स्लम सॉकर’ या फुटबॉल प्रकल्पाला या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या लॉरेओ जागतिक क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे.
 • खेळांच्या माध्यमातून गरजू मुले आणि युवकांचे आयुष्य बदलण्यात साहाय्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे हा ‘लॉरेओ स्पोर्ट्स फॉर गुड’ पुरस्काराचा हेतू आहे.
 • या पुरस्कारासाठी ‘स्लम सॉकर’सह अन्य चार व्यक्ती/संस्थांना नामांकन मिळाले आहे.
 • राजधानी दिल्ली येथील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षित करणे आणि त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढणे हा ‘स्लम सॉकर’ प्रकल्पाचा उद्देश आहे.
 • लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी विश्वचषक विजेत्या अर्जेटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेसी, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिकसह ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मिळवणारा फ्रान्सचा तारांकित
 • फुटबॉलपटू किलियन एम्बापे, ‘फॉम्र्युला 1’ विजेता मॅक्स व्हेस्र्टापेन, टेनिसपटू राफेल नदाल, पोल वॉल्टपटू मोंडो डुप्लान्टिस आणि बास्केटबॉलपटू स्टेफ करी यांना नामांकन मिळाले आहे.
 • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या अमेरिकेच्या धावपटू शेली-अ‍ॅन फ्रेझर-प्राइस आणि सिडनी मॅक्लॉक्न-लेव्हरोन यांच्यासह जलतरणपटू केटी लडेकी, फुटबॉलपटू अलेक्सिया पुतेयास, स्किंगपटू मिकाएला शिपरीन आणि टेनिसपटू इगा श्वीऑनटेक यांना लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले आहे.
 • तसेच विश्वचषक विजेता अर्जेटिना फुटबॉल संघ, चॅम्पियन्स लीग विजेता रेयाल माद्रिद संघ, ‘एनबीए’ विजेता गोल्डन स्टेट वॉरियर्स संघ, ‘फॉम्र्युला १’मधील ओरॅकल रेड बूल रेसिंग संघ, फ्रान्स रग्बी संघ आणि इंग्लंड महिला फुटबॉल संघ हे लॉरेओ वर्षांतील सर्वोत्तम संघाच्या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.

हरमनप्रीत कौर ठरली जगातील पहिली क्रिकेटपटू:

 • महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एक असा विक्रम केला आहे.
 • टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला विश्वचषक स्पर्धेत भारत-आयर्लंड सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला.
 • कर्णधार हरमनप्रीत कौर आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली.
 • जगातील कोणताही क्रिकेटपटू (महिला किंवा पुरुष) आतापर्यंत हा आकडा गाठू शकलेला नाही.
 • तर 148 सामने खेळून रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे.
 • तर विराट कोहली 115 सामने खेळून सातव्या स्थानावर आहे.

रोहित शर्माने रचला मोठा विक्रम:

 • टीम इंडियाने रविवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला.
 • या विजयानंतर टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
 • अशात कर्णधार रोहितनेही आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे.
 • टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सलग 4 कसोटी सामने जिंकणारा जगातील तिसरा कर्णधार ठरला आहे.
 • त्याने या बाबतीत माजी कर्णधार एमएस धोनी आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची बरोबरी केली.

दिनविशेष:

 • 21 फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन‘ म्हणून पाळला जातो.
 • वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.
 • अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.
 • अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1942 मध्ये झाला.
 • सन 1975 मध्ये जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.