20 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

विराट कोहली
विराट कोहली

20 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2023)

‘नीट’ परीक्षेच्या वैधतेला तमिळनाडू सरकारचे आव्हान:

  • देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट) वैधतेला आव्हान देणारी याचिका तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
  • अशा प्रकारे एकच सामायिक परीक्षा आयोजित करणे हे संघराज्यवादाच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप राज्याने केला आहे.
  • सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस यांसारखे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ ही वैद्यकपूर्व प्रवेश परीक्षा घेतली जाते.
  • ‘नीट’ सारख्या परीक्षांमुळे शिक्षणाबाबत निर्णय घेण्याची राज्यांची स्वायत्तता हिरावून घेतली जाणार असल्यामुळे, या परीक्षांमुळे घटनेच्या मूलभूत रचनेचा भाग असलेल्या संघराज्यवादाचे उल्लंघन करतात, असा आरोप राज्य सरकारने घटनेच्या अनुच्छेद 131 अन्वये दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.

कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा:

  • भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 25 हजार धावांचा टप्पा ओलांडला.
  • अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील सहावा फलंदाज ठरला.
  • मात्र, त्याने हा टप्पा सर्वात कमी सामन्यांत गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 8 धावा केल्यानंतर कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला.
  • त्यामुळे सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

हरमनप्रीत कौर‘ही’ कामगिरी करणारी बनली पहिली खेळाडू:

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शनिवार एक इतिहास रचला.
  • हरमनप्रीत कौरने भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडला आहे.
  • हरमनप्रीत कौर आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी क्रिकेटर बनली आहे.
  • या प्रकरणात आता रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
  • चांगली गोष्ट म्हणजे हे दोन्ही क्रिकेटपटू भारतीय आहेत.
  • तिचा हा 149 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता.
  • त्याच वेळी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 148 सामने खेळले आहेत.
  • या यादीत तिसरे नाव आहे न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स आहे.

दिनविशेष:

  • 20 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक सामाजिक न्याय दिन‘ आहे.
  • शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना सन 1978 या वर्षी देण्यात आला.
  • सन 1987 यावर्षी मिझोराम भारताचे 23 वे राज्य बनले.
  • सन 2014 मध्ये तेलंगण हे भारताचे 29 वे राज्य बनले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.